3
सार्दीसना मंडळीले संदेश
सार्दीस माधली मंडळीना देवदूतले लिख,
“ज्यानाजोडे देवना सात आत्मा शेतस अनं सात तारा शेतस तो अस म्हणस.” तुनी कृत्य माले माहित शेतस; तू जिवत शे अस तुले नाव शे, तरी तु मरेल शे हाई माले माहित शे! जागृत हो, अनी ज्या गोष्टी मरननी वाटवर शेतस त्यासले स्थिर कर; कारण तुनी कृत्य मना देवना दृष्टीतीन पूर्ण अशी माले दिसनी नहीत. यामुये तू कसं लिधं अनं ऐकं यानी आठवण कर; ते राखी ठेव अनं पापसपाईन फिर; कारण तू जागृत नही व्हयना तर, जसा चोर येस तसा मी येसु; मी कोणता येळले तुनावर येसु हाई तुले कळाव नही. तरी ज्यासनी आपला कपडा विटाळात नही, असा थोडाच नावं सार्दीस आठे तुनाजोडे शेतस; तुम्हीन शुभ्र कपडा परीधान करीसन मनासंगे फिरतीन, कारण तुम्हीन लायक शेतस. ज्या विजय मिळावतस त्या असा पध्दततीन शुभ्र कपडा घालेल व्हतीन; मी जिवनी पुस्तकमाधलं त्यासनं नाव खोडावुच नही, अनी मना पितासमोर अनं त्याना दूतसमोर मी त्यासनं नाव उघडपणतीन जाहीर करसु. आत्मा मंडळीसले काय म्हणस हाई ज्याले कान शे तो ऐको.
फिलादेलफियाना मंडळीले संदेश
फिलादेलफिया माधली मंडळीना देवदूतले लिख; जो पवित्र अनं सत्य शे ज्यानाजोडे दावीदनी किल्ली शे, जो दरवाजा तो उघडस अनी कोणी बंद कराव नही, अनी जो दरवाजा तो बंद करस अनी कोणी उघडस नही, तो अस म्हणस. तुना कृत्य माले माहित शेतस दख, मी तुनापुढे दार उघडी देयल शे, ते कोणकडतीन बंद व्हस नही; तुले थोडी ताकद शे, तरी तू ईश्वासतीन मना वचनले पाळात अनं मना नावले नाकारा नही, हाई माले माहित शे. दखा, ज्या सैतानना सभाना राहिन आपलाले यहूदी म्हणतस, पण त्या यहूदी नहीत, त्या खोटं बोलतस; त्यासनापैकी काही तुले दिसु; दखा, त्या ईसन तुना पायसजोडे नमन करतीन अनं मी तुनावर प्रिती करेल शे हाई समजी लेतीन, अस मी करसु. 10 कारण तु मनं धीरनं वचन राखेल शे म्हणीन पृथ्वीवर राहणारा लोकसनी परिक्षा व्हवाणा जो सर्व जगवर परिक्षा प्रसंग येणार शे त्या परिक्षा प्रसंगपाईन मी बी तुले सांभाळसु. 11 मी लवकर येस; कोणी तुना विजयना बक्षिस लेवाले नको म्हणीन जे तुनं शे पक्क धरी ठेव. 12 ज्या विजय मिळावतस त्यासले मी आपला देवना मंदिर माधला स्तंभ करसु; त्या तठेन कधीच बाहेर जावावु नही; त्यासनावर मना देवनं नाव, स्वर्गमातीन मना देवपाईन उतरनारं नवं यरूशलेम, मना देवनं नगर, यानं नाव; अनी मनं नवं नाव त्यासनावर लिखसु. 13 जर तुमले कान शेतस तर आत्मा मंडळीसले काय म्हणस हाई ऐका.
लावदिकीयाना मंडळीले संदेश
14 लावदिकीया माधली मंडळीना देवदूतले लिख;
जो आमेन, जो ईश्वसनीय अनं खरा साक्षी, जो देवना सृष्टीना शासक तो अस म्हणस. 15 तुना कृत्य माले माहित शेतस; तु थंड नही अनं गरम नही. तू थंड किंवा गरम राहता तर बरा व्हतं; 16 पण तू तसा नही, कोमट शे; म्हणजे गरम नही, थंड नही, म्हणीन मी तुले मना तोंडमातीन वकी टाकणार शे. 17 मी श्रीमंत शे, मी धन मिळायेल शे, अनं माले काही कमी नही अस तु म्हणस; पण तू कष्टी, दीन, दरीद्री, आंधया अनं उघडावाघडा शे, हाई तुले कळस नही. 18 म्हणीन मी तुले सल्ला देस की, श्रीमंत व्हवाकरता तू आगघाई शुध्द करेल सोनं मनापाईन ईकत ले; तुनी लज्जास्पद नग्नता दिसाले नको म्हणीन घालाले शुभ्र कपडा ईकत ले; अनी तुले दृष्टी येवाले पाहिजे म्हणीन डोयामा टाकाले अंजन ईकत ले. 19 जितलासवर मी प्रेम करस तितलासना निषेध करीसन त्यासले शिक्षा करस; म्हणीन आस्था बाळग अनी पश्चाताप कर. 20 दखा, मी दारमा उभा शे अनं दार ठोकी राहिनु; जर कोणी मना आवाज ऐकीन दार उघडी, तर मी त्यानाजोडे मझार जासु अनं त्यानासंगे जेवसु, अनी तो मनासंगे जेवण करी. 21 मी जसा विजय मिळाईन आपला पितासंगे त्याना राजासनवर बसनु, तसा जो विजय मिळावस त्याले मी आपला राजासनवर आपलासंगे बसु दिसु.
22 जर तुमले कान शेतस तर आत्मा मंडळीसले काय म्हणस हाई ऐका.
3:3 मत्तय २४:४३,४४; लूक १२:३९,४०; प्रकटीकरण १६:१५ 3:5 प्रकटीकरण २०:१२; मत्तय १०:३२; लूक १२:८ 3:12 प्रकटीकरण २१:२ 3:19 इब्री १२:६