4
स्वर्गमा आराधना
यानंतर मी दखं, स्वर्गमा एक दार उघडेल माले दखायनं अनी जो आवाज मी पहिले ऐकेल व्हता तो मनासंगे बोलणारा कर्णाना आवाजमायक व्हता; तो बोलणा, “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडी येवाले पाहिजे त्या मी तुले दखाडसु” लगेच आत्मानी मना ताबा लिधा. मी दखं, स्वर्गमा राजासन ठेयल व्हतं, अनी त्या राजासनवर कोणतरी बशेल व्हतं. जो बशेल व्हता तो दिसाले यास्फे अनं सार्दि ह्या रत्नसनामायक व्हता. राजासनना आजुबाजूले दिसाले पाचे*ना मायक इंद्रधनुष्य व्हतात; राजासनना आजुबाजूले चोवीस आसन व्हतात; अनी त्या आसनसवर शुभ्र कपडा घालेल अनं डोकावर सोनाना मुकुट घालेल चोवीस वडील लोक बशेल व्हतात; राजासनमातीन ईजा, आवाज अनं मेघगर्जना निंघी राहिंतात; पेटेल सात मशाली राजासनपुढे जळी राहिंत्यात; त्या देवना सात आत्मा शेतस. राजासनपुढे स्फटिकनामायक जशा काय काचना समुद्र व्हता; अनी राजासनना मध्यभागले अनं राजासनना चार बाजुले, पुढे अनं मांगे डोयासनी भरेल चार जिवत प्राणी व्हतात. पहिला प्राणी सिंहनामायक, दुसरा बैलनामायक, तिसरा माणुसना तोंडनामायक, अनं चौथा प्राणी उडणारा गरूडनामायक व्हता. त्या चारी बी प्राणीसले प्रत्येकी सहा, सहा, पंख व्हतात त्या प्राणी मांगतीन अनं पुढतीन पुरा डोयासनी भरेल व्हतात, अनी, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो व्हता, जो शे, अनं जो येणार शे तो सर्वसमर्थ प्रभु देव” असा त्या रातदिन म्हणतस, त्या कधीच थांबतस नही. राजासनवर बशेल जो युगानुयुग जिवत शे त्याना जवय जवय त्या प्राणी गौरव, सन्मान अनं उपकारस्तुती करतस, 10 तवय त्या चोवीस वडील लोक राजासनवर जो बशेल त्यानापुढं गुडघा टेकतस; जो युगानुयुग जिवत त्यानी आराधना करतस; अनी आपलं मुकुट राजासनपुढे ठिसन म्हणतस,
11 “हे प्रभु, आमना देव, गौरव, सन्मान अनं सामर्थ्य यासना स्विकार कराले तु योग्य शे; कारण तु सर्वकाही निर्माण करं, तुना ईच्छातीन त्यासले जिवन अनं अस्तित्व वनं.”
* 4:3 पाचे पाचे हाई एक रत्ननं नाव शे. 4:5 प्रकटीकरण ८:५; ११:१९; १६:१८; प्रकटीकरण १:४