6
शिक्का
मंग कोकरानी त्या सात शिक्कासपैकी एक शिक्का फोडा ते मी दखं, तवय चार प्राणीसपैकी एक मेघगर्जनासनामायक आवाजतीन, “ये!” असं बोलणा, ते मी ऐकं, मंग मी दखं तो पांढरा घोडा, अनी त्यानावर बशेल स्वार माले दिसना; त्यानाजोडे धनुष्य व्हता, मंग त्याले मुकुट देवामा वना; तो विजेतानामायक विजयवर विजय मिळावत निंघना.
कोकरानी दुसरा शिक्का फोडा, तवय दुसरा प्राणी, “ये!” असं बोलणा, ते मी ऐकं. तवय दुसरा घोडा निंघना; तो अग्नीनामायक लाल व्हता अनी त्यानावर बशेल स्वारकडे पृथ्वीवरली शांतता हरण करानं अनी लोकसकडतीन एकमेकसले मारी टाकानं काम सोपेल व्हतं; त्याले मोठी तलवार देवामा येल व्हती.
कोकरानी तिसरा शिक्का फोडा, तवय तिसरा प्राणी, “ये!” असं बोलणा, ते मी ऐकं मंग मी दखं तो एक काळा घोडा, अनी त्यानावर बशेल कोणी एक माले दखायना; त्याना हातमा तराजु व्हता; अनी जश काही चार प्राणीसमातीन निंघेल आवाज मी ऐका, तो असा “एक दिननी मजुरी किलोभर गहु, अनी तीनशेर जव; जैतुनना झाडे अनं द्राक्षमया यासनी खराबी करू नको.”
कोकरानी चौथा शिक्का फोडा, तवय चौथा प्राणी, “ये!” अस बोलणा, ते मी ऐकं. मंग मी दखं, तो एक फिक्कट रंगना घोडा, अनी त्यानावर बशेल माणुस माले दखायना, त्यानं नाव मृत्यु; अनी मृत्युलोक त्याना मांगेमांगे जाई राहिंता. त्यासले युध्दघाई, दुष्काळघाई, रोगसघाई अनी पृथ्वीवरला श्वापदसकडतीन माणससले मारी टाकाना अधिकार पृथ्वीना चौथा भागवर देवामा वना. कोकरानी पाचवा शिक्का फोडा तवय मी वेदीखाल आत्मा दखात; त्या आत्मा देवना वचनमुये अनं त्यासनी जी साक्ष देयल व्हती तिनामुये मारी टाकेल लोकसना व्हतात. 10 त्या जोरमा वरडिन बोलणात, “हे सामर्थ्यशाली प्रभु, तू पवित्र अनं सत्य शे. तू कोठपावत न्यायनिवाडा करावु नही अनी पृथ्वीवर राहणारा लोकसले शिक्षा कराव नही?” 11 तवय त्या प्रत्येकले एक एक शुभ्र झगा देवामा वना अनी त्यासले असे सांगाम वनं की, “तुमना संगेना दासासले अनं ईश्वासणारासले तुमनामायक मारी टाकतीन, त्यासनी संख्या पुरी व्हवापावत तुम्हीन आखो थोडा येळ आराम करा.”
12 कोकरानी सहावा शिक्का फोडा, ते मी दखं; तवय मोठा भूकंप व्हयना; सुर्य केससनी बनाडेल खडबडीत कपडानामायक काळा व्हयना अनं पुरा चंद्र रंगतनामायक लाल व्हयना. 13 अंजिरनं झाड मोठा वाराघाई हालावर त्याना कच्चा फयं जशा खाल पडतस तसा आकाशमाधला तारा पृथ्वीवर पडनात. 14 एखादं पुस्तकं गुंडाळतस तसं आकाश गुंडाळाईन निंघी गयं अनी सर्व डोंगर अनं बेट आपआपला जागावरतीन सरकणात. 15 पृथ्वीवरला राजा अनं मोठा अधिकारी, सरदार, श्रीमंत अनं ताकदवान लोक, अनी बाकीना सर्व लोके, सर्व दास अनं सर्व स्वतंत्र लोकं, गुहासमा अनं डोंगरामाधला खडकसमा दपनात; 16 अनी त्या डोंगरसले अनं खडकसले बोलणात, “आमनावर पडीन राजासनावर जो बशेल शे, त्याना दृष्टीपुढतीन अनं कोकराना क्रोधपाईन आमले दपाडा! 17 कारण त्यासना क्रोधना मोठा दिन येल शे, अनी कोण त्याना विरूध्द ऊभा राहु शकस?”
6:12 प्रकटीकरण ११:१३; १६:१८; मत्तय २४:२९; मार्क १३:२४,२५; लूक २१:२५ 6:14 प्रकटीकरण १६:२० 6:16 लूक २३:३०