8
सातवा शिक्का
जवय कोकरानी सातवा शिक्का फोडा, तवय स्वर्गमा जवळपास अर्धा तास शांतता व्हती. तवय देवसमोर उभा राहेल सात देवदूत मी दखात. त्यासले सात कर्णा देवामा वनात.
मंग आखो एक देवदूत ईसन वेदीपुढे उभा राहिना. त्यानाजोडे धुपनी पेटी व्हती; अनी राजासनना समोरना सोनाना वेदीवर सर्व देवना लोकसना प्रार्थनाससंगे धुप ठेवाकरता त्यासनाजोडे भरपुर धुप देयल व्हता. देवदूतना हाततीन धुपना धुर देवना लोकसना प्रार्थनाससंगे देवसमोर वर गया. तवय देवदूतनी धुपनी पेटी लिसन त्यामा वेदीवरनी आग भरीन पृथ्वीवर टाकी अनी ढगसना गडगडाट अनं गर्जना व्हयन्यात, ईजा चमकन्यात अनं भूकंप व्हयना.
कर्णा
मंग ज्या सात देवदूतसजोडे सात कर्णा व्हतात त्या आपआपला कर्णा वाजवाले तयार व्हयनात.
पहिला देवदूतनी कर्णा वाजाडा तवय रंगत मिसाळेल गारा अनं आग उत्पन्न व्हईन त्यासनी पृथ्वीवर वृष्टी व्हयनी. पृथ्वीना एक तृतीयांश भाग जळी गया, एक तृतीयांश झाडं जळी गयात, अनं सर्व हिरवं गवत राख व्हयनं.
मंग दुसरा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा, तवय आगघाई पेटेल मोठा डोंगरनामायक काहीतरी समुद्रमा टाकाई गयं; समुद्रना एक तृतीयांश पाणीनं रंगत व्हयनं, अनी समुद्रमाधला प्राणीसपैकी एक तृतीयांश मरणात तसच एक तृतीयांश जहाजसना नाश व्हयना.
10 मंग तिसरा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा तवय मशालनामायक पेटेल मोठा तारा आकाशमातीन खाल पडना. तो नदीसना अनं झरासना एक तृतीयांश पाणीवर पडना. 11 त्या तारानं नाव “कडूदवणा” व्हतं अनी पाणीना एक तृतीयांश भाग कडू व्हयना अनी त्या पाणीघाई माणससपैकी बराच माणसं मरणात; कारण ते कडू व्हयेल व्हतं.
12 मंग चौथा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा, तवय सूर्यना एक तृतीयांश, चंद्रना एक तृतीयांश अनं तारासना एक तृतीयांश भाग यासनावर प्रहार व्हयना. त्यासना तृतीयांश भाग अंधकारमय व्हयना अनी दिनना तस रातना बी तृतीयांश भागवर प्रकाश दिसाले नको म्हणीन अस व्हयनं.
13 मंग मी दखं तवय एक गरूड अंतराळना मध्यभागमा उडतांना दखायना, त्याले मोठा आवाजमा असं बोलताना मी ऐकं, “ज्या तीन देवदूत कर्णा वाजाडणार शेतस त्यासना कर्णाना होणाऱ्या आवाजघाई पृथ्वीवर राहणारा लोकसवर अनर्थ! अनर्थ! अनर्थ येवाव शे!”
8:5 प्रकटीकरण ११:१९; १६:१८