पौलाने लिहिलेले तिताला पत्र
पौलनी लिखेल तिताले पत्र
वळख
तितानं हाई पत्र पौलना पत्रसपैकी एक शे. ह्यामा एक मंडळीना नही तर व्यक्तीना उद्देश करेल शे. १ तिमथ्य, २ तिमथ्य अनी फिलेमोनले या पत्र पौलनी लिखात तवयच त्यानी “तिताले पत्र” हाई बी पुस्तक लिखं अनी अस लिखं की, जसं हाई पत्र कोठे बी वाचता ई. यावरतीन आम्हीन हाई समजु शकतस की, पौल प्रेषित या नातातीन आपली योग्यता सांगस. तिताले काही गोष्टी पहिला पाईन माहीत व्हत्यात. पौलनी हाई पत्र कदाचित येशु ख्रिस्तना जन्मनंतर ६३-६५ सालमा लिखेल शे.
पौलनी या पत्रमा तिताकरता अस लिखेल शे की, क्रेत बेट वरला मंडळीसले कसं वागाडानं. कारण मंडळीसना पुढारीसनी निवड अनी प्रशिक्षणवर तिताले त्यानी सुचना देयल शे. त्यानी आपला पत्रमा तिताले असा सुचना देयल शेतस की, मंडळीना पुढारीसनी उच्चा पदवर कसं वागाले पाहिजे. मंडळीना पुढारीसले त्यासना आदर त्यासले भेटाले पाहिजे यानाकडे विशेष करीसन ध्यान देवाले पाहिजे.
रूपरेषा
१. पौल पुढारीसनी निवडकरता तिताले सुचना देस. १:१-१६
२. मंग तो लोकसले ख्रिस्ती जिवन जगाकरता शिक्षण लेवानं या सुचना करस. २:१; ३:११
३. शेवटी पौल आपली योजनामा भर टाकस अनी नमस्कार करीसन पत्रना शेवट करस. ३:१२-१५
1
पौल कडतीन जो परमेश्वरना सेवक अनी येशु ख्रिस्तना प्रेषित शे, देवना निवडेल लोकसना ईश्वास अनी त्या सत्यना वळखना समान ज्या भक्तीनामायक शेतस त्या सार्वकालिक जिवननी आशा, जीनं वचन देवनी कायम देयल शे, तो कधीच खोटं बोलस नही. पण योग्य येळले मी आपला प्रचारना द्वारा दखाडेल शे, जो आपले तारण देनारा देवनामायक माले सोपेल शे.
तितसना नावमा, जो ईश्वासना ईचारसमा मना खरा पोऱ्या शे; देवबापकडतीन अनं ख्रिस्त येशु आपला तारणारा यानापाईन कृपा अनी शांती असो.
वडीलसनी निवडणुक
मी तुले क्रेत गावमा यानाकरता ठेई येल व्हतु की, तु अपुऱ्या राहेल गोष्टीसनी व्यवस्था कराले पाहिजे अनी मी तुले आज्ञा करेलप्रमाणे तु प्रत्येक नगरमा वडील लोकसले नेमाले पाहिजे ज्याले नेमाणं शे त्यानामा दोष नही अनी तो एक बाईना पती ऱ्हावाले पाहिजे; त्याना पोऱ्या ईश्वास ठेवणारा पाहिजे त्यासनावर बेतालपणाना आरोप नको ऱ्हावाले पाहिजे अनी त्यासले आवरता येवाऊत नही असा नही पाहिजेत. अध्यक्ष हाऊ देवना कारभारी शे म्हणीसन त्यानामा दोष ऱ्हावाले नको तो संतापी, दारू पेणारा, मारका, बईमानितीन पैसा कमाडणारा नको पाहिजे. तर पाहूणचार करनारा, चांगल्या गोष्टीसनी आवड धरणारा, मर्यादाशील, नितीमान, पवित्र, संयमी, अनी देयल शिक्षणप्रमाणे जे ईश्वसनीय वचन त्याले धरीन राहणारा असा पाहिजे; ह्याकरता की, त्यानी सुशिक्षणतीन बोध कराले उलट बोलणारासनं तोंड बंद कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
10 कारण जिव्वर येणारं अनं बिनकामनं बोलणारा अनी फसवणारा बराच लोक शेतस; त्यामा विशेष करीसन सुंता व्हयेलसपैकी शेतस; 11 त्यासनं तोंड बंद कराले पाहिजे; जे शिकाडाले नको ते अनितीतिन पैसा मिळावाकरता शिकाडीन त्या सर्व घराणाना ईश्वासना नाश करतस. 12 त्या लोकसमातीन त्यासनाच कोणी एक संदेष्टा सांगस, “क्रेतीय कायम खोटारडा, दुष्ट पशु, आळशी अनं खादाड राहतस.” 13 हाई साक्ष खरी शे; म्हणीन कडकपणतीन त्यासले दोष लाईन चेतावणी देत ऱ्हाय कारण त्या ईश्वासमा पक्का व्हई जावाले पाहिजे, 14 याकरता की, त्यासनी यहूदीसन्या गोष्टी अनी सत्यपाईन बहकेल माणससण्या आज्ञासकडे ध्यान न देता ईश्वासमा खंबीर व्हवाले पाहीजे. 15 शुध्द लोकसले सर्वकाही शुध्द शे, पण विटाळेल अनं ईश्वास नही ठेवणारा यासले काहीच शुध्द नही; त्यासनी बुध्दी अनं विवेकभाव विटाळेल शे. 16 आपण देवले वळखतस अस त्या बोलीन दखाडतस; पण कृतीतीन त्याले नाकरतस त्या अमंगळ, आज्ञाभंग अनं प्रत्येक चांगला कामले नालायक शेतस.
1:4 २ करिंथ ८:२३; गलती २:३; २ तिमथ्य ४:१० 1:6 १ तिमथ्य ३:२-७