3
ख्रिस्ती जिवन
त्यासनी सत्ताधिश अनी अधिकारी यासनासंगे ऱ्हावानं, त्याना आज्ञा पाळान्या प्रत्येक चांगला काममा पुढे ऱ्हावानं. कोणी बी निंदा करानी नही, भांडखोरपना नही करता नम्र अनी सर्व माणसस संगे सर्व प्रकारतीन नम्रतातीन वागनारा ऱ्हावाले पाहिजे. अशी त्यासले याद करी दे. कारण आपण बी पहिले बिनबुध्दीना, आज्ञा नही माननारा, भटकेल, येगयेगळा प्रकारना वासनामा अनी सुखविलासमा आटकेल, दुष्टपण अनी हेवा यानामा आयुष्य घालनारा व्देषपात्र अनी दुसरासना व्देष करनारा व्हतुत. पण जवय आपला तारणारा देव ह्यानी दया अनी माणुस वरनी प्रिती प्रकट व्हयनी, तवय त्यानी आमनं तारण करं, तर हाई चांगला कामसघाई नही तर जे आम्हीन स्वतः करं, त्यानी तो पवित्र आत्मा आपला येशु ख्रिस्त याना कडतीन आपलावर विपुलतानी वतेल शे. यानाकरता की आपण त्याना कृपातीन नितिमान ठरसुत, आशा धरेल प्रमाणे सार्वकालिक जिवन मिळवणारा बनसुत.
हाई वचन ईश्वासनीय शे, अनी तु ह्या गोष्टिसबद्दल खात्रीतिन सांगस व्हशी, अशी मनी ईच्छा शे यानाकरता की देववर ज्यानी ईश्वास ठेयेल शे त्यानी चांगला कामे करानं मनवर लेवानं ह्या गोष्टी मनुष्यसकरता चांगल्या अनी हितकारक शेतस. पण मुर्खपणतीन वाद, वंशावळ, कलह, अनी नियमाशास्त्र बद्दलना भांडण, ह्यापाईन दुर ऱ्हाय कारण ते व्यर्थ अनी निरूपयोगी शेतस. 10 फुट पाडणारा माणुसले एकदाव, दोनदाव सांगीसन सोडी दे. 11 असा माणुस बिघडेल शे, अनी तो स्वतः कृतीघाई दोषी ठरायेल शे तरी तो पाप करत ऱ्हास, हाई तुले माहित शे.
शेवटनी सुचना
12 मी अर्तमाले अनी तुखिकले तुनाकडे धाडावर व्हई तितलं करीसन मनाकडे निकपलिसले निंघी ये, कारण मी हिवाळामा तठे थांबानं ठरायेल शे. 13 जेना शास्त्री अनी अपुल्लो यासले काहीच कमी पडाव नही, असा तयारीतीन शक्य तितला लवकर धाडी दे, 14 आपला लोकसले आपला अगत्यना गरजा मिळाले पाहिजे म्हणीसन, येळ काढीसन चांगला कामे करानं बी शिकानं, म्हणजे त्यासनी बेकारनं जिवन जगाले नको. 15 मनासंगे सर्वाजन तुले सलाम सांगतस आमनावर प्रिती करनारा सर्व ईश्वासणारासले सलाम सांग, देवनी कृपा तुमना सर्वासंगे राहो.
3:12 प्रेषित २०:४; इफिस ६:२१,२२; कलस्सै ४:७,८; २ तिमथ्य ४:१२ 3:13 प्रेषित १८:२४; १ करिंथ १६:१२