26
निवासमंडप
“निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार करावा, त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावे. सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात*अंदाजे 13 मीटर लांब व 1.8 मीटर रुंद असावी. पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व इतर पाच पडद्यांचेही तसेच करावे. जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनवावे आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच करावे. एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत पन्नास फासे करावे, हे फासे समोरासमोर असावेत. मग सोन्याचे पन्नास आकडे तयार करावेत आणि त्याचा उपयोग पडद्यांना एकत्र जोडण्यासाठी करावा की निवासमंडप अखंड होईल.
“निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत. सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात.अंदाजे 13.5 मीटर लांब व 1.8 मीटर रुंद असावी. पाच पडदे एकत्र व इतर सहा पडदे एकत्र असे जोडावेत. सहावा पडदा मंडपाच्या पुढील बाजूस दुमडावा. 10 जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्‍या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा. 11 मग कास्याचे पन्नास आकडे करावेत आणि ते फासात घालून असे जोडावे की तंबू एकजोड होईल. 12 तंबूच्या पडद्याचा उरलेला भाग, म्हणजे जो अर्धा पडदा उरतो, तो निवासमंडपाच्या मागच्या बाजूस टांगलेला असू द्यावा. 13 तंबूचे पडदे दोन्ही बाजूंनी एकएक हातअंदाजे 45 सें.मी. अधिक लांब असावे; उरलेला पडदा निवासमंडपाला झाकेल असा लोंबत ठेवावा. 14 तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन करावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे§टिकाऊ चर्म मूळ भाषेत तहशाची कातडी आच्छादन करावे.
15 “निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या तयार कराव्‍यात. 16 प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद असावी.*अंदाजे 4.5 मीटर लांब व 67.5 सें.मी. रुंद 17 एक फळी दुसर्‍या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे असावी. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला अशाप्रकारे कुसे बनवावी. 18 निवासमंडपाच्या दक्षिणेस वीस फळ्या बसवाव्यात. 19 आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्‍यात—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक. 20 निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला, म्हणजे उत्तरेला वीस फळ्या बनवाव्या 21 आणि प्रत्येक फळीखाली दोन अशा चांदीच्या चाळीस बैठका कराव्या. 22 निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस सहा फळ्या तयार कराव्या, 23 आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्‍यांसाठी दोन फळ्या तयार कराव्या. 24 या दोन कोपर्‍यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी जोडीने एकाच कडीत जोडाव्यात; दोन्ही कोपर्‍यांच्या फळ्या एकसारख्याच असाव्यात. 25 एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका असतील.
26 “बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करा: निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे, 27 निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे. 28 मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतील असे असावे. 29 फळ्यांना सोन्याचे आवरण लावावे आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या बनवाव्या. आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण द्यावे.
30 “मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे नमुन्याप्रमाणे निवासमंडप तयार करावा.
31 “निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या कातलेल्या रेशमी तागाचा पडदा करून त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावेत. 32 हा पडदा, बाभळीच्या लाकडाचे बनविलेले सोन्याचे आवरण देऊन चांदीच्या बैठकावर उभ्या असलेल्या चार खांबावर चार सोन्याच्या बैठकावर टांगावा. 33 पडदा आकड्यांवर टांगावा आणि कराराचा कोश पडद्यामागे ठेवावा. हा पडदा पवित्रस्थान व परमपवित्रस्थानाची साक्ष वेगळी करेल. 34 प्रायश्चिताचे झाकणकिंवा दयासन परमपवित्रस्थानात कराराच्या कोशावर ठेवावे. 35 निवासमंडपाच्या पडद्याच्या बाहेर उत्तर दिशेला मेज ठेवावा आणि त्यासमोर दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवावा.
36 “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा बनवावा. 37 या पडद्यासाठी सोन्याचे आकडे आणि सोन्याचे आवरण दिलेले बाभळीच्या लाकडाचे पाच खांब तयार करावेत आणि त्यांच्यासाठी कास्याच्या पाच बैठका तयार कराव्‍यात.”

*26:2 अंदाजे 13 मीटर लांब व 1.8 मीटर रुंद

26:8 अंदाजे 13.5 मीटर लांब व 1.8 मीटर रुंद

26:13 अंदाजे 45 सें.मी.

§26:14 टिकाऊ चर्म मूळ भाषेत तहशाची कातडी

*26:16 अंदाजे 4.5 मीटर लांब व 67.5 सें.मी. रुंद

26:34 किंवा दयासन