लूकने प्रेषितांच्या कामांचे केलेले वर्णन
लूकनी प्रेषितसना कामसनं करेल वर्णन
वळख
प्रेषितसनं काम हाई पुस्तकमा मंडळीनी सुरवातनी कशी व्हयनी हाई लिखेल शे अनी यरूशलेममातीन यहूदीया, शोमरोन अनी त्याना आजुबाजूना शहरसमा सुवार्ता कशी पसरनी अनी जस येशुनी स्वर्गमा जावाना पहिले आपला शिष्यसले जस सांगं तसं काम त्यासनी कसं करं. १:८ हाई लूकनी लिखेल शे, तसच त्यानी लूक हाई शुभवर्तमान बी लिखेल शे. लूक हाऊ एक वैद्य व्हता अनी त्यानी लिखापडी हाई अचुक व्हती. त्यानी आपलं शुभवर्तमान अनी प्रेषितसनं काम ह्या दोन्ही पुस्तकं त्या थियफिला नावना माणुसले लिखेल शे, जो एक ग्रीक माणुस व्हता, पण पुस्तकना जो उद्देश शे त्यावरतीन अस वाटस की, हाई पुस्तक ग्रीक अनी यहूदी ईश्वासी लोकसकरता बी व्हतं. १:१
प्रेषितसनं काम हाई पुस्तक येशु ख्रिस्तना जन्मनंतर ६०-६४ सालना मझार लिखाई जायेल शे, कारण हाई पुस्तक पौल कैदखानामातीन बाहेर येवाना पहिले फेरी राहीनी. लूकनी बी प्रेषित पौल यानासंगे मिशनरी फेरी करेल शेतस अनी कदाचित त्यानी अंत्युखिया शहरमा हाई पुस्तक लिखं. प्रेषितसनं पुस्तकमा लूक हाई पुस्तकना शुभवर्तमानले लगातार ठेयल शे अनी येशुना स्वर्गमा जास तठेनच सुरवात व्हयेल शे. लेखमा लूकना लिखाना उद्देश त्याना शुभवर्तमानना मायकच शे, तो थियुफिला वर प्रेम करे, तसच ख्रिस्ती लोकसनी वाढती संख्यावरतीन हाई समजस की, त्यासले काय शिकाडेल व्हतं अनी यामुयेच लूकनी येशुनं जिवन अनी ख्रिस्ती धर्मना प्रचारना एक अचुक लेख लिखा.
प्रेषितसनं पुस्तक हाई आमनाकरता सुरवातनी मंडळीनं एक उदाहरण देस अनी येशुमा ईश्वासु जिवन कसं जगानं हाई ह्यामा दखाडेल शे. प्रेषितसना उदाहरण आमले दखाडस की, दुसरासले शुभवर्तमानना संदेश सांगाकरता पवित्र आत्मानी शक्तीवर कसा ईश्वास ठेवना शे.
रूपरेषा
१. सुरवातले पवित्र आत्मा शिष्यसवर येस अनी मंडळीनी वाढ व्हस. १:१–८:१
२. मंडळीले तरास देनं अनी शुभवर्तमान यरूशलेमतीन पुढे पसरत जाणं. ८:२–१२:२३
३. पौल आपली पहिली मिशनरी फेरीले जास. १२:२४–१४:२८
४. यरूशलेमना वडील मंडळीनी बैठक करीसन हाई ठरायं की नवा ईश्वासु लोकसनी काय गरज शे. १५:१-३५
५. पौल आपली दुसरी मिशनरी फेरीले जास. १५:३६–१८:२२
६. पौल आपली तिसरी मिशनरी फेरीले जास. १८:२३–२०:३८
७. पौलले यरूशलेममा अटक करतस. २१–२६
८. शेवट पौलले रोम शहरमा पोहचाडतस. २७–२८
1
वळख
1 प्रिय थियफिला,
मी मना पहिला पुस्तकमा त्या सर्व गोष्टीसबद्दल लिखं ज्या येशु सुरवात पाईन करी अनी शिकाडी राहींता.
2 तो स्वर्गमा लेवाई गया त्या दिनपाईन जोपावत तो स्वर्गमा लेवाई गया तोपावत तो उचलाई जावाना पहिले त्यानी पवित्र आत्माना सामर्थ्यघाई त्याना प्रेषित म्हणीन निवडेल मानससले निर्देश दिधा.
3 मरण भोगा नंतर बी त्यानी बराच पुरावा दिसन मी जिवत शे अस दखाडं, अनी तो चाळीस दिन पावत त्यासले दर्शन देत राहीना अनी देवना राज्यना गोष्टी सांगत राहिना.
4 येशु अनी त्या एकत्र जमनात तवय त्यानी त्यासले आज्ञा करी की, यरूशलेम सोडिसन जाऊ नका, तर जे मना बापनं वचन तुम्हीन मनापाईन ऐकेल शे, त्यानी वाट दखा;
5 जसं योहाननी पाणीघाई बाप्तिस्मा करा; तसा तुमना बाप्तिस्मा थोडा दिन नंतर पवित्र आत्माघाई व्हई.
येशु स्वर्गमा उचलाई जास
(मार्क १६:१९-२०; लूक २४:५०-५३)
6 त्या संगे व्हतात तवय त्यासनी येशुले ईचारं, प्रभु, ह्याच येळले तुम्हीन इस्त्राएलनं राज्य परत स्थापन करशात का?
7 येशु त्यासले बोलना, जो काळ अनी येळ पितानी स्वतःकडे ठेयेल शे, ते वळखानं तुमनाकडे नही.
8 पवित्र आत्मा तुमनावर ई तवय तुमले सामर्थ्य प्राप्त व्हई, अनी यरूशलेममा, सर्व यहूदीयामा, शोमरोनमा अनं पृथ्वीना शेवटपावत तुम्हीन मना साक्षी व्हशात.
9 अस सांगावर, तो त्यासना डोयादखत वर लेवाई गया, अनी ढगसनी त्याले त्यासना डोयासना आड करी लिधं.
10 तो जाई राहिंता तवय त्या आकाशकडे टक लाईसन दखी राहींतात, तवय दखा, पांढरा शुभ्र कपडा घालेल दोन माणसं त्यासनाजोडे उभा राहीनात.
11 तवय त्या बोलनात, अहो गालीलकरसवन, तुम्हीन आकाशकडे काय दखीसन उभा राहिंनात? तुमना मातीन वर स्वर्गमा लेवाई गया तोच येशु, जस तुम्हीन त्याले स्वर्गमा जातांना दखं तसच येतांना दखशात.
यहुदाना जागावर मत्तीनी निवड
12 मंग यरूशलेमना शहरजोडे म्हणजे एक किलोमीटरना अंतरवर शे त्या जैतुन नावना डोंगरवरतीन प्रेषित यरूशलेमले परत वनात;
13 परत येवावर त्या माडीवरला एक खोलीमा गयात, तठे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलीप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीना पोऱ्या याकोब, शिमोन जिलोत, अनी याकोबना पोऱ्या यहुदा ह्या राहेत.
14 ह्या सर्वाजन अनी बऱ्याच बाया, येशुनी माय मरीया अनी त्याना भाऊ ह्यासनासंगे एकचित्त व्हईसन लगातार प्रार्थना करामा लागेल व्हतात.
15 त्या दिनस नंतर तठे एक सभा व्हयनी तिमा जवळपास एकशेविस लोके व्हतात तठे पेत्र बंधुसना मझार उभा राहीसन बोलना,
16 बंधुजनहो, येशुले धरीन लई जाणारासले वाट दखाडनारा यहुदाबद्दल पवित्र शास्त्रना तो लेख, पवित्र आत्मा दावीदना तोंडघाई जे वचन बोलना, ते पुर्ण व्हणं आवश्यक व्हतं.
17 यहुदा आमनामातील एक व्हता त्याले या कामकरता निवाडी जायेल व्हतं.
18 त्यानी आपला अधर्मनी कमाईमा वावर ईकत लिधं, तो पालथा पडामुये मधमाईनच त्यानं पोट फुटनं, अनं त्यानी सगळी आतडी बाहेर पडनी.
19 हाई यरूशलेममा राहनारा सर्व लोकसले समजनं, अनी त्यासना भाषामा त्या वावरले हकलदमा म्हणजे रक्तनं वावर अस नाव पडनं.
20 स्तोत्रसंहितामा अस लिखेल शे की;
त्यानं घर उजाड व्हवो,
अनी तठे कोणीच न राहो;
आखो अस लिखेल शे की,
काममा त्यानं पद दुसरानी लेवो,
21 म्हणीसन योहानना बाप्तिसमापाईन तर ज्या दिनले प्रभु येशुले आपलापाईन वर लई जावामा वना तोपावत,
22 म्हणजे तो आपलामा ज्या दिनसमा ये-जा करे, त्या सर्व काळमा ज्या माणसे आपलासंगे व्हतात त्यासनामाईन कोणी तरी एक आपलासंगे त्याना पुनरूत्थानना साक्षी बनाले पाहिजे.
23 तवय त्यासनी दोन माणसंसले पुढे करं; एक योसेफ ज्याले बर्सबा म्हणेत अनी ज्याले युस्त बी म्हणेत, अनं दुसरा मत्थिया,
24 मंग त्यासनी अशी प्रार्थना करी, हे सर्व माणसंसनं मन जाणनारा प्रभु, तु हाई प्रकट कर की, या दोन्हीसमाईन तु कोणले निवडेल शे
25 की, तो हाई सेवकनं काम अनं प्रेषितनं पद ली, ज्याले यहूदा सोडीसन आपला ठिकाणमा निंघी गया.
26 मंग त्यासनी त्यासना नावन्या चिठ्या टाक्यात तवय मत्थियाना नावनी चिठ्ठी निंघनी अनी तो आकरा प्रेषितसमा गणाई गया.