21
येशु सात शिष्यसले दर्शन देस
1 त्यानानंतर तिबिर्या नावना तलावजोडे परत एकदाव येशु शिष्यसमा परत प्रकट व्हयना अनी तो असा प्रकट व्हयना;
2 शिमोन पेत्र, दिदूम म्हणजे जुळा म्हणेत तो थोमा, गालीलमाधला काना गावना नथनेल, जब्दीना दोन्ही पोऱ्या अनं त्याना शिष्यसमाधला दुसरा दोनजण या सर्व एकत्र व्हतात.
3 शिमोन पेत्रनी त्यासले सांगं, “मी मासा धराले जास.” त्या त्याले बोलनात, “आम्हीन बी तुनासंगे येतस.” तवय त्या निंघीसन नावमा बठनात अनी त्या रातले त्यासनी काहीच धरं नही.
4 मंग पहाट व्हवाना येळले येशु तलावना किनारले उभा राहीना; तोपावत तो येशु शे हाई शिष्यसले समजनं नव्हतं.
5 तवय येशुनी त्यासले ईचारं, “तरूणसवन, तुम्हीन काही पकडेल शे का नही?” त्यासनी, “काही नही” अस त्याले उत्तर दिधं.
6 त्यानी त्यासले सांगं, “तुम्हीन नावनी उजवी बाजुले जाळं टाका म्हणजे तुमले सापडी” यामुये त्यासनी जाळं टाकं, तवय मासासना घोळकामुये त्यासनाघाई ते ओढाई नही राहींतात ईतला मासा त्या जाळंमा अडकनात.
7 यावरतीन ज्या शिष्यवर येशुनी प्रिती व्हती तो पेत्रले बोलना, “प्रभु शे, हाऊ प्रभु शे!” हाई ऐकीसन शिमोन पेत्रनी अंगरखा घालीसन तो कंबरले गुंडाळा, कारण तो उघडाच व्हता, अनी तलावमा कुदी गया.
8 दुसरा शिष्य धाकली नाववर मासासनी भरेल जाळं वढत वढत किनारवर वनात. कारण त्या किनारापाईन जास्त दुर नव्हतात, त्या जवळपास शंभर मीटरवर व्हतात.
9 मंग काठवर उतरीसन त्यासनी कोळसाना ईस्तव अनी त्यावर भुजेल मासा अनी भाकर दखी,
10 “येशुनी त्यासले सांगं, तुम्हीन आते धरेल मासासमातीन काही आणा.”
11 यामुये शिमोन पेत्रनी नावमा चढीसन एक शे त्रेपन्न मोठा मासासघाई भरेल जाळं काठवर ओढी आणं; इतला व्हतात तरी जाळं फाटनं नही.
12 येशु त्यासले बोलना, या जेवा तवय तो प्रभु शे हाई त्यासले समजनं, म्हणीसन तु कोण शे हाई त्याले ईचाराकरता शिष्यसमातीन कोणी हिम्मत करी नही.
13 येशुनी ईसन भाकर लिधी अनी त्यासले दिधी; तसाच मासा बी दिधात.
14 येशु मरेल मातीन ऊठानंतर आपला शिष्यसले प्रकट व्हयना ती हाई तिसरी येळ.
येशु अनी पेत्र
15 त्यासनं जेवण व्हवानंतर येशुनी शिमोन पेत्रले सांगं,
“योहानना पोऱ्या शिमोन, यासनापेक्षा तु मनावर जास्त प्रेम करस का? तो त्याले बोलना, हो, प्रभु, तुमनावर मी प्रेम करस हाई तुमले माहीत शे.” येशुनी त्याले सांगं, “मना कोकरासले चार.”
16 परत दुसरींदाव तो बोलना, “योहानना पोऱ्या शिमोन, मनावर प्रेम करस का?” तो त्याले बोलना, “हो, प्रभु, मी तुमनावर प्रेम करस, हाई तुमले माहीत शे.” येशु त्याले बोलना, “मना मेंढरसले सांभाळ.”
17 तिसरींदावं तो त्याले बोलना, “योहानना पोऱ्या शिमोन, मनावर प्रेम करस का? मनावर प्रेम करस का?” अस तिसरींदावं तो बोलना. म्हणीसन पेत्र दुःखी व्हईसन त्याले बोलना, “प्रभु, तुमले सर्व माहीत शे; मी तुमनावर प्रेम करस हाई तुम्हीन वळखेल शे.” येशुनी त्याले सांगं, “मना मेंढरसले चार,
18 मी तुले खरंखरं सांगस, तु तरूण व्हता तवय स्वतः कंबर बांधीन तुनी ईच्छा व्हयी तठे तु जाये; पण तु म्हतारा व्हशी तवय हात लांब करशी अनी दुसरा माणुस तुनी कंबर बांधीसन तुनी ईच्छा व्हवाव नही तठे तुले लई जाई.”
19 तो कोणता प्रकारना मरणघाई देवनं गौरव कराव शे हाई सुचाडाकरता तो हाई बोलना. अनी अस बोलानंतर तो त्याले बोलना, “मनामांगे ये!”
येशु अनी त्याना शिष्य
20 मंग पेत्र मांगे फिरना अनी ज्या शिष्यवर येशुनी प्रिती व्हती अनी जो जेवणना येळले येशुना जोडे बठेल व्हता अनी मांगे वळीसन “प्रभु, तुले धरी देणारा कोण शे, अस बोलना व्हता, त्याले त्यानी मांगे चालतांना दखं.”
21 त्याले दखीन पेत्रनी येशुले ईचारं, “प्रभुजी, यानं काय?”
22 येशुनी त्याले सांगं, “मी परत येसु तोपावत त्यानी जगावं अशी मनी ईच्छा व्हई तर त्यानं तुले काय? तु मनामांगे ये.”
23 यावरतीन तो शिष्य मरावं नही अशी बात अनुयायीसमा पसरनी; तरी तो मरावं नही अस येशुनी त्याले सांगं नव्हतं, तर “मी परत येसु तोपावत त्यानी जगावं अशी मनी ईच्छा व्हई तर त्यानं तुले काय?” अस बोलना व्हता.
24 जो शिष्य या गोष्टीसबद्दल साक्ष देस अनी ज्यानी या गोष्टी लिख्यात तोच हाऊ शे; अनी त्यानी साक्ष खरी शे हाई आमले माहीत शे.
सारांश
25 येशुनी करेल दुसरा बराच कामे शेतस, त्या सर्व एक एक लिखात तर लिखेल पुस्तके या जगमा मावावुत नही, अस माले वाटस.