20
रिकामी कबर
(मत्तय २८:१-८; मार्क १६:१-८; लूक २४:१-१२)
1 रविवारले पहाटले अंधार व्हता तवय मरीया मग्दालीया कबरजोडे वनी, अनी कबरनी तोंडवरनी धोंड काढेल शे अस तिनी दखं.
2 तवय ती शिमोन पेत्र अनी ज्यानावर येशुनी प्रिती व्हती असा तो दुसरा शिष्य यासनाकडे पयत जाईसन ती त्यासले बोलनी, “त्या प्रभुले कबरमातीन लई गयात; अनी त्याले कोठे ठेयल शे हाई आमले माहीत नही!”
3 यावरतीन पेत्र अनी तो दुसरा शिष्य कबरकडे जावाले निंघनात.
4 तवय त्या दोन्ही संगेच पयनात; तो दुसरा शिष्य पेत्र पेक्षा लवकर पुढे पयत कबरजोडे पहिले पोहचना.
5 अनी डोकाईन त्यानी तागना कपडा पडेल दखात, पण तो मझार गया नही.
6 मंग शिमोन पेत्र बी त्याना मांगतीन ईसन पोहचना अनं तो सरळ कबरमा गया. अनी तागना कपडा पडेल दखात
7 अनं जो रूमाल त्याना डोकाले व्हता तो तागना कपडासकडे नही, तर येगळीकडेच गुंडाळीन पडेल शे अस त्यानी दखं.
8 तवय जो दुसरा शिष्य पहिले कबरजोडे वनता तो बी मझार गया, अनी त्यानी दखीसन ईश्वास धरा.
9 त्यानी मरेल मातीन परत जिवत व्हनं हाई व्हवानं आवश्यक शे, हाऊ शास्त्रलेख तोपावत त्यासले समजना नही.
10 तवय त्या शिष्य परत आपला घर गयात.
येशु मरीया मग्दालीयाले दर्शन देस
(मत्तय २८:९-१०; मार्क १६:९-११)
11 ईकडे मरीया बाहेर कबरनीजोडे रडत उभी व्हती; अनी रडता रडता तिनी कबरमा डोकाईन दखं.
12 तवय जठे येशुनं शरीर ठेयल व्हतं तठे पांढरा शुभ्र कपडा घालेले दोन देवदूत, एक उशीकडे अनी एक पायथाकडे, असा बठेल तिनी दखात.
13 त्या तिले बोलनात, “बाई, का बरं रडस?” ती त्यासले बोलनी, “त्या मना प्रभुले लई गयात, अनी त्याले कोठे ठेयल शे हाई माले माहीत नही म्हणीसन.”
14 अस बोलीसन ती पाठमोरी फिरनी, तो तिनी येशुले उभा असा दखा, पण तो येशु शे हाई तिले समजनं नही.
15 येशुनी तिले ईचारं, “बाई, का बरं रडस? तो कोण शे ज्याले तु शोधी राहीनी?” तो माळी शे अस समजीन तीनी त्याले ईचारं, “दादा, तु त्याले आठेन लई जायेल व्हई तर त्याले कोठे ठेयल शे हाई माले सांग, म्हणजे मी त्याले लई जासु.”
16 येशुनी तिले सांगं, “मरीया!” ती त्यानाकडे वळीसन त्याले इब्री भाषामा बोलनी, “रब्बुनी!” म्हणजे “गुरजी!”
17 येशुनी तिले सांगं, “माले शिवु नको, कारण मी अजुन पिताकडे वर जायेल नही शे; तर मना भाऊसकडे जाईसन त्यासले सांग, जो मना पिता अनी तुमना पिता अनं मना देव अनी तुमना देव त्यानाकडे मी वर जाई राहीनु.”
18 मरीया मग्दालीयानी जाईसन, मी प्रभुले दखं, अनं त्यानी माले या गोष्टी सांग्यात, हाई बातमी तिनी शिष्यसले सांगी.
येशु त्याना शिष्यसले दर्शन देस
(मत्तय २८:१६-२०; मार्क १६:१४-१८; लूक २४:३६-४९)
19 त्याच रोज म्हणजे रविवारले संध्याकाय व्हवावर, जठे शिष्य व्हतात तठला दारं यहूदी अधिकारीसना धाकमुये बंद व्हतात, तरी येशु तठे वना अनी मझार उभा राहीसन त्यासले बोलना, “तुमले शांती असो,”
20 अस बोलीसन त्यानी आपला हात अनी कुस त्यासले दखाडी; तवय प्रभुले दखीसन शिष्यसले आनंद व्हयना.
21 येशु परत त्यासले बोलना, “तुमले शांती असो; जसं पितानी माले धाडेल शे तसं मी बी तुमले धाडस.”
22 असं बोलीन त्यानी त्यासनावर फूकंर टाकी अनी त्यासले सांगं, “पवित्र आत्मा ल्या.
23 ज्या कोणा पापनी तुम्हीन क्षमा करतस त्यानी क्षमा व्हयेल शे; अनी जर तुम्हीन कोणा पापसनी क्षमा नही करी तर त्याना पापसनी क्षमा नही व्हवावू.”
येशु अनी थोमा
24 येशु वना तवय बारामातील एक, दिदूम म्हणजे जुळा म्हणेत तो थोमा, हाऊ त्यासनासंगे नव्हता.
25 यामुये दुसरा शिष्यसनी त्याले सांगं, “आम्हीन प्रभुले दखं,” तरी तो बोलना, “त्या हातमा खियासना वणं दखाशिवाय, खियासना वणमा आपला बोटं घालीसन दखाशिवाय अनी त्यानी कुशीमा आपला हात घालीन दखाशिवाय मी ईश्वास धरावुच नही.”
26 मंग आठ दिन नंतर त्याना शिष्य परत मझार व्हतात तवय त्यासनासंगे थोमा व्हता, तवय बी दारे बंद व्हतात तरी येशु ईसन मझार उभा राहीसन बोलना, “तुमले शांती असो.”
27 मंग तो थोमाले बोलना, “तु आपला बोटं ईकडे करीसन मना हात दखं, अनी आपला हात ईकडे पुढे करीसन मनी कुशीमा घाल अनी अईश्वासु राहू नको, तर ईश्वास धरणारा बन!”
28 थोमा त्याले बोलना, “मना प्रभु अनी मना देव!”
29 येशुनी त्याले सांगं, “माले दखं म्हणीसन तु ईश्वास धरेल शे का? माले दखाशिवाय ईश्वास धरणारा त्या धन्य!”
या शुभवर्तमानना हेतु
30 या पुस्तकमा लिखेल नहीत असा आखो बराच चिन्ह चमत्कार येशुनी आपला शिष्यसनासमोर करात.
31 येशु हाऊ देवना पोऱ्या ख्रिस्त शे असा तुम्हीन ईश्वास धराले पाहिजे, अनी त्यानावर ईश्वास धरीसन तुमले त्याना नावतीन जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, म्हणीसन हाई लिखाई जायेल शे.