आमोसनी वळख
परिचय
हाई पुस्तकमां आमोसनं भविष्यसूचक संदेश शे. आमोस हाऊ एक मेंढपाय 1:1 अनी एक शेतकरी 7:14 व्हता. तवय परमेश्वरनी त्याले आपला भविष्य वक्ता बनाडाकरता बलावं. आमोस हाऊ तकोवा शहरना व्हता जे यहुदाना दक्षिण राज्यमां व्हता, पन त्याना बराच संदेश उत्तरकडला इस्राएलना राज्यसकरता व्हतात. आमोसनी जवय भविष्यवाणी करी तवय उज्जिया हाऊ यहुदाना राजा व्हता अनी यरोबाम हाऊ इस्राएलना दुसरा राजा व्हता. हाई जवयपास ७५० इ.स.वी पुर्वनी गोष्ट शे.
अमोसनी पहिला दोन अध्यायमां बराच राष्ट्रसनी ईरोधमां न्यायनी भविष्यवाणी करी, पण त्याना बराच संदेश इस्राएलकरता व्हतात. हाई इस्राएलकरता सुखसमृध्दीनी येळ व्हती. त्या सुखसमृध्दीना दिनमां त्या परमेश्वरले ईसरी गयात अनी त्यासनी गरीब लोकेसनीसंगे वाईट व्यवाहार करात. 2:6 त्यासनाकरता परमेश्वरना न्याय त्यासले कैद करीसनं लयी जावानं व्हत. 7: तरी भी परमेश्वरनी वचन दिधं की त्यानी इस्राएल लोकेसले ज्या सर्वा दुसरा देशवर विजय मियाडाकरता मदत करी ज्यासवर त्यासनी भुतकायमां शासन करेल व्हत ९:१२.
रूपरेषा
१. पहीला वाक्यमां आमोस आपली वयख देयल शे.
२. मंग, बाकीना भागमां, त्यानी बराच राष्ट्रसना निर्णय लेयल शे. १–२
३. मां इस्राएलना न्याय अनी कैदीसनीबारामां बात सांगेल शे. 3:9-11
४. शेवट परमेश्वर ज्या उरेल ईस्वाशी व्हतात त्यासले इस्राएलमां परत लयाना वचन देस. ९:१२-१५
1
सिरीया
तकोवा गावमधला मेंढपाळ, आमोस यासना ह्या वचनं, यहूदासना राजा उज्जीया अनी योवाशाना पोऱ्या, इस्राएलना राजा यराबाम याना दिनसमा, भूकंपना दोन वरीस पहीले इस्राएलना विषयमा ज्या वचनं दृष्टांत पाईन त्याले भेटनी ती हाई शे.
तो बोलना; सीयोनमाईन परमेश्वर गर्जना करी, तो यरुशेलममाईन आपला शब्द बोली. मेंढपाळसनी कुरणे शोक करतीन, अनी कर्मेलना माथा सुकाई जाई.
इस्त्राएलना शेजाऱ्यासना न्याय
परमेश्वर अश म्हणस, “कारण दिमिष्कना तिन काय चारी अपराधसबद्ल, मी शासन करापाईन मांगे फिराव नही. कारण त्यासनी गिलादले मळणी कराना लोखंडी अवजारघाई मारेल शे. मी हजाएलना घरमा इस्तव धाडसू; अनी तो इस्तव बेन-हदादना राजवाडासले जाळी टाकी. मी दिमिष्कना येवाना वाटना दार मोडी टाकसू, अनी बेथ-ऐदेनना घरमाईन राजदंड धरणारा अनं आवेनना गुफासमा राहणारा राजा अरामी लोके कीर आठे नगरमा जातीन.” अश परमेश्वर म्हणस.
पलिष्टी
अनी परमेश्वर अश सांगस, “गज्जाना तीन काय पण चार अपराध व्हयना म्हणीन त्यासले शिक्षा करापाईन मी मांगे फिराव नही. कारण त्यासनी सगळा लोकसले गुलाम म्हणीन लि गयात, ह्या करता की त्यासले अदोमसना हातमा देवानं. म्हणीन मी गज्जाना भितवर इस्तव धाडसु. अनी हाऊ इस्तव त्याना किल्ला नष्ट करी. मी अश्दोदमा राहणारा लोकसले अनी अश्कोलोन राजदंड धरणारा लोकसले नष्ट करसू. एक्रोनना विरोधमा मी हात चालाडसू. अनी पलिष्टसना उरेल लोके मरतीन.” अश परमेश्वर देव सांगस.
सोर
परमेश्वर अश म्हणस, “सोराना तीन काय पण चार अपराध व्हयना म्हणीन मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही. कारण त्यासनी सर्वा लोकसले अदोमसना हातमा दिधं अनी त्यासना भाऊससंगे करेल करार त्यासले याद राहिनी नही. 10 म्हणीन सोराना तटबंदीवर मी इस्तव धाडसू अनी तो त्यासना किल्ला नष्ट करी.”
अदोम
11 परमेश्वर अश म्हनस, “ अदोमना तिनी अपराधसबद्दल मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही. कारण अदोमनी तलवार लिसन त्यासना भाऊसना पाठलाग करा. अनी त्यानी सर्वा त्याना दयाळूपना काढी टाका. त्याना संताप कायम राही. अनी त्यानी आपला संताप कायम बनाडी ठया. 12 म्हणीन मी तेमान शहरवर इस्तव धाडसु, ती बस्राना किल्ला खाई टाकी.”
अम्मोन
13 परमेश्वर अश म्हणस, “अम्मोनना संतानसना तीन काय पण चार अपराध व्हयना मी शिक्षा करापाईन फिराव नही. कारण गिलादना भागमां गर्भवतीसले फाडी टाकं, ह्या करता की आपला देशना सीमासना विस्तार व्हवाले पाहीजे. 14 म्हणीन मी राब्बाना तटबंदीले इस्तव लावसू, त्यासनावर युध्दना दिनले आरडाओरड व्हत असताना, अनी वावटळीना दिनले वादळघाई, ती त्यानं किल्ला खाई टाकी. 15 अनी त्यासना राजा अनं त्यासनासंगे त्यासना सर्वा सरदार एकसंगे पकडाई जातीन.” अश परमेश्वर सांगस.