12
अंतना समय
त्या येळले तुना लोकसना रक्षण करनारा मोठा अधिपती जो मीखाएल दूत शे तो उठी; कोणतंबी राष्ट्र व्हवापाईन कवयच वनं नही अश संकट त्या येळले ई; तुना लोकसपाईन ज्यासनं नावे वहीमा लिखेल दखाई त्या सर्वा त्या येळले मुक्त व्हतीन. जमीनमाधला मातीमा झोपेलसना मोठा समुदाय उठी; कितलाजन सर्वकाळना जीवन भेटाकरता अनी कितलाजन अप्रतिष्ठा अनं सर्वकाळना धिक्कार भेटाकरता उठतीन. ज्या सुज्ञ राहतीन त्या अंतराळना प्रकाशनामायक चमकतीन; बराच लोकसले धार्मिकताकडे आणनारा लोक युगानुयुग तारानामायक चमकतीन.
हे दानीएला, तू अंतना येळपावत ह्या वचने गुप्त ठेव अनं हाऊ पुस्तक मुद्रित करीन ठेव; बराच लोके शोधत फिरतीन अनं ज्ञाननी वाढ व्हई. मंग मी दानीएलनी दखा तो दुसरा दोन पुरूष, एक नदीना हाऊ किनारले अनं दुसरा त्या किनारले अश उभा व्हतात. तवय तागना कपडा घालेल जो पुरूष त्या नदीना पाणीवर व्हता, त्याले त्यामाधला एकनी ईचारं, ह्या अद्भुत गोष्टीनी समाप्ती व्हवाले कितलं काळ बाकी शे. तागना कपडा घालेल जो पुरूष नदीना पाणीवर व्हता त्यानी आपला उजवा हात अनं डावा हात आकाशकडे वर करीन, जो सदाजीवी त्यानी शपथ लिसन सांगं की, एक समय, दोन समय अनं अर्धा समय एवढा काळ शे; पवित्र प्रजेना बलना चुराडा कराना समाप्त व्हई तवय ह्या सर्वा गोष्टी पुऱ्या व्हतीन; हाई त्यानं बोलनं मना कानमा पडनं. मी हाई ऐकनु पन समजनू नही; तवय मी बोलनु, हे मना धनी, हाई गोष्टना परीणाम काय शे? तो बोलना, हे दानीएला, तू आपला गप्प राहा; कारण अंतसमयपावत हाई वचने गुप्त ठेईन तिनावर शिक्का मारीन बंद करेल शेतस. 10 बराच लोके आपलाले शुध्द अनं शुभ्र करतीन; ते स्वच्छ व्हतीन; पन दुष्ट दुष्टपणा करतीन; दुष्टसपाईन कोनलेस समज भेटावू नही; पन ज्या सुज्ञ शेतस त्यासले तो प्राप्त व्हई. 11 कायमना बलिहवन बंद व्हई अनं नाश करनारा अमंगलनी स्थापना तठे व्हई. तवयपाईन एक हजार दोनशे नव्वद दिन लोटी जातीन. 12 जो धीर धरीन तेराशे पस्तीस दिवसनी शेवट दखी तो धन्य. 13 तरी पन अंतापावत दानीएला तू जाईन गप्प राहा; म्हणजे तुला आराम भेटी अनी तू युगना समाप्तीले आपलं वतन प्राप्त करी लेवाले उठशी.
12:1 प्रकटीकरण 12:7; 7:14; मत्तय 24:21; मार्क 13:19 12:2 यशया 26:19; मत्तय 25:46; योहान 5:29 12:10 प्रकटीकरण 22:11 12:11 दानीएल 9:27; 11:31; मत्तय 24:15; मार्क 13:14