2
मवाब
1 परमेश्वर अश म्हणस, मवाबना सारखं सारखंना अपराधसबद्दल मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही, कारण त्यासनी अदोमना राजानी हाडकं जाळीसन त्याना राख बनाडं.
2 म्हणीन मी मवाबवर इस्तव धाडसू, अनी तो करीयोथ नगरना किल्ला जाळी टाकी. अनी मवाब गोंधळमा, आरडाओरड करी अनी रणशिंगना आवाज व्हत असतां मरी.
3 मी तिनामाधला न्याय करनारासले नष्ट करसू, अनी त्यानाबरोबर सर्वा सरदारसले त्यासनासंगे मारी टाकसू. अश परमेश्वर सांगस.
यहूदा प्रदेश
4 परमेश्वर म्हणस, “यहूदासना सारखं सारखंना अपराधसबद्द्ल मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही. कारण त्यासनी परमेश्वरना नियमशास्त्र नाकारेल शे, अनी त्यासनी परमेश्वरना आज्ञा पाळात नही. त्यासनी लबाडी त्यासना पापसले कारणीभूत ठरनात अशाच प्रकारे त्यासना पुर्वजभी वागी राहींतात.
5 म्हणीन मी यहूदामा इस्तव लावसू. त्या इस्तवमा यरुशेलमना मोठा भिंत जळी जातीन.”
इस्त्राएलना न्याय
6 परमेश्वर अश म्हणस; “इस्राएलना तिनी आपराधबद्दल काय, चारीसमुळे, मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही. कारण त्यासनी पैसासकरता ज्या अपराधी नही अनी पायमधला जोडासकरता गरिबसले इकेल शे.”
7 जशे लोके माटी पायखाल चुरतस तशे त्या गरीबसनी मुंडका मातीमा चुरतस; अनी पोऱ्या अनं त्यासना बाप एकच बाईजोडे जातस, यानाकरता की मनं नाव अपवित्र व्हवाले पाहीजे.
8 अनी त्या प्रत्येक गहाण लेयल कपडासवर वेदीनाजोडे झोपी राहातस, अनी आपला दैवतासना मंदिरमा त्यानाकडतीन दंड लिधावर त्याना द्राक्षरस पितस.
9 मी तठे असतानाच त्यासना समोर अमोरीसना नाश करा, ज्यासनी उंची गंधसरूनामायक व्हती; त्या अल्लोन झाडनामायक ताकतवर व्हतात. पण मी त्यासनावरला फळसना अनं खालतीन मुळना नाश करा.
10 तुमले मिसरमाईन आणणारा मीच शे अनी चाळीस वरीस मीच तुमले वाळवंटसमाईन काढी आणं ह्याकरता की अमोरीसना प्रदेश तुम्हीन ताबामा करानं.
11 मी तुमनापैकी काही पोऱ्यासले संदेष्टा व्हवाकरता अनी तुमनामाधला काही तरुणसले नाजीर व्हवाकरता वाढावसू, हे इस्राएल लोकसवन। अश नही शे का? अश परमेश्वर सांगस.
12 पण तुम्हीन नाजीरसनं मन वळाईसन मद्य पेवाले लावं, अनी संदेष्टासले भविष्य सांगानं नही, आशी आज्ञा करी.
13 दखा, जशा पेंढयासनी भरेल गाडी एखादाले दाबी टाकस, त्यानाच मायक मी तुमले दाबी टाकसू.
14 चालाक व्यक्ती सुटाव नही, जो ताकतवर शे त्यासले आपली शक्ती लावता येवाव नही, वीरले स्वत:ना जीव वाचाडता येवाव नही.
15 धनुरधारीले उभं राहता येवाव नही. अनी जोरमा पळनारा सुटाव नहीत; घोडा चालवनाराले आपला जीव वाचाडता येवाव नही.
16 वीरसमा जो धैर्यवान तोच त्या दिनले उघडा पळी जाई अश परमेश्वर सांगस.