3
इस्त्राएलना लोकसवन, ज्या सर्वा घराणा मी मिसरमाईन बाहेर आणं त्यासनाबद्दल, परमेश्वरनी तुमनाईरोधमां ज्या वचनं सांगेल शेतस ते ऐका, “पृथ्वीवरला सर्वा घराणासमाईन मी फक्त तुमले निवडेल शे. म्हणीन मी तुमना सर्वा पापसकरता तुमले शिक्षा करसू.”
संदेष्टासनं काम
दोन मनुष्यनं एकमत व्हवाशिवाय त्या एकमेकनासंगे चालू शकतीन का?
शिकार भेटनी नही तर जंगलमा सिंह गर्जना करी का? तरुण सिंहसनी काही धरेल नही व्हई तर त्याना गुफामाईन तो डरकाळी फोडी का?
जाळाशिवाय पक्षी जमीनवर लायेल जाळामा फशी का? जाळामा काही अडकेल नही राहिना तर तो जाळा जमिनवरीन वर उडी का?
रणशिंगा फुंकाई गयात, तर लोके घाबराव नही का? नगरवर संकट ऊनं अनी ते परमेश्वरनी आणेल नही शे, आशे व्हई का?
खरोखर आपला बेत त्याना सेवकसले म्हणजे संदेष्टासले प्रकट कराशिवाय, प्रभू परमेश्वर काहीच करसं नही.
सिंहनी डरकाळी फोडी, तर कोणी घाबराव नही का? परमेश्वर बोलना शे; तर कोणलेच भविष्य सांगाशिवाय राही का?
शमरोनना विनाश
अश्दोद अनं मिसर देशमा मोठा भितीसवरतीन पुढला संदेशनी घोषना करा; “शोमरोनना डोंगरंसवर एकजागे व्हा, अनी त्यामा कितला भयंकर गोंधळ अनी काय जुलूम व्हई राहिना शेतस त्या दखा.
10 “परमेश्वर आशे सांगस, त्या आपला राजवाडामा हिंसा अनं नाश करीसनं धन साठाडतस, त्यासले योग्य आचरण माहीत नही.” 11 याकरता परमेश्वर सांगस; “त्या देशमा शत्रू घेरतीन, तो तुमनं सामर्थ्य तुमनापाईन खाल आणी, अनी तुना महाल लुटाई जातीन.”
12 परमेश्वर अश सांगस, जशा मेंढपाळ सिंहना तोंडमाईन फक्त दोन पाय किवा कानना तुकडा वाचाडस त्यानामायक इस्राएली लोके ज्या शोमरोनमा पलंगना कोपरामा किवा रेशमी गादीसवर बसतस त्या वाची जातीन.
13 सेनाधीश परमेश्वर आशे सांगस; “ऐका, अनी याकोबना घराणाना ईरोधमां साक्ष द्या.”
14 कारण ज्या दिनमा मी इस्राएलले त्याना अपराधबद्दल शिक्षा करसू, बेथेलना वेदीनी शिंग तोडी टाकसु अनी ती जमिनवर पडतीन.
15 हिवाळाना महाल उन्हाळाना महालनीसंगे मी नष्ट करसू. हसताखेळता घरानासना अनी दुसरा बराच घरानासना नाश कराई जाई. परमेश्वरनी या गोष्टी सांगेल शेतस.
3:14 २ राजे 23:15