2
1 तुमनाकरता, लावदिकीया माधला लोकेसकरता, अनं ज्या इतरासंगे मनी प्रत्यक्ष भेट व्हयनी नही त्या सर्वासना करता, मी कितलं परीश्रम करी राहीनु हाई तुम्हीन समजी लेवाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे.
2 यानाकरता की, त्यासनं मन प्रोत्साहनघाई भराले पाहिजे, अनी त्या प्रितीमा एकमेकसंगे बांधाई जावाले पाहिजे, अनी खात्रीनी ईश्वासनी सगळी संपत्ती जी समजबुध्दीतीन येस ती भेटाले पाहिजे, तसच देवनं रहस्य जो ख्रिस्त शे त्यानाविषयी पुर्णज्ञान भेटाले पाहिजे.
3 त्यामा देवना ज्ञान अनं बुध्दीनी सर्वी संपत्ती लपेल शे.
4 फसडणारा भाषण दिसन कोणी तुमले फसाडाले नको तर त्या कितला चांगला का ऱ्हायेना म्हणीन हाई सांगस;
5 कारण मी जरी शरीरतिन तुमनापाईन दुर राहिनु, तरी बी आत्मामा मी तुमनासोबत शे, अनी तुमना जिवनमाधलं नीटनेटकपणा अनी ख्रिस्तवरला तुमना ईश्वासना खंबीरता दखीसन मी आनंदमा शे.
ख्रिस्तमा जिवननी पुर्णता
6 म्हणीन ख्रिस्त येशु जो प्रभु, याले जसं तुम्हीन स्विकारं तसं त्यानामा एक व्हईसन ऱ्हावा.
7 ख्रिस्तमा मुळाई जायेल, त्यानावर उभा कराई जायेल, तुमले शिकाडेल प्रमाने ईश्वासमा दृढ व्हयेल असं देवनी स्तुती करनारा व्हा.
8 ख्रिस्तप्रमाने नही, तर मनुष्यसना संप्रदायप्रमाणे, जगना प्राथमिक शिक्षणा प्रमाने ऱ्हायेल ज्ञान अनं पोकळ भुलथापा यासनाघाई फसाडीन कोणी तुमले दास बनाडाले नको म्हणीन सावध ऱ्हावा;
9 कारण दैवीपननी सर्व पुर्णता शरिरधारी व्हईन ख्रिस्तमा वसस.
10 अनी जो सर्व प्रत्येक सत्ताना अनं अधिकारीसना मस्तक शे, ख्रिस्तमा एक व्हईसन तुमले पुर्ण जिवन भेटेल शे.
11 त्यानामा तुमनं देहस्वभावरूप शरीर काढी टाकावर जे ख्रिस्तनं सुंता, म्हणजे हातघाई नही व्हयेल सुंता, ती व्हयनी शे.
12 तुमना बाप्तिस्मा व्हयनं तवय तुम्हीन त्यानासोबत पुराई गयात, अनी ज्यानी त्याले मरेलमाईन ऊठाडं त्या देवनं कृत्यवरीन ईश्वासनाद्वारा त्यानासोबत ऊठाडामा वनात.
13 जवय तुम्हीन आपला पापसघाई, गैरयहूदी अनी नियमशास्त्र नसेल असा मरेल व्हतात, पण देवनी ख्रिस्तनासोबत तुमले जिवन दिधं अनी आपला सर्व पापसनी क्षमा करी.
14 त्यानी आमनाविरुध्द् ऱ्हायेल विधीना आरोपपत्रमा ज्यामा आमले विरोध व्हता, तो त्यानी आमनातीन काढी टाकं, अनी क्रुसखांबवर खियासघाई ठोकीसन रद्द करा.
15 त्यानी स्वतः क्रुसखांबनाद्वारा अध्यात्मिक शासकसले अनं अधिकारीसले पाडीसन त्यासनावर जय मियाडेल शे, त्यानी त्यासना विजयना मोर्चामा त्यासले कैदी बनाडीन त्यासना तमाशा करा.
16 म्हणीन कोणी बी तुमनावर खावानं अनं पेवानं बाबत, तसच सण, आमावस्या, किंवा शब्बाथ दिननाबाबत तुमना कोणी न्याय कराले नको.
17 कारण त्या फक्त येनारा भावी गोष्टीसनी सावली शेतस; पण सत्यता ख्रिस्तमा शे.
18 नम्र म्हणीसन देवदूतसनी उपासना करनारा, अनं स्वतःला दखास त्या गोष्टीसवर भरवसा ठेवनारा अनं दैहिक बुध्दीतीन उगाच गर्वमा फुगनारा कोणी मनुष्य तुमले फसाडीसन तुमनं बक्षीससले गमाडु नका.
19 अस मनुष्य ख्रिस्त जो मस्तक शे त्याले धरीसन राहस नही; त्या ख्रिस्तपाईन सर्व शरिरले स्नायु अनं बंधन यासना एकमेकसना आधारवर पुरवठा व्हस अनं त्यानी देवले योग्य वाटस ईतलं वाढत जास.
ख्रिस्तमा जगणं अनी मरणं
20 तुम्हीन जगना प्राथमिक शिक्षणमा ख्रिस्तनासोबत मरेल शेतस तर मंग तुम्हीन हाई जगना राहनारासनामायक त्यासना नियमासना स्वाधीन का व्हतस?
21 म्हणजे “त्याले हात लावानं नही!” अनं “त्यानी चव चाखानं नही?”
22 अस प्रकारना उपभोगतीन नाश व्हनारा वस्तुविषयी मनुष्यसनं नियमासनं अनं शिक्षणंन ज्या विधी शेतस त्यासना स्वाधीन का व्हतस.
23 याले स्वतःनं ईच्छातीन योजल स्वर्गदूतसनी उपासना, लिनता अनं देहदंड यावरीन ज्ञान नाव खरं शे, तरी देहस्वभावना लालच विरूध्द लढाकरता त्यासनी योग्यता नही.