10
दानीएलनी टायग्रीस नदीवर दखेल दृष्टांत
पारसाना राजा कोरेश याना काळना तिसरा वरीसले बेलटशस्सर हाई नाव भेटेल दानीएलले एक गोष्ट प्रगट व्हयनी; ती गोष्ट सत्य राहीसन मोठा युध्दनाविषयी व्हती; त्याले ती गोष्ट समजनी; त्या दृष्टांतना अर्थ त्याले समजनं.
त्या दिनसमा मी दानीएल सबंध तीन आठवडा शोक करत ऱ्हायनु. तीन सबंध सप्तके संपच तोपावत मी स्वादिष्ट अन्न अजुबात खादं नही, मांस अनं द्राक्षरस हाई मना तोंडमा गया नहीत अनी मी डोकाले तेल लावात नही. पहिला महिनाना चोवीसावा तारीखले महानदी हिद्दकेल हिना किनारले मी व्हतु. मी डोळा वर करीन दखा तवय तागना कपडा घालेल अनी कमरले उफाज देशना शुध्द सोनाना पट्टा घालेल अश एक पुरूष मना नजरमा पडना. त्यानं शरीर सुवर्नमणीनागत राहिसन त्यानं तोंड विजनासारखं व्हतं त्याना डोळा पेटेल दिवानासमान व्हतात, त्याना हातपाय उज्वल पितळनासारखं व्हतं अनी त्याना शब्दना आवाज एखादा समुदायना आवाजनासारखं व्हता. मी दानीएलनी एकटानी तो दृष्टांत दखा; मनासंगे राहेल माणसंनी तो दृष्टांत दखात नही; तरी त्यासले मोठी भिती वाटनी अनी कोठेतरी लपानं म्हणीन त्या पळनात. मंग मी एकटाच राहिनू अनं हाऊ मोठा दृष्टांत दखा; मनामा काहीच बळ उरना नही, मी अशक्त व्हईसन मृतप्राय व्हयनु; माले काहीच शक्ती राहिनी नही. तरी त्याना शब्दना आवाज मना कानमा पडना; मी त्याना शब्दना आवाज ऐका तवय मी जमिनवर पालथा पडनू अनं माले गाढ झोप लागनी. 10 तवय दखा, एक हातनी माले स्पर्श करा, त्याना योगमुये मी गुडघा अनं तळहात जमिनवर टेकीसन थरथर कापत राहिनू.
11 तो माले बोलना, हे दानीएल, परमप्रिय पुरूषा, मी तुले सांगस ते शब्द समजी ले; नीट उभा राय; कारण माले आते तुनाकडे धाडेल शे; तो मनासंगे अश बोलना तवय मी थरथर कापीसन उभा राहिनू. 12 तो माले बोलना, दानीएला, भिऊ नको; कारण ज्या दिनले तू समजी लेवाले, अनं आपला देवनापुढे नम्र व्हवाना निश्चय करा त्याच दिनले तुनं शब्द ऐकामा वना; त्या तुना शब्दसवरीन मी येल शे. 13 पारसाना राज्यना अधिपति एकवीस दिन माले आडवा वना; तवय दखा; मुख्य अधिपतीसपाईन एक मीखाएल मना साहाय्य कराले वना; अनं मी पारसना राज्यसना जोडे राहिनू. 14 आते या अंतना दिनसमा तुना लोकसना काय व्हई हाई तुले समजाडाले मी येल शे; कारण जो दर्शन तु दखेल शे तो पुरा व्हवाले आखो बराच काळ शे. 15 याप्रमाणे तो हाऊ शब्द मनासंगे बोलावर मी जमिनकडे आपलं तोंड करीसन गप्प राहिनू; 16 तवय दखा, मानवपुत्रसारखा एकनी मना ओठले स्पर्श करा; तवय मी आपलं तोंड उघडीसन जो मनासमोर उभा व्हता त्याले सांगं, हे मना स्वामी, हाऊ दृष्टांतघाई माले क्लेश व्हईसन मी व्याकूळ व्हयनु शे अनं मनामा काहीच बळ उरनं नही. 17 स्वामी महाराज, मी तर आपला सेवक, मना स्वामीनासोबत बोलानं सामर्थ्य माले कोठेन? माले तर काहीच बळ राहिनं नही; मनामा दम राहिना नही. 18 तवय माणुसनासारखा दखावनारा एकनी माले स्पर्श करीसन मनामा बळ आना. 19 तो बोलना, परमप्रिय मानव, भिऊ नको; तुले शांती असो, हिंमत धर, नेट धर, तो मनासोबत बोलना, तवय माले शक्ती वनी अनं मी बोलनू, मना स्वामी, तू आते बोलानं, कारण तू मनामा हिंमत आणेल शे. 20 मंग तो बोलना, मी तुनाकडे काबर येल शे हाई तुले माहित शे का? आते मी पारसाना अधिपतीनासंगे लढाले जास; मी गवू म्हणजे ग्रीसना अधिपती ई. 21 सत्यलेखमा जे लिखेल शे ते तुले प्रगट करस; त्यासनासोबत सामना करामा तुमना अधिपती मीखाएल देवदूत यानाशिवाय दुसरा कोनाच माले साहाय्य नही शे.
10:5 प्रकटीकरण 1:13-15; 2:18; 19:12 10:13 प्रकटीकरण 12:7