9
आपला लोकसकरता दानीएलनी प्रार्थना
मेदय वंशमाधला अहश्वेरोशना पोऱ्या दारयावेश खास्दीसना देशवर राजा व्हता त्याना काळना पहिला वरीसले. माले दानीएलले शास्त्रग्रंथवरीन समजनं की, यरुशेलमना ओसाड दशेना काळ पुरा व्हवाले सत्तर वरीस लागतीन, अश परमेश्वरनं वचन यिर्मया संदेष्टाले प्राप्त व्हयेल व्हतं. हाई जाणीसन मी आपलं तोंड प्रभु देवकडे लाईसन प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणं अनं आंगवर राख उधळनं हाई सुरू करं. मी आपला देव परमेश्वर यानी प्रार्थना करीसन पापांगीकार करा तो अश: हे प्रभो, हे थोर अनं भयावह देवा, ज्या तुनावर प्रेम करतस अनं तुना आज्ञा पाळतस त्यासनाबरोबर तू आपला करार पाळीन त्यासनावर दया करस;
आम्हीन पाप करात, वाईट प्रकारतीन वागनुत, दुष्टतेना वर्तन करात; बंड करात, तुना विधि अनं तुना निर्णय यासनापाईन आम्हीन वळनुत. तुना सेवक ज्या संदेष्टा त्यासनी तुना नावतीन आमना राजा, सरदार, वडील अनं देशना सर्वा लोके यासले सांगं ते पण आम्हीन ऐकात नही. हे प्रभो, न्यायत्व काय ते तुनाच ठायी शे; पण आमनं तोंड लज्जीत व्हयेल शेतस; यहुदानं लोके, यरुशेलमना निवासी लोके अनी जोडे अनं दूर राहनारा सर्वा इस्त्राएल लोक, यासनी तुनाविरूध्द पाप करामुये तू त्यासले येगयेगळा देशमा हाकली दिधं, त्या सगयासना तोंडे लज्जीत व्हयेल शेतस. हे प्रभो, आमना राजे, आमना सरदार, आमना पुर्वज यासना तोंड लज्जीत व्हयेल शेतस, कारण आम्हीन तुनाविरूध्द पाप करेल शे. आमना देव प्रभु दयेना अनं क्षमाना सागर शे; आम्हीन त्यानाबरोबर बंड करात. 10 अनी आमना देव परमेश्वर यानी आपला सेवक ज्या संदेष्टा यासनाद्वारे आमनापुढे ठेयेल त्याना नियमशास्त्राप्रमाणे वर्तनसंबंधातीन आम्हीन त्यानी वाणी ऐकी नही. 11 सर्वा इस्त्राएल लोकसनी तुना नियमशास्त्रना उल्लंघन करेल शे; त्यासनी तोंड फिराईन तुनी वाणी ऐकी नही; म्हणीन आमनावर शापना वर्षाव व्हयेल शे; देवना सेवक मोशे याना नियमशास्त्रमा लिखेल शपथप्रमाणे व्हयेल शे; कारण आम्हीन त्यानाविरूध्द पाप करेल शे. 12 त्यानी आमनावर मोठं संकट आणेल शे; जे वचने तो आमनाविरूध्द अनं आमना न्याय करनारा न्यायधीशनाविरूध्द बोलना ती त्यानी समक्ष आणी देयल शे; यरुशेलमवर जशी विपत्ती वनी तशी सर्वा जगवर कधी वनी नही. 13 मोशेना नियमशास्त्रमा लिखेलप्रमाणं हाई सर्व विपत्ती आमनावर येल शे; तरी आपला अधर्मपाईन मांगे फिरान अनं तुना सत्यना उमज पडाले पाहिजे म्हणीन आम्हीन आमना देव परमेश्वर यानी काकळूत करी नही; 14 त्यानामुये परमेश्वर हाई विपत्ती आमनावर आनाले संधी दखी राहिना शे; कारण आमना देव परमेश्वर ज्या कृत्ये करस ती न्याय शेतस, पण आम्हीन त्यानी वाणी ऐकी नही.
15 आते हे प्रभु, आमना देव, तू आपला सामर्थ्यवान हाततीन मिसर देशमाईन आपला लोकसले बाहेर आणात अनं आजनामायक आपला महिमा वाढावं आम्हीन पाप करेल शे; आम्हीन दुष्टाईतीन वागेल शेतस. 16 हे प्रभु, आपला सर्वा न्यायकृत्यसप्रमाणं यरूशलेम नगरीवरना, तुना पवित्र पर्वतवरना, आपला क्रोध अनं संताप दूर कर; आमना पापसमुये अनं आमना पुर्वजसना दुष्कर्मसमुये यरुशेलम अनं तुना लोके आजुबाजूना सर्वासले निंदाना विषय व्हयेल शेतस. 17 त्यामुये आते, हे आमना देवा, आपला सेवकनी प्रार्थना अनं विनवणी ऐक; तुना ओसाड पडेल पवित्रस्थानवर आपला मुखप्रकाश पाड; हे प्रभु, तू आपला नावतीन हाई कर. 18 हे मना देवा, कान दे, ऐक; आपला डोळा उघडीन आमना व्हयेल विध्वंस दख अनं तुना नाव ज्या नगरले देल शे ते दख; आम्हीन आमना विनवण्या आमना धार्मिकतेस्तवमुये नही तर तुना विपुल करूणास्तव तुनापुढे मांडतस. 19 हे प्रभु, ऐक; हे प्रभु, क्षमा कर; हे प्रभु, ऐक, कार्य कर; उशीर लावू नको; हे मना देवा, तुना नगर अनं तुना लोके यासले तुनं नाव देल शे; म्हणीन तुनाच नावतीन हाई मांगस.
गब्रीएलनी भविष्यवाणीले समजनं
20 मी बोली राहिंतू अनं प्रार्थना करी राहिंतू, तवय मना पाप अनं मना लोके इस्त्राएल यासना पाप कबुल करी राहिंतु अनी मना देवना पवित्र पर्वतकरता मना देव परमेश्वर यानाकडे विनवणी करी राहिंतू तवय, 21 अश प्रार्थनना शब्द मी बोली राहिंतू तवय जो पुरूष गब्रीएल, दृष्टांतना आरंभले मी भलता व्याकुळ व्हयेल व्हतु तवय मना नजरमा पडना व्हता, तो संध्याकाळना यज्ञना येळले मनाजोडे वना. 22 त्यानी मनासोबत भाषण करीसन माले समज दिधा. तो बोलना, हे दानीएल, मी तुले बुध्दी दिसन चतुर कराकरता येल शे. 23 तुना प्रार्थनाले सुरवात व्हताच आज्ञा व्हयनी, ती तुले सांगाले मी येल शे; कारण तू परमप्रिय शे; तर ह्या गोष्टीना ईचार कर अनं हाऊ दृष्टांत समजी ले.
24 आज्ञाभंगनी समाप्ती व्हवाले पाहिजे, पातकसना नाश कराना, अधर्मबद्दल प्रायश्चित करानं, सनातन धार्मिकता उदयमा आणानं, दृष्टांत अनं संदेश मुद्रित करानं अनी जो परमपवित्र त्याले अभिषेक करानं, हाई घडी येवाकरता तुना लोके अनं तुनं पवित्र नगर यानाबद्दल सत्तर सप्तके ठरेल शेतस. 25 हाई कळाले पाहिजे म्हणीन समजी ले की यरुशेलमना परत उभारनी करानी आज्ञा व्हवापाईन अभिषिक्त, अधिपती, अश जो तो येईपावत सात सप्तकसना अवकाश शे अनं वरीसना बासष्ट सप्तके लोटावर संकटना काळ राहीनबी नगर, रस्ता अनं खंदक यासनासंगे बांधतीन. 26 वरीसना बासष्ट सप्तके संपावर अभिषिक्तना वध व्हई, अनं त्याले काही उरावू नही; अनी जो अधिपती ई त्याना लोके नगर अनं पवित्रस्थान उध्वस्त करतीन; त्याना अंत पुरतीन व्हई; युध्द अंतपावत चाली; सर्वा काही उजाड व्हवानं ठरेल शे 27 तो पुष्कळ लोकसनाबरोबर वरीसना एक सप्तकना पक्का करार करी; धर्म सप्तकपावत तो यज्ञ अनं अन्नबलि बंद करी; नाश करनारा अमंगळना पंखसवर आरूढ व्हईसन ई अनं ठरेल समाप्तीपावोत नाश करनारासवर देवना कोपना वर्षाव व्हई.
9:2 यिर्मया 25:11; 29:10 9:11 अनुवाद 27:15-26 9:21 लूक 1:19,26 9:27 दानीएल 11:32; 12:11; मत्तय 24:15; मार्क 13:14