8
दानीएलले एडका अनं बकरा यासना दृष्टांत
1 मी जो दानीएल त्या माले पहिले दृष्टांत व्हयेल व्हता, त्यानानंतर बेलशस्सर राजाना काळना तिसरा वरीसले माले परत दृष्टांत व्हयना.
2 मी दृष्टांतमा दखा तो माले अश दखायनं की मी एलाम परगणामाधला शूशन राजवाडामा शे; अजून दर्शनमा मी दखा तो मी उलई नदीना किनारवर शे.
3 मी डोळा वर करीन दखा तो माले नदिनासमोर दोन शिंगसना एक एडका दखायना; ती दोन्ही शिंग मोठा व्हतात; त्यानामाधला एक दुसरापेक्षा मोठं राहिसन मांगेन निंघेल व्हतं.
4 तो एडका पश्चिमले, उत्तरले अनं दक्षिणले धडक मारी राहिना शे अश मी दखं; कोणतच पशु त्यानासमोर उभा राहिना नही, अनं त्याना तडाकामाईन एखादाले सोडावाना कोणलेच सामर्थ्य नव्हतं; तो आपला मनमा ई तसं करे, अश तो बळकट व्हयना.
5 मी ईचार करी राहिंतू तो दखा, पश्चिम दिशाकडीन एक बकरा सर्व पृथ्वी आक्रमन करीसन वना; तो ई राहिंता तवय त्यानी जमिनले पाय लावात नही; त्या बकराना डोळासना मधोमध एक ठळक शिंग व्हतं.
6 मी ज्या दोन शिंगसना एडका नदीनासमोर उभा राहेल दखा व्हता त्यानाकडे तो बकरा गया; त्यानी आपलं सर्वा बळ लाईसन जोरमा त्याले धडक मारी.
7 मी दखा तो त्या एडकाजोडे गया, अनं त्यानी क्रोधतीन खवळीसन त्या एडकाले धडक मारी अनं त्याना दोन्ही शिंग मोडी टाकात; त्यानापुढे टिकाव धरानी त्या एडकाले शक्ती नव्हती; त्या बकरानी त्याले जमिनवर पाडीसन तुडावं; त्या एडकाले त्याना हाततीन सोडावाना कोणलेच सामर्थ्य नव्हतं.
8 तो बकरा भलता मोठा व्हयना; तो बळकट व्हयना तवय त्याना मोठं शिंग मुडनात अनी त्यानाऐवजी त्याले चार बाजुले चार ठळक शिंग फुटनात.
9 त्यानामाधलं एक शिंगमाईन एक धाकलं शिंग निंघना; अनं ते दक्षिणले, पुर्वले अनं त्या वैभवी देशकडे वाढत गया.
10 त्यानी वाढ आकाशपावत व्हईसन तो आकाशमाधलं सेनासंगे लढू शकस काही तारासपाईन काहीसले त्यानी जमिनवर पाडीसन तुडावं.
11 एवढच नही तर त्या गणासना अधिपतीसोबत तो स्पर्धा कराले लागना; त्याले कायम होत राहेत यज्ञयाग त्यानी बंद करात, अनी त्यानं पवित्रस्थान पाडी टाकं.
12 लोकसना पातकसमुये ते सैन्य नित्यासना यज्ञयगनासोबत त्याना स्वाधीन करामा वनं; त्यानी सत्य मातीमा मियाडं; त्यानी आपलं मनोरथ सिध्दीस आणात.
13 तवय मी एक पवित्र पुरूषसले बोलतांले ऐकं; दुसरा एक पवित्र पुरूष त्या बोलनाराले सांगं, हाऊ नित्याना यज्ञयाग, नाश करनारं पातक, पवित्रस्थान अनं सैन्य हाई पायनाखाल तुडवानं, हाऊ दृष्टांतमा दखेल गोष्टी कोठपावत चालतीन?
14 तो माले बोलना, दोन हजार तीनशे दिन; त्यानानंतर पवित्र स्थाननी शुध्दि व्हई.
गब्रीएलनाद्वारा दर्शनना अर्थ स्पष्ट व्हस
15 मंग अश व्हयनं की मी दानीएलनी हाऊ दृष्टांत दखा तवय त्याना अर्थ काय शे हाई समजाना मी प्रयत्न कराले लागनू तो दखा, मनुष्यरूपधारी अश एकले मी मनासमोर उभा राहेल दखा.
16 उलई नदीना दोन किनारासमाईन मी मनुष्यवाणी ऐकी ती अशी गब्रीएला, या पुरूषले हाऊ दृष्टांत समजाडीसनं सांगं.
17 तवय मी उभा व्हतू तठे तो मनाजोडे वना; तो वना तवय मी घाबरीन पालथा पडनू; तो माले बोलना, हे मानवपुत्र, हाऊ दृष्टांत समजी ले; कारण हाऊ शेवटना काळनाविषयीना शे.
18 तो मनासोबत बोली राहिंता मी जमिनवर पालथा पडनू अनं माले गाढ निद्रा लागनी; पण त्यानी माले स्पर्श करीन उभा करं.
19 तो बोलना, दखा, कोपना शेवटना काळमा काय व्हई हाई मी तुले सांगस; कारण नेमेल अंतसमयना संबंधतीन हाऊ दृष्टांत शे.
20 दोन शिंग राहेल एडका तू दखा; ते मेदय अनं पारस यासनं राजे.
21 तो दांडगा बकरा ग्रीसना राजा; त्याना डोळाना मधोमध राहेल मोठं शिंग हाऊ पहिला राजा.
22 एक शिंग मुडीन त्याना जागे चार शिंग निंघनात याना अर्थ अश की त्या राज्यमाईन चार राज्यसना उदय व्हई ; मंग त्याना बळ पहिला राज्यना इतलं रावावु नही.
23 त्या राज्यसना शेवट जोडे ईसन पातकीसना पापना घडा भरना म्हणजे तठे एक हट्टी, दुष्ट अनी कपटी असं राजा उभा राही.
24 त्यानी सत्ता महान व्हई; पन ती अशी त्याना स्वताना पराक्रमतीन व्हवावु नही; तो विलक्षण नाश करी. तो जे काही करी त्यानामा त्याना विकास व्हई अनी आपला मनोरथ सिध्दमा आणी; तो समर्थ अनं पवित्र लोकसना नाश करी.
25 तो आपला कपटतीन आपला हातनी कारस्थानं सिध्दीमा नेई; तो उन्मत व्हईन निर्भय असेल बराच लोकसना नाश करी; तरी पन त्यानावर कोणाच हात न पडता तो नाश व्हई जाई.
26 हाऊ जो संध्याकाळ अनी सकाळना दृष्टांत सांगात तो खरा शे; हाऊ दृष्टांत गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळले लागु शे.
27 तवय मज दानीएलले जाग वनी अनं मी काही दिन आजारी पडनू; त्यानानंतर मी उठीन राजानं कामकाज कराले लागनु. हाऊ दृष्टांत दखीन मी कावराबावरा व्हयनु; पन तो कोनलेच समजना नही.