10
जशा मरेल माख्या सुगंधी तेल दुर्गंधीत करतस तशा मुर्खपना हाई शहानपण अनी मानपाण यासना नाश करु शकतस.
शहाणना मन त्याना उजवीकडे शे, पण मुर्खना मन त्याना डावीकडे ऱ्हास, जवय मुर्ख वाटधरी जाई ऱ्हास तवय त्याना ईचार आर्धावट ऱ्हातसं हाई दखाई जास, म्हणीसन तो मुर्ख शे हाई बठासले दखास.
तुमना वरीष्ठ लोके तुमनावर चिडेल शेतस म्हणीसन काम सोडानं नही, शांत ऱ्हावामुये राग शांत व्हई जास. एक संकट मी हाई पृथ्वीवर दखेल शे, अधिकारीनी चुकमुये ती येस ते मी दखेल शे. मुर्खसले नेता पदनी जागा देवामा येस अनी ज्या यशस्वी व्हयेल ऱ्हातस त्यासले खालनी जागा देवामा येस. ज्या नोकर शेतस त्यासले मी घोडावर जातांना दखं अनी ज्या यशस्वी लोके व्हतात त्यासले नोकरनामायक जमीनवर चालतांना दखं.
जो कोनी खड्डा खंदस, त्यामा तोच पडस अनी जो कोनी भित तोडी टाकस त्याले साप चावस. अनी जो कोनी वेसना दगड फोडस त्याले त्यानामुये इजा व्हस अनी जो लाकडं तोडस तो संकटमा ऱ्हास. 10 लोखंडी हत्यार बोथट व्हयनं अनी त्याले धार लाई नही तर जास्त ताकद लावनी पडस, पण काम साध्य कराकरता बुध्दी उपयोगनी शे. 11 जर सापवर मंत्र प्रयोग व्हवानी आगोदर तो चावना तर मोरे मांत्रिकसना काहीच उपयोग नही. 12 शहाणाना तोंडना वचन कृपामय ऱ्हातस, पण मुर्खना तोंड त्यालेच गिळी टाकस. 13 त्याना तोंडना वचन करानी सुरुवात मुर्खपना ऱ्हास, अनी त्याना भाषन कराना शेवट येडापना ऱ्हास. 14 मुर्ख वचन वाढाईसन सांगस.
पण मोरे काय येनार शे हाई माणुसले माहीत नही. त्यानामांगे काय व्हई हाई त्याले कोन सांगी?
15 मुर्ख कष्ट करीसन थकी जास, कारण शहरमा जावानी वाट त्याले माहीत नही ऱ्हास.
16 हे देश, तुना राजा पोऱ्यानीमायक व्हई अनी अधिपती सकायसले जेवानी सुरुवात करी तर तुनी कितली वाईट परीस्थिती व्हई! 17 पण जर राजा उचा कुळना पोऱ्या व्हई अनी तुना अधिपती नशा कराकरता नही तर शक्तीकरता जेवन करत व्हतीन तवय तुना देश आनंदमां शे.
18 जर एखादा मानुस कामनी बारामा आळशी व्हई तर त्याना घर गयाले लागी अनी त्याना धाबा पडी जाई.
19 लोके हासीमजाक कराकरता मेजवानी बनाडतस, द्राक्षरस जीवले सुख देस अनी पैसा प्रत्येक गोष्टनी गरज पुरावस.
20 तु आपला मनमा सुध्दा राजाले शाप देवू नको. धनवानले आपली झोपानी खोलीमा शाप देऊ नको कारण आकासमासला चिडा तुना शब्द लिसन जाई अनी ज्या बाकीना चिडा शेतस ते त्या गोष्टी पसरावतीन.
10:8 स्तोत्रसंहिता 7:15; नीतिसूत्रे 26:17