9
1 मी बठया गोष्टीसनी कायजीपुर्वक ईचार करा, नीतिमान अनी ज्ञानी माणुस अनी त्याना काम समजानी कोशीस करात, त्या बठा देवना हातमा ऱ्हास. कोनीतरी आपला व्देष करी अनी प्रेमना करी यानाबदल काहीच माहीत नही ऱ्हास.
2 जे काही व्हस ते बठं सारखच व्हस, नीतिमान अनी दुष्ट, चांगला अनी वाईट, शुध्द अनी अशुध्द, यज्ञ करनारा अनी यज्ञा नही करनारा या बठासनी गती एकच व्हस, चांगला मानुस पापी मानुसनामायक मरी. शपथ लेनारानी, तशेच शपथ देनारानी त्यानी गती तशीच व्हई.
3 हाई जगमा जे काही घडस त्यामा हाई एक आशे वाईट शे की बठासनी सारखीच गती व्हई, मनुष्यनापोऱ्याना मनमा दुष्टता भरेल ऱ्हास, त्यासना मना बठा आयुष्यभर भ्रांतीमय ऱ्हास, मंग त्या मरेलसले जाईसन मिळतस.
4 जो माणुस अजुन जिवत शे, त्याले आशा ऱ्हास, पण जिवत कुत्रं मरी जायेल सिंहनापेक्षा चांगला ऱ्हास.
5 आपलाले मरनं शे हाई जिवंतसले समजस; पण मरेलसले काहीच समजस नही; त्यासले आणखी काही फळ भेटावं नही; त्यानं स्मरण कोणले ऱ्हास नही.
6 त्यासना प्रेमना, व्देष अनी मत्सर हाई आगोदरच नष्ट व्हई जायेल शेतस, अनी जे काही हाई जगमा करामा ई राहीना शे, त्यामा त्यासले परत जागा मिळावू नही.
7 तुना मार्गतीन जाय, आनंदमा तुनी भाकर खाय अनी आनंदमा द्राक्षरस पेय, कारण देवनी तुना चांगला काम साजरा कराकरता मान्यता देयेल शे.
8 तुना कपडा कायम शुभ्र राहावाले पाहीजे अनी तुना डोकाले तेलना अभिषेक ऱ्हावाले पाहीजे.
9 तुना ज्या व्यर्थ आयुष्यना दिन त्यानी तुला हाई जगमा देयल शेतस त्यामा, तुना बठा व्यर्थ दिनमा तुनी बायको जी तुले प्रिय शे तिनासंगे तु प्रेमतीन आयुष्य घालव. कारण आयुष्यमा अनी तुना उदयोगधंदामां पृथ्वीवर कष्ट करस तठेबी तुना हाऊच वाटा शे.
10 जे काही काम तुना हातमा ई ते बठे ताकदतीन कर, कारण ज्या कबरमा आपन जानार शेतस तठे काम, ईचार, ज्ञान अनी शहापन नही शे.
11 मी पृथ्वीवर बऱ्याच गोष्टी दख्यात, जोरमा पयनारा शर्यंत जिकस नही, ताकदवान लढाई जिकस आशे व्हस नही, शहानानी अन्न खावानं आशे व्हस नही, जो ज्ञानी शे त्यानावरच कृपा व्हस आशे नही, त्याना ऐवजी संधी अनी येळ याना बठासवर परीनाम व्हस.
12 कोनलेच त्याना मरानी येळ माहीत नही, जशा मासा मरानी जाळामा सापडस, नहीते फासामा आटकनारा चिडानामायक, तशेच जनावर, मनुष्यजात संकटना येळले तो त्यासनावर आचानक ई पडना मनजे तो फासामा आटकस.
बुध्दीमान अनी मुर्खसना ईचार
13 ज्ञानीबी मी हाई जगमा दखात अनी त्या माले महत्वना वाटनात.
14 एक धाकलं शहर व्हतं, एक मोठा राजानी त्या शहराना ईरोधमा लढाई करी अनी त्यानी त्याना ईरोधमा सेना शहरना आजुबाजूले ठेवात.
15 पण त्या शहरमा एक विद्वान व्हता, तो विद्वान गरीब व्हता, पण त्यानी आपला ज्ञानतीन त्या शहरना बचाव करा, बठं काही सरावर लोके त्या गरीब माणुसले ईसरी गयात.
16 मंग मी निर्णय लिधा, ताकदपेक्षा ज्ञान श्रेष्ठ शे पण गरीबना ज्ञानले तुच्छ मानतस अनी त्याना शब्द ऐकतस नही.
17 विद्वान मानुसनी शांततातीन सांगेल शब्द हाई मुर्खसना राजानी वरडीसन सांगेल शब्दसपेक्षा चांगला ऱ्हातस.
18 शहानपण हाई युध्दमासली तलवार अनी भाला यानापेक्षा चांगला ऱ्हास. पण एखादा पापी बऱ्याच चांगल्या गोष्टीसना नुकसान करस.