11
शहाणाना आचरन
1 तुनी भाकर पानीवर सोड कारण बराच दिनमा ती तुले परत भेटी
2 तु सात-आठ लोकेसले वाटी दे, कारण हाई जगमां कोनत्या वाईट गोष्टी व्हतीन हाई तुमले माहीत नही,
3 जर ढग पानीघाई भरेल व्हई तर ते पृथ्वीवर सोताले खाली करतस, जर झाड उत्तरकडे नहिते दक्षिणकडे पडनं मनजे ते जठे पडेल शे तठेच पडी राही.
4 जो वारा दखी राहास तो पेरणी कराव नही, जो ढगसना रंग दखी राहास तो कापणी कराव नही.
5 जशे वारा कताईन येस हाई तुले माहीत नही, मायना गर्भमा शरीर कशे वाढतस हाई जशे तुले कळस नही तशे बठं काही निर्मान करनारा देवना कार्यना आकलन तुले करता येवावू नही.
6 सकासले बिवारा पेरी दे, अनी संध्याकायले हात आवरानं नही, कारन त्यामाईन कोनतं फळ दि हाई नहिते दोनी मिळीसन चांगल व्हई हाई तुले माहीत नही.
7 प्रकाश खरच गोड शे, अनी सुर्य डोयाघाई दखाले आनंद वाटस.
8 जर माणुस कितलाबी वरीस जगना तरी त्यामा तो आनंद करो, अनी येनारा आंधारना दिनबी ईचार करो, कारण त्या बराच व्हतीन. जे बठं येस ते व्यर्थ शे.
तरुणले सल्ला
9 हे तरुना, तु आपला तरुनपनमा आनंद कर, तुना तरुनपनना दिनमा तुना मन तुले आनंदीत करो, अनी तुना मनले वाटी त्या मार्गतीन अनी तुना नजरमा ई तशे चाल; पण या बठया गोष्टीसनीबारामा देव तुना न्याय करी. हाई तुना ध्यानमा राहु दे.
10 आपला मनमाईन राग काढी टाक, आपला शरीरना दु:खंकडे ध्यान देवू नको, कारण तारुन्य अनी सामर्थ्य हाई व्यर्थ शे.