12
1 तु आपला तरुनपणना दिनमांसुध्दा आपला निर्मानकरतानी आठवन कर, वाईट दिन येवाना आगोदर अनी सांगशी, माले हाई दिनमा काहीच सुख नही.
2 त्या दिनमा सुर्य, चंद्र अनी तारा यासना प्रकाशनी आगोदर आंधार वाढी अनी पाणी पडावर काया ढग परत येतीन.
3 त्या येळले महालना पहारेकरी थरथर कापतीन अनी ताकदवान मानसे वाकी जातीन, अनी दयनाऱ्या बाया थांबी जातीन कारण त्या कमी शेतस, अनी ज्या खिडक्यासमाईन दखनाऱ्या शेतस त्यासले चांगल दखता येवावू नही.
4 त्या येळले जवय रस्तावरना दार बंद व्हतीन अनी घरटाना आवाज बंद व्हई जाई, तवय चिडासना आवाजवर लोकेसनी झोप उडी जाई, अनी सर्वा गायनस्वर बंद व्हई.
5 तवय माणुसले उचा ठिकाननी अनी रस्तावरनी पुढला धोकानी भीती वाटी, अनी बदामना झाड फुली, तवय टोळ सोतानीमोरे भारी वाटी, अनी तवय सहाजिकच इच्छा दुर्बल व्हई, तवय मानुस आपला अनंतकाळना घरले जाई, अनी शोक करनारा रस्तावर फिरतीन.
6 मंग चांदीना दोर तुटी, सोनाना वाटका फुटी जाई, झरानीजोडेना घागर फुटी जाई, हेरवरनी रहाट मुडी जाई.
7 ज्या ठिकानपाईन ती व्हई, माटी परत माटीले मियस अनी देवनी देयल आत्मा परत त्यानाकडे जाई.
8 व्यर्थ हो व्यर्थ, उपदेशक सांगस बठं काही व्यर्थ शे.
माणुसना कर्तव्य
9 उपदेशक ज्ञानी व्हता अनी तो लोकेसले ज्ञान शिकाडत गया, त्यानी इचार करीसन अनी शोध करीसन बराच बोधवचन रचात.
10 सरय लिखेल सत्य अनी मनोहर वचन दखाना उपदेशकनी प्रयत्न करेल शे.
11 बुध्दीमाणना शब्द आगनामायक ऱ्हास; सभापतीना शब्द ठोकेल खियानामायक ऱ्हातस; एकच मेंढपायपाईन ती मियेल शेतस.
12 मना पोऱ्या, यानाशिवाय दुसरा शिक्षणनाबारामा सावध ऱ्हाय, पुस्तक लिखाले अंत नही शे, बराच पुस्तकवाचन शरीरले थकाडस.
13 आते बठं काही तुम्हीन ऐका; हाई बठासना अर्थ एकच शे की देवले भ्याईसन ऱ्हाय, अनी त्यानी आज्ञा पाळ; माणुसन काम हाईच शे.
14 सर्वा बऱ्यावाईट गुप्त गोष्टीसना न्याय कराना येळले देव बठा कामन्या झडत्या ली.