4
1 मी परत एकदाव दखं, हाई जगमा जे काही जाचजुलूम चालतस ते मी दखं, दुखी लोकेसना आसु दखा, तठे त्यासले कोन सोडाई आशे कोनीच नही. त्यासवर ज्या जुलूम करतस त्यासनी हातमा ताकद शे; पण दुखी लोकेसले सोडावाले कोनीच नही.
2 त्याकरता मी ज्या मरी जायेल शेतस त्यासना अभिनंदन करस, ज्या आज जीवत शेतस अनी आज जगी राहीना शेतस, त्यासना नही.
3 ज्याना आजुन जन्म व्हयेल नही, ज्या हाई जगमा वाईट कृत्य करतस ते त्यानी आजुन दखं नही; तो त्या दोनीपेक्षा बरा शे आशे मी समजस.
4 मंग मी दखं तवय; बठा कष्ट अनी कारागीरना काम आशे शे, ज्यानामुये त्याना शेजारना हेवा करस. हाई बठं व्यर्थ शे अनी बिनकामनी कोशीस शे.
5 मुर्ख हातनी घडी घालीसन शांत बसी ऱ्हास अनं आपलाच शरीरना नाश करी लेस.
6 पण भरेल दोन मुठपेक्षा अनी बिनकामना प्रयत्न करापेक्षा आप आपला काम करीसन मुठभर कमाई करेल बरी शे.
7 मी परत बिनकामना गोष्टीसनाबारामा ईचार करं तवय हाई जगमासल्या बठया गोष्टी व्यर्थ शेतस.
8 तठे आशा प्रकारना माणुस शे, तो एकलाच शे, त्याले कोनीच नही, त्याले पोऱ्या किवा भाऊ नही. पण तठे त्याना कष्टले अंत नही, जे धन तो कमाडस त्यामा त्याले समाधान नही, तो स्व:तालेच ईचारस, एवढा कष्ट मी कोना करता करी राहीनु शे? मना जीवनना सुख हिसकाई ली राहीनू शे, हाई कोनाकरता? हाई व्यर्थ शे, कष्टमय शे.
9 एकपेक्षा दोन माणसे काम करनारा बरा शेतस; त्या एकजागे काम करीसन चांगल कमाडु शकतस.
10 जर एखादा पडना तर त्याना मित्र त्याले उचलस, पण जो एकलाच ऱ्हास अनी तो जर पडना त्याले उचलाले कोनीच ऱ्हास नही; त्यानामांगे कायम दु:ख ऱ्हास.
11 अनी जर त्या दोनी एकजागे झोपनात तर त्यासले ऊब लागस. पण एकलाले ऊब कशे लागी?
12 जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी दोर सहजा सहज तुटस नही.
13 गरीब पण शहाना तरूण हाऊ धैयडा अनी मुर्ख राजापेक्षा चांगला ऱ्हास; तो धैयडा राजा त्याले देल इशाराकडे ध्यान देस नही.
14 कदाचित तो तरूण राजा आपला राज्यमा गरीब जन्मना व्हई नहीते तुरुंगमाईन राज्य कराले बाहेर वना व्हई.
15 तरीबी, ज्या बठा ह्या जगमा चालतस त्यासले मी दखं, जो दुसरा तरूण त्यासना जागवर राजा म्हनीसन उभा राहिना त्या त्याले शरण गयात.
16 त्या बठा लोकेसवर तो अधिकारी व्हयना, त्याना अंत नही व्हता, तरी ज्या लोके मोरे येनार शेतस त्या त्याना ईषयी आनंद करावूत नही, खरच हाई व्यर्थ अनी बिनकामना उदयोग शे.