6
हाई जगमा मी आजुन एक संकट दखं, अनी ते माणुसनीकरता भलतं भारी शे; देव एखादा माणुसले भलतं संपत्ती, धनदौलत एवढी देस की त्याले जी इच्छा व्हई ते त्याले मियस, त्याले काहीच कमी पडाव नही. पण देव त्याले नंतर त्याना उपभोग लेवानी शक्ती देस नही, त्याना ऐवजी कोनतरी दुसराच बिन वयखना उपभोग लेस हाई व्यर्थ शे, भलतं वाईट शे. जर एखादा माणुसनी शंभर पोऱ्यासले जन्म दिधा अनी बराच वरीस जगना, त्याना आयुष्यना वरीस बराच राहीनात, त्याना जीवले सुख मियन नही अनी मानसन्मानतीन त्याले वाट लावं नही व्हई तर त्यानापेक्षा मरेल बाळ बरा शे, आशे मी सांगस. जशा तो जन्म व्हयेल बाळ बिनकामना शे, आंधारामा नाहीसा व्हस अनी त्यानं नाव लपेल ऱ्हास. त्यानी कवयच सुर्य दखा नही अनी त्याले काहीच माहित नही, त्याले त्या माणुसपेक्षा जास्त विसावा शे. तो माणुस दोन हजार वरीसबी जगना पण तो चांगल्या गोष्टीसना उपभोग लेवाले शिकना नही, मंग प्रत्येक झन ज्या जागवर जातस तठेच तो बी जाई.
मनुष्यना बठा कष्ट पोटकरता शेतस, तरी त्यानी भुक भागस नही. मुर्खपेक्षा शहानाले काय जास्त फायदा व्हस? तशेच जो गरीब राहीसन दुसरा लोकेसनीसंगे कशे वागानं हाई ज्याले समजस त्याले तरी काय फायदा व्हस? ज्या डोया दखीसन समाधान राहातस ते चांगलं शे, मन इकडे तिकडे भटकापेक्षा हाई बरं शे.
10 जे काही व्हयनं त्याना नाव पहिला पाईन ठेयेल शे अनी माणुस काय शे हाई समजाडेल शे, तो फक्त माटी शे त्यानापेक्षा जो समर्थ शे त्यानासंगे भांडन करता येस नही. 11 जास्त बोलावर त्याले काही अर्थ ऱ्हास नही, त्यामा मनुष्यले काय फायदा? 12 मनुष्य हाऊ ज्याले काही अर्थ नही आशे आयुष्य सावलीनामायक काढस, त्यामा त्याले काय फायदा हाई कोनले माहीत? कारण तो मरावर हाई जगमा काय व्हई हाई मनुष्यले कोण सांगी?