7
जीवननाबारामा ईचार
महागा सुंगधी द्रव्यपेक्षा चांगलं नाव ऱ्हावानं हाई बरं शे, जन्मदीनपेक्षा मरणना दिन बरा ऱ्हास.
मेजवानीना घर जावापेक्षा शोक करनारानी घर जायेल बरं ऱ्हास, कारन परतेक माणुसना शेवट हाईच शे, ज्या जिवत शेतस त्यासनी हाई मनमा राखी ठेवानं म्हनीसन जिवत हाई तुमना मनमा कायम राही.
हासी मजाक करापेक्षा शोक करानं चांगलं शे, दु:खी तोंड नंतर आनंदी व्हस.
ज्या शहाना राहातस त्यासना मन शोक घरकडे लागस, पण मुर्खना चित्त हसी मजाककडे लागस.
मुर्खसना गाना ऐकापेक्षा शहानासनी निषेधवानी ऐकेल बरं ऱ्हास
कारण मुर्खसना हासू भांडानीखाल जळेल काटाकुटासना कडकडनारामायक ऱ्हास; हाई व्यर्थ शे.
जुलूम करावर शहाना येडा बनतस; लाच लेवामुये बुध्दी भ्रष्ट व्हस.
एखादी गोष्टनी सुरुवात पेक्षा तिना शेवट व्हयेल बरा ऱ्हास. गर्व करनारा माणुसपेक्षा सहन करनारा माणुस बरा ऱ्हास.
मन उतावीळ व्हईसन राग येऊ देवानं नही, कारण राग मुर्खसना मनमा घर करीसन ऱ्हास.
10 या दिनपेक्षा आगोदरना दिन बरा व्हतात आशे काबर? आशे ईचारानं नही; हाई ईचारानं शहानापण नही शे.
11 मिळेल धनसंपत्तीनासंगे शहानापण राहीनं तर बरं ऱ्हास; कारण हाई जगमा जन्म व्हयेलसना हितना शे. 12 ज्ञान आश्रय देनारा शे अनी पैसाबी आश्रय देनारा शे; ज्ञानपाईन आशे फायदा ऱ्हास की ज्यानापाण शहानपण ऱ्हास तो त्याना जीव वाचाडस.
13 देवनी करनी दखा; त्यानी जे वाकडं करेल शे ते कोनीच सरळ करावूत नही? 14 जवय येळ चांगली राही तवय आनंद कर; पण जवय संकटमा सापडसी तवय विवेकतीन वाग; कारण माणुसनीमांगे काय व्हई हाई त्याले कळाले नको म्हनीसन देवनी सुखदूखले जोडे जोडे ठेयेल शेतस.
15 एखादा नीतिमान चांगल आचरन करीसनबी नष्ट व्हस; अनी एखादा दुष्ट वाईट वागीसनबी त्याले जास्त आयुष्य भेटस; हाई बठं मी मना व्यर्थ जायेल दिनमा दखेल शे. 16 तोंड देखल्या नीतिमान व्हवू नको; मर्यादानीबाहेर राहीसन शहानपण दखाडू नको; तु आपला नाश का बरं करी लेवानं? 17 दुष्टपना जास्त करु नको; मुर्ख बनु नको; तु पहिलेच काबरं मरानं? 18 याले तु धरी ऱ्हावान; अनी त्यानापाईन हात मांगे लेवान नही हाई बरं शे; कारण देवले जो घाबरीसन राहतस तो पार पडी. 19 नगरमासला दहा अधिपतीसपेक्षा जास्त रक्षण शहानाले शहानपण करस. 20 चांगला ईचारतीन वागनारा अनी पाप नही करनारा आशा नीतिमान माणुस हाई जगमा सापडस नही. 21 बोलेल बठा शब्दसकडे ध्यान देऊ नको; जर ध्यान दिधं तर तु तुना नोकरले शिव्याशाप देतांना ऐकशी; 22 कारण तु बी दुसरासले रोज शिव्याशाप देयल शेतस हाई तुले माहीत शे.
23 या बठया गोष्टी मी विवेकतीन आजमाडी दखेल शेतस; आपलाले बराच ज्ञान मियाले पाहीजे आशे माले वाटनं, पण ते मनापाईन दुर राहीनं. 24 जे शे ते बराच दूर अनी गुढ शे; त्याना शोध कोनले लागी? 25 ज्ञान अनी विवेक हाई समजीसन त्याना रहस्य वळखानं अनी त्याना शोध लावानं, अनी दुष्टपना हाई फक्त मुर्खपना शे अनी मुर्खपना हाई येडापना शे, हाई समजाले पाहीजे म्हनीसन मी परत मना चित्त या गोष्टीसकडे लाया.
26 माले मरनपेक्षा दु:ख वाटी आशी वस्तु सापडनी, ती म्हणजे पाशरुप बायी शे, तिना मन पारधीसना जाळा शे; तिना हात साखळी शेतस; जो मानूस देवले आवडस तोच तिना हातमाईन सुटस; पण पापी तिना हातमा सापडस. 27 उपदेशक सांगस; हिशोब दखाले गयू तवय गोळाबेरीज माले सापडनी ती आशी; 28 पण मी आजपावोत सापडाई राहीनू शे तरी माले सापडनी नही ती हाई शे; हजारसमां एक माणुस माले सापडना; पण तेवढया बायासमा माले ऐकबी बायी सापडनी नही. 29 दखा, माले एवढेच सापडनं की देवनी मनुष्यले सरळ आशे तयार करेल शे, पण तो बऱ्याच कल्पनासना मांगे लगी जायेल शे.
7:1 नीतिसूत्रे 22:1 7:9 याकोब 1:19