10
परमेश्वरना तेज यरुशलेमना मंदीरमाईन निघी जासं
1 मी दख तवय तो करुबनावरना छतवर तृणमनीनासारखा काही तरी दखयनं; ते सिंहना मूर्तीनामायक व्हतं.
2 मंग परमेश्वर तागना कपडा घालेल माणुसले बोलना, करुबानाखाल चाकना मजार जायीसनं करुबमाईन भितकासघाई आपली ओंजळ भर अनी ते नगरवर विखर, तवय तो मनासमोर गया.
3 तो माणसु मजार गया तवय करुब मंदीरना उजवीकडे उभा व्हतात अनी मजारना आंगण ढगघाई व्यापी टाकं व्हतं.
4 परमेश्वरनं तेज करुबवरतीन निघीसनं मंदीरना उंबरठावर येयल व्हतं; मंदीर ढगघाई व्यापी जायेल व्हतं अनी आंगण परमेश्वरनं तेजघाई भरी जायेल व्हतं.
5 करुबना पंखसना आवाज बाहेर आंगणमां जायी राहींनता; सर्वसमर्थ देवनी वाणीनामायक तो व्हता.
6 त्यानी शुभ्र तागना कपडा घालेल माणसुले आज्ञा दिसनं सांग की त्या चाकसमाईन, करुबना मजारतीन भितकं लेय; तवय तो जायीसनं चाकना बाजुले उभा राहीना.
7 मंग त्या करुबासमाईन एकनी आपला हात लांबाडीसनं करुबमासला ईस्तवले तो लावं; त्यानी त्यामाईन काही इंगळ लिसनं तागना कपडा घालेल त्या माणुसना हातमां दिद्; तो त्या लिसनं निघी गया.
8 तठे करुबनाजोडे त्यासना पखसनाखाल माणुसना हातना आकृतीनामायक काही तरी नजरमां व्हनं.
9 मी दख तवय परतेक करुबना बाजुले एक आशी बठया करुबना बाजुले चार चाके व्हतात; त्या चाके चमकनारा दखाई राहींनात.
10 दखावाले त्या चार चाकना डौलनामायक व्हतात; त्या जशे काय चाकनामांगे चाक आशे व्हतात.
11 त्या चालेत तवय चारी दिशाले पाहीजे त्या दिशासले जायेत; चालतांना वयेत नही; परतेक मस्तकना रोखतीन त्या जायेत, त्या चालेत तवय वयेत नही.
12 त्यासना बठा आंग, पाठ, हात, पख अनी चार चाके यासले बठीकडे डोया व्हतात.
13 चाकसले गरगर फिरनारा चाके आशे मी आयकं,
14 त्या परतेकले चार तोंड व्हतात; पहीले तोंड करुबना तोंडनामायक व्हतं; दुसरं माणुसना तोंडनामायक व्हतं; तिसरं सिंहना तोंडनामायक व्हतं अनी चौथ गरुडना तोंडनामायक व्हतं.
15 त्या करुब वर उडीसनं गयात; मी खबार नदीना काठले दख तो हाऊ प्राणी शे.
16 करुब चालनात मनजे चाके त्यानासंगे चालेत अनी जमीनवरतीन वर उडाकरता त्या आपला पख उचलेत तवय त्या चाके येगळा व्हयेत नही.
17 त्या थांबनात मनजे त्याबी थांबेत; त्या वर उडनात मनजे त्यानाबरोबर त्या वर जायेत; कारण त्या प्राण्यासना आत्मा त्यासमां व्हता.
18 तवय परमेश्वरनं तेज मंदीरना उंबरठावरतीन निघीसनं करुबनाजोडे जायीसनं राहीनात.
19 निंघाना येळले करुबनी आपला पख उचलात अनी त्या मनासमोर जमीनपाईन वर चढीसनं गयात; त्यानासंगे चाकबी गयात; त्या परमेश्वरना मंदीरना पुर्व दारपान थांबनात; त्यासनावर इस्त्राएलना देवना तेज व्हता.
20 खबार नदीना काठले मी इस्त्राएलना देवना आसननीखाल दख व्हतं तो हाऊ प्राणी शे; त्या करुब शेतस हाई माले कयनं.
21 त्यासले परतेकले चार तोंड व्हतात अनी त्यासले परतेकले चार पख व्हतात; त्यासना पखनाखाल माणसुनी हातनामायक आकृती व्हती.
22 त्यासना चेहरानीबारामां बोलशात ते खबार नदीना काठले मी दखेल चेहरानामायक त्या व्हतात. त्यासना रुप अनी त्या सोता तशाच व्हतात; त्या सरळ आपलासारखा चालेत.