9
यरुशलेमले दंड
1 मंग त्यानी माले आयकाले यी आशे जोरमां बोलना, नगरना राखणदारसवन, तुमी आपला बठा नाश करनारा हत्यार हातमां लिसनं ईकडे या.
2 तवय दख, उत्तरकडली वरनी वेशीना सवू माणसे आपला हातमां नाश करनारा हत्यार लिसनं ऊनात; त्यासनामां शुभ्र तागना कपडा घालेल एक माणुस व्हता; त्याना कंबरनाजोडे कारकुनी दऊत व्हती. त्या मजार जायीसनं पितळी वेदीनाजोडे उभा राहीनात.
3 करुबारढ इस्त्राएलना देवना तेज तठेन निघीसनं मंदीरना उंबरठावर ऊना; अनी कंबरनाजोडे कारकुननी दऊत ज्यापान व्हती अनी शुभ्र कपडा घालेल त्या माणसुले त्यानी हाक मारी.
4 परमेश्वर त्याले बोलना, नगरमाईन, यरुशेलममां जाईसनं ज्या माणसे आपलामां व्हयी राहेल बठा अमंगळ कृत्यासमुये उसासे टाकीसनं विलाप करी राहीना शेतस त्यासना कपायवर चिन्ह कर.
5 माले आयकाले यी आशे तो बाकीसले बोलना, त्यानामागे नगरमां जा अनी त्यासना नाश कर; कृपादृष्टी करानं नही अनी दया करानं नही;
6 धयडा, तरुण अनी कुवार्या, पोर्या अनी बाया हया बठासना कत्तल कर; पन ज्यासवर चिन्ह व्हयी त्यासले हात लावानं नही; मना पवित्रस्थानपाईन चालू करा; तवय मंदीरनासमोर ज्या वडील उभा व्हतात तठेन त्यासनी सुरुवात करी.
7 त्यानी त्यासले सांग, मंदीर भ्रष्ट करा; आंगण वधेलसघाई भरी टाका; चाला, निघा; तवय त्यासनी जायीसनं नगरना नाश करं;
8 त्यासनी आशी कत्तल चालू व्हती तवय मी सुटनूं अनी मी उपडा पडीसनं वरडीसनं बोलनू; हाय! प्रभु परमेश्वरा, तु यरुशेलमवर आपला क्रोधना वर्षाव करीसनं बठा इस्त्राएलना नाश करशी का?
9 तवय तो माले बोलना, इस्त्राएल अनी यहुदा यासना घराणाना अधर्म भलता भारी शे; देश रक्तपातना भरेल शे; नगर अन्यायघाई भरेल शे; कारण त्या म्हनतसं, परमेश्वरनी देशना त्याग करेल शे, परमेश्वर दखस नही.
10 मी तर कृपादृष्टी करावू नही, दया करावू नही, त्यासना आचरणं प्रतिफय त्यासना डोकावर टाकसू.
11 तवय दख; कंबरनाजोडे कारकूननं दऊत ज्यापान व्हतं अनी शुभ्र तागना कपडा घालेल तो माणुस परत यिसनं कळाडं की तुनी आज्ञापरमानं मी करेल शे.