परमेश्वरनीबारामां यहज्केलले दुसरं दर्शन
8
संदेष्टयाले यरुशलेमासला वाईट कृत्यसना दृष्टांत
सहावा वरीसले सहावा महीनाना पंचमीले आशे व्हयनं की मी मना घर बसेल व्हतूं अनी यहुदासना वडील मनासमोर बसेल व्हतात; तवय तठे परमेश्वरना सामर्थ्य मनावर ऊना. मी दख तवय एक माणसु शे आशे माले भास व्हयनं; त्यानां कंबरपाईन खाल आगना शे आशे माले भास व्हयनं अनी त्याना कंबरपाईन वर पितयना तेजनासारखा तेज माले दखायनं. तवय त्यानी हात पुढे करीसनं मनी डोकानी एक लट धरी, अनी आत्मातीन आकाश अनी पृथ्वीनी मजार माले उचलीसनं दिव्यदृष्टीतीन यरुशेलम आठे उत्तरले मजारमां आंगणना दारनाजोडे आणं; तठे जाळी टाकी आशी मुर्तीनं आसन व्हतं.
मंग दख, तवय मी खोरामां दृष्टांत दखं व्हतं त्यानासारखाच इस्त्राएलना देवना तेज तठे व्हतं. तवय तो माले बोलना, मानवपुत्रा, आपला डोया वर करीसनं उत्तर दिशाकडे दख, मी उत्तरले दृष्टी लायी तवय वेदीना वेशीना उत्तरले मंदीरना प्रवेशव्दारना रस्तामां आग तयार करनारी मुर्ती व्हती.
तो माले बोलना, मानवपुत्रा, त्या काय करी राहिना शेतस ते दखी राहीना ना? मी मना पवित्रस्थानमाईन दूर निघी जावाले पाहिजे म्हनीसनं आशी अमंगळ कृत्ये इस्त्राएल घराणं करी राहीना शे; यानापेक्षा जास्त अमंगळ कृत्ये तुले दखायतीन.
तवय त्यानी माले आंगणना प्रवेशना रस्तामां आणं; मी दख भितले छीद्र पडेल व्हतात. त्यानी माले सांग, मानवपुत्रा, भित खंद, मी भित खंदी तवय दखं तर; दार लागनं तवय तो माले बोलना, आठे हया माणसे कसाना दुष्ट अनी अमंगळ कृत्ये करी राहीना शेतस त्या दख. 10 मी मजार जायीसनं दख तवय सरपटणारा प्राणी, अमंगळ पशु अनी इस्त्राएल घराणान्या बठया मुरत्या त्यासना चित्र भितना चारीमेर काढेल व्हत्यात. 11 त्यासनासमोर इस्त्राएल घराणाना वडीलमासला सत्तर माणसे उभा व्हतात तवय त्यासनामां याजन्या बिन शाफान हाऊ उभा व्हता; त्या परतेक माणुसना हातमां धुपाटना व्हतात; तठे धुपना दाट धुरना धुराडा वर जाई राहींनता. 12 तो माले बोलना, मानवपुत्रा, इस्त्राएल घराणाना परतेक वडील आपला मुर्तीसना घरमां अंधारमां काय करी राहीना शे हाई तुले दखाई राहीना शे ना? त्या तर सांगतस की परमेश्वर आमले दखसं नही; परमेश्वरनी देशना त्याग करेल शे.
13 तो माले बोलना, त्या यानापेक्षा जास्त अमंगळ कृत्ये करी राहीना शेतस, त्या तुले परत दखावामां येतीन. 14 तवय त्यानी माले परमेश्वरना मंदीरना उत्तरले जो दरवाजा व्हता तठे आणं; तवय तठे बाया बसीसनं तम्मुजकरता शोक करी राहींनत्यात.
15 तो माले बोलना, मानवपुत्रा, तुले हाई दखास ना? हयानापेक्षा जास्त अमंगळ गोष्टी तुले दखायतीन. 16 तवय त्यानी माले परमेश्‍वरना मंदीरना मजारना आंगणमां लयी गया; तवय दख, परमेश्वरना मंदीरना दारपान देवडी अनी वेदीना मजारमां जवयपास पंचवीस माणसे परमेश्वरना मंदीरकडे पाठ करीसनं अनी पुर्वले तोंड करीसनं उभा व्हतात; त्या पुर्व दिशाले सुर्यनी उपासना करत व्हतात.
17 तो माले बोलना, मानवपुत्रा, तुले हाई दखास ना? यहुदाना घराणं आठे अमंगळ कृत्ये करी राहीना शे, हाई कमी व्हयनं का? देश जुलूमना कृत्यासघाई भरीसनं त्या माले परत परत राग आनाडी राहीना शेतस; दख, त्या आपला नाकाले फाटा लायी राहीना शेतस. 18 यामुये संतापमां मी जे करसू ते करसू; मी त्यासवर कृपादृष्टी करावू नही; त्यासवर दया करावू नही; त्या मोठा आवाजतीन मना कानपान आरोळया मारतीन तवय मी त्यासना आयकावू नही.