7
शेवट जवय येयल शे
1 आजुन परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं;
2 "प्रभु परमेश्वर इस्त्राएल देशले सांगस, "हे मानवपुत्र," शेवट व्हयेल शे, देशना चारी बाजुना अंत व्हयेल शे.
3 "आते तुना अंत व्हयेल शे, मी मना संताप तुनावर भडकावसू, तुनी करणीपरमानं तुनं न्याय करसू अनी तुना सर्वा अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू
4 मी तुनावर कृपादृष्टी करावू नही, मी दया करावू नही; तर तुना करणीना प्रतिफळ तुले दिसू, तुना अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुनामां दखाई तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
5 प्रभु परमेश्वर सांगस, विपत्तिमांगे विपत्ती यि राहीनी शे.
6 अंत व्हयेल शे, व्हयेल शे, तो तुनाकरता जागृत व्हयेल शे; दख, तो यि राहीना शे.
7 देशमासला रहीवास्या, तुनी घडी भरेल शे, काळ ऊना शे, दिन जोडे येयल शे, डोंगरवर आनंद नहीते धुमाकूळ व्हनार शे.
8 "आते मी संतापमां क्रोधना वर्षाव तुनावर करसू, मी मनी क्रोधनी परीपूर्ति तुनावर करसू, तुना आचरनपरमानं तुना न्याय करसू अनी तुना सर्वा अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू.
9 मी तुनावर कृपादृष्टी करावू नही; मी तुनी दया करावू नही; तर तुनं आचरणंनं प्रतिफळ तुले दिसू, तुना अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू. तवय तुले समजी की मी परमेश्वर तुले मारणार शे.
10 दख, तो दिन! दख तो यि राहीना शे! तुना शिक्षारुपी रोप उगवना शे, तो फोफाईसनं त्याना दंड बनेल शे, तो गर्वतीन फुगी जायेल शे.
11 बलात्कार हाई शासनदंड व्हयीसनं बसेल शे, त्या लोकेसमासला कोणीबी, त्यासना समुहमासला कोणीबी, त्याना धनमासला काहीबी, उराव नही; त्यासनी काहीच प्रतिष्ठा राहावावू नही.
12 येळ येयल शे, दिन जोडे येयल शे, ईकत लेनारानी आनंद कराले नको, ईकनाराले दुख व्हवाले नको; कारण त्या सर्वा समुहवर क्रोध यि राहिना शे.
13 ईकनारा जीवत राहिना तरी तो ईकेल जमीनपान परत जावावू नही; कारण हाई भविष्य त्या सर्वा समुहबद्दल शे; त्यामासला काहीच चुकावू नही; कोणीच आपला अधर्मतीन आपला जीवले बळकटी आणावू नही.
14 त्या करणा वाजाडतसं, बठी तयारी करतसं, तरी कोणीच युध्द कराले पुढे सरकतसं नही; कारण त्या समुहवर मना कोप व्हयेल शे.
इस्राएलला पापना दंड
15 बाहेर तलवार, मजारमां मरी अनी दुष्काळ; वावरमां ज्या शेतस त्या तलवारघाई मरतीन; नगरमां ज्या शेतस त्या दुष्काळ अनी महामारी त्यासले मारी टाकी.
16 त्यासमासला काही वाचतीन त्या वाचतीन, पण त्या सर्वा खोरामासला पारवासपरमानं डोंगरवर आपला अधर्ममुये फिरत राहातीन.
17 बठासना हात ढिला पडतीन, त्यानसा गुडघामां पाणी व्हयी.
18 त्या कंबरले गोणताट गुंडाळतीन, दरारा त्यासले व्यापी टाकी; त्या बठासनी तोंडवर लज्जा राही अनी सर्वासना डोका भादरतीन.
19 त्या आपला पैसा रस्तावर फेकी देतीन; त्यासले आपला सोना अमंगळ वाटी, परमेश्वरना कोपना दिन त्यासना सोनारुप्यासघाई त्यासना बचाव व्हवावू नही, त्यासपाईन त्यासनी जीवनी तृप्ती व्हवावू नही, त्यासनं पोट भरावू नही, कारण त्यासनी त्यामुये ठोकर खाईसनं अधर्म करेल शे.
20 त्यासनी त्यानी करेल भुषणे दिमाख दखाडाकरता वापरी; त्यासनी त्यानी अमंगळ मुर्ती अनी तिरस्करणीय वस्तु आपलाकरता बनाडयात; म्हनीसनं ते त्यासले अमंगळ वस्तुसनासारखा वाटाले पाहिजे अस मी करेल शे.
21 ते मी परदेशीसले भक्ष्य म्हनीसनं दिसू, ते जगमासला दुष्टासले लूट म्हनीसनं दिसू, त्या ते भ्रष्ट करतीन.
22 मी आपलं तोंड त्यासनापाईन फिरावसू, मनजे त्या लोके मना भांडार भ्रष्ट करतीन, लुटारु त्यामां घुशीसनं ते भ्रष्ट करतीन.
23 "बेडी तयार करा, कारण देश रक्तपातना गुन्हासघाई भरेल शे, नगर हिंसाघाई भरेल शे
24 त्याकरता मी वाईटमासाला वाईले लयी यिसू; त्या त्यासना घर ताबामां लेतीन; ज्या ताकदवान शेतस त्यासना ताठपणा तोडी टाकसू; त्यासना पवित्रस्थान भ्रष्ट करी टाकसू.
25 नाश यि राहीना शे; त्या शांती शोधतीन पण त्यासले सापडावू नही.
26 संकटवर संकट येतीन अनी अफवावर अफवा पसरतीन; तवय त्या संदेष्टासले दृष्टांत सांगाले सांगतीन पण याजकसना धर्मशास्रना ज्ञान अनी वडीलसना मसलत देवानं सामर्थ्य हाई नष्ट व्हतीन.
27 राजा शोक करतीन सरदार दराराघाई भ्याईतीन; देशमासला लोकेसना हात थरथर कांपतीन; मी त्यासना आचरणपरमानं त्यासनासंगे वागसू, त्यासना गुणपरमानं त्यासना न्याय करसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.