14
परमेश्वरकडतीन मुर्ती पुजा करणारासले इशारा
1 इस्त्राएलना वडीलसमाईन बराच माणसे मनाकडे यिसनं मनासमोर बसनात.
2 तवय परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
3 मानवपुत्रा, हया लोकेसनी आपला मनमां आपल्या मुरत्या वागाडेल शेतस; त्यासनी आपलं पापजनक अडखळण आपला नजरनासमोर ठेयेल शे; आशे लोकेसले मी तुमले प्रश्न ईचारु दिसू का?
4 हयाकरता त्यासनासंगे बोल, त्यासले सांग की परमेश्वर सांगस, इस्त्राएल घराणामासला जो कोनी आपला मनमां मुर्ती वागाडसं, आपलं पापजनक अडखळण आपली नजरसमोर ठेवसं अनी संदेष्टयासकडे येस त्यासले मना उत्तर त्याना मुर्तीना संख्याना मानतीन भेटी.
5 मी इस्राएल घरानाना मन वर परत कब्जा कराकरता असं करसु, कारण त्यासनी आपली मुर्तीसकरता माले सोडी देयल शे.
6 तरीबी इस्त्राएल घराणाले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, मांगे फिरा, आपल्या मुरत्यासपाईन फिरा अनी आपला बठा अमंगळ कर्मसपाईन तोंड फिरावा.
7 इस्त्राएलना घराणामासला अनी इस्राएलमां वस्ती करीसनं उपरीमासला जो कोनी मनापाईन येगळा व्हयीसनं आपला ह्दयमां मुर्ती वागाडसं, आपली पापनी ठोकर आपली नजरनीसमोर ठेवसं अनी माले प्रश्न ईचाराकरता संदेष्टयासकडे येस; त्याले मी सोता योग्य वाटी ते उत्तर दिसू;
8 मी त्यानापाईन तोंड फिराई लिसु; मी त्याले एक उदाहरण बना़डसु, मी त्याले आपली प्रजानी मंडळीमातीन काढी टाकसु, अनी तुमले समजी कि मीच प्रभु परमेश्वर शे.
9 “जर एखादा संदेष्टा धोकामां पडीसनं संदेश देत व्हयी तर समजानं की मी त्याले धोकामां पाडेल शे, मी मना हात त्यानावर उगारसू अनी मना लोक ज्या इस्त्राएल त्यासमाईन त्यासना नाश करसू.
10 प्रश्न करनारासना जशे दोष तशेच त्या संदेष्टासना दोष; त्या दोनी आपला दोषना फळ भोगतीन;
11 मनजे इस्त्राएल घराण मनापाईन बहकीसनं जावावून नही अनी आपला सर्व पातकसघाई सोताले ईटाळवू नही; तर त्या मना लोके व्हतीन अनी मी त्यासना देव व्हसू;” आशे परमेश्वर म्हणसं.
नोहा, दानिएल अनी याकोब
12 तवय परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
13 “मानवपुत्रा,” “एखादा देशनी ईस्वासघात करीसनं मनाईरोधमां पाप करं व्हयीते मी त्यानावर आपला हात चालाडसू, त्याना अन्नना आधार तोडसू; देशमां दुष्काळ पाडसू; अनी त्यामाईन माणुस अनी पशुसना नाश करसू.
14 तवय त्यामां नोहा, दानीएल अनी ईयोब हया तिन्ही राहीनात तरी बस व्हयनं; त्या आपला धार्मिकतामुये आपला तेवढा जीव वाचाडतीन अश परमेश्वर सांगस.
15 “मी देशमां हिंस्र पशू धाडीसनं तो उद्ध्वंस्त करं अनी त्या पशुमुये कोणी त्यामाईन येत जात नही एवढा तो निर्जन करी टाक.
16 तर प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, त्यामां त्या तिन्ही राहीनात तरी त्यासले पोर्यासना अनी पोरीसना बचाव करता येवावू नही; त्यासना मात्र निभाव लागी, पण बठा देश नष्ट व्हयी.
17 “मी देशवर तलवार आणीसनं सांग की, अरे तलवार देशवार फिर, अनी तिनी मनुष्यले अनी पशुसना नाश करी टाक.
18 तर प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, त्यामां त्या तिन्ही राहीनात तरी त्यासले पोर्यासना अनी पोरीसना बचाव करता येवावू नही; त्यासना मात्र निभाव लागी,
19 “मी त्या देशवर महामारी धाडी अनी त्यामाईन लोके अनी पशू यासना नाश कराकरता रंगतना रुपमां मना संतापना वर्षाव करी टाक.
20 तर प्रभु परमेश्वर सांगस, त्यामां नोहा, दानीएल अनी ईयोब हया राहीनात तरी त्यासले पोर्यासना अनी पोरीसना बचाव करता येवावू नही; त्या आपला धार्मिकतामुये फार तर आपला जीव वाचाडतीन.”
21 मंग मी तलवार, दुष्काळ, हिंस्र पशू अनी मरी हया मना चारी उग्र शासन यरुशेलममासला मनुष्य अनी पशू हयासना नाश कराकरता त्यासवर धाडसू; तवय त्यासना निभाव कशे लागी, आशे प्रभू परमेश्वर सांगस.
22 तरी दख, त्यानामां अवशेष राहातीन; त्या अवशिष्ट पोर्यासले अनी पोरीसले बाहेर आणतीन, दख, त्या तुनाकडे येतीन, तुमी त्यासना मार्ग अनी त्यासना कर्म दखशात; तवय मी यरुशेलमवर आणेल अनर्थ, त्यासवर आणेल बठा प्रसंग यानाबारामां तुमी सांत्वन पावशात.
23 तुमी त्यासना मार्ग अनी त्यासना कर्म दखशात तवय त्यामुये तुमनं सांत्वन व्हयी, अनी मी जे त्यासनं बठ काही करेल शे त्यामासलं काहीबी विनाकारण करेल नही शे हाई तुमले समजी, आशे प्रभु परमेश्वर सांगस.