15
द्राक्षवेलनं उदाहरण
1 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
2 “मानवपुत्र, जंगलमासला कोणता बी झाडनी फांदीनी काठीपेक्षा द्राक्षना वेलनी काठी कशी चांगली शे?
3 तिनं लाकूड कोणी कामले लावसं का? भांडा टांगी ठेवाले त्यान्या खुटया बनाडतसं का?
4 दख, ती आगमां सरपन म्हनीसनं टाकतसं, आगघाई तिना दोन्ही टोके जाळी टाकात अनी मधला भाग भस्म व्हयनाते ते कोणता काममां पडी?
5 दख ती शाबूत राहास तवय ती कोणताच कामले उपयोगमां पडसं नही, तर मंग आगघाई जाळीसनं तिना कोळसा व्हवावर तो कोणता काममा पडी?”
6 हयाकरता प्रभु परमेश्वर सांगस, वनवृक्षमासला द्राक्ष येलना आगमां सरपन म्हनीसनं टाकतसं त्यापरमानं यरुशेलमना निवासीसले आगमां टाकसू.
7 मी त्यासकडे तोंड फिरायी लिसू; त्या आगमाईन बाहेर पडनात तरी आग त्यासले खायी टाकी; मी त्यासकडे तोंड फिरायी लिसू; तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
8 त्यासनी ईस्वासघात करेल शे म्हनीसनं मी देश विराण करसू आशे प्रभू परमेश्वर सांगस.