16
यरुशलेम नगरना व्यभिचार
1 परत माले परमेश्वरनं वचन प्राप्त व्हयनं की,
2 “मानवपुत्रा,” “यरुशेलमनं अमंगळ कृत्य त्यासना ध्यानमां अनी देय.
3 आशे सांग, प्रभु परमेश्वर यरूशलेमले सांगस,
“तुना जन्म अनी उत्पती हया कनान देशमासला शेतस; तुना बाप अम्मोरी अनी तुनी माय हित्तीण व्हती.
4 तुना जन्मनाबारामां सांग तर तुना जन्म व्हयनं तवय तुनं नाळ कापी नही, तुले पाणीघाई धईसनं स्वच्छ करं नही, तुनं आंगले मीठ लावं नही अनी तुले बाळंतनमां गुंडाळं नही.
5 तुनी करुणा यिसनं यामासलं कोणतबी काम करानं आशी तुनावर कोणीच दयादृष्टी व्हयनी नही; तर तुनं जन्म व्हयनं तवय तुले अमंगळ समजीसनं वावरमां टाकी देयेल व्हतं.
6 “मी तुना जवयतीन जायी राहींनतू तवय तुले तुना रंगतमां लोळतांना दख, तवय मी तुले बोलनू; तु आपला रंगतमां लोळी राहीना शे तरी बी जीवत राहाय; आशेच मी तुले बोलनू.
7 वावरमासलं बीज वाढीसनं शंभर पट व्हसं तशी मी तुनी वृध्दी करी; तु वाढीसनं उची व्हयनी, तु भलती सुंदर व्हयनी, तुले ऊर फुटनं, तुना केस वाढनात तरी तु उघडीनागडी व्हती.
8 “मी तुना जवयतीन जायी राहींनतू तवय मी तुले दखनू, तवय ती येळ तुनी प्रेमविकासनी व्हती; तवय मी तुनावर पदर टाकीसनं तुनी नग्नता झाकी; प्रभु परमेश्वर सांगस, तवय मी शपथ लिसनं तुनासंगे करार करं तु मनी व्हयनी.
9 “मी तुनी पानीघाई आंघोळ करी, तुनावरना रंगत धयी काढ अनी तेलमां तुले मळी टाक.
10 तुले वेलबुट्टीना कपडा घालात, चांगला चामडानं चपला घालात, तुना डोकाले उत्तम तागना कपडाघाई गुंडाळं, अनी तुले रेशमी ओढणी पांघरी.
11 मी तुले दागिनासघाई सजाडं, तुना हातमा बांगडया घाल्यात अनी गळामां हार घालात.
12 मी तुना नाकमां नथ घाली, कानमां बाळया घाल्यात, तुना डोकाले उत्तम शिरोभुषण घालात.
13 तु सोनारुप्यासघाई नटली; तुना पेहराव उत्तम ताग रेशीम अनी जरतारी यासना व्हता; तुले जेवनले सपीठ, मध अनी तेल हया राहेत; तु अती सुंदर व्हती अनी राजवैभवले पोहंची जायेल व्हती.
14 तुनी सुंदरतामुये तुनी किर्ती राष्ट्रमां पसरनी; कारण मी तुले देयल तेजघाई तुनी सुंदरता अप्रतिम व्हयनी; आशे प्रभू परमेश्वर सांगस.
15 “तु तुना सौंदर्यावर भरवसा ठेयीसनं आपली किर्तीना जोरवर शिंदळकी करी, येवा जावाबरोबर शिंदळकीना सपाटा तु चालाडं; तुना सौंदर्य त्यासले लुटाले सापडनं.
16 तु आपला कपडा लिसनं रंगबेरंगी उच्च स्थान तुनाकरता सजाडं अनी कधी व्हयनं नही आशी शिंदळकी त्यासवर करी.
17 मी देयल सोनरुपासनं शोभवंत दागिना लिसनं तु त्यासन्या पुरुषमुरत्या कर्यात अनी त्यानासंगे शिंदळकी करी.
18 तु आपली वेलबुट्टीना कपडा लिसनं त्यास घालात, मी देयेल तेलना अनी धुपना तु त्याले नैवेदय दखाडं.
19 मी भाकर, सपीठ, तेल अनी मध हाई तुले देयेत अनी तुले खावाडेत; ती बी तु त्यानामोरे सुगंध म्हनीसनं अर्पण करे; हाई आशे घडसं आशे प्रभू परमेश्वर सांगस.
20 “आजुन तुले मनापाईन पोर्या अनी पोरी व्हयन्यात, ती तु लिसनं त्यासले खाई टाकाकरता बळी म्हनीसनं अर्पण करं; हया तुन्या शिंदळक्या तुले पुरेशा व्हयन्यात नही.
21 म्हनीसनं मना पोर्यासले मारीसनं त्यासन्या मुरतीसकरता आगमां होम करं का?
22 हया बठया अमंगळ कृत्य अनी शिंदळक्या करतांना तु दाखलपणमां उघडीनागडी व्हती तवय तु आपला रंगतमां लोळी राहींनती यानी तुले कधीच आठवण व्हनी नही.”
यरुशलेमनं जीवन वेशानामायक
23 तु हाई दुष्कर्म करावर प्रभु परमेश्वर सांगस, तुले धिक्कार असो! तुले धिक्कार असो! आशे व्हयनं की,
24 तु तुनाकरता कमानदार घर बांधी टाकं, रस्ता रस्तासमां तु आपलाकरता उच्च स्थान बनाडात.
25 तु रस्तासना नाका नाकासवर आपला उच्च स्थान बनाडी टाकात; आपली सुंदरता भ्रष्ट करी, वनात - गयात सर्वासनामोरे आपला पाय पसारीसनं मनसोक्त व्यभिचार करं;
26 मोठा आंगना तुना शेजारना मिसरी लोके यासनासंगे तु व्यभिचार करं; माले चिडावाकरता तुनी मनसोक्त शिंदळकी करी.
27 “तर मंग दख, मी तुनावर हात उगारीसनं तुनं कायमनं अन्न कमी करं अनी ज्यासले तुनी शिंदळकी लज्जास्पद वाटसं त्या तुना व्देष करनारा पलिष्टीसन्या पोरीसना हातमां तुले देतीन.
28 “तुनी तृप्ती म्हनीसनं कवयच व्हसं नही, त्या करता तु अश्शुर्यासनीसंगेबी व्यभिचार करं; हा, त्यासनासंगे तुनी व्यभिचार करं तरी तुनी तृप्ती व्हयनी नही.
29 व्यापार्यासना मनजे खास्दयासना देश तठेपावोत तुनी मनसोक्त शिंदळकी चालाडी तरीबी त्यानाघाई तुनी तृप्ती व्हसं नही.”
30 प्रभु परमेश्वर सांगस, “तु निर्लज्ज वेश्याना कामनामायक हाई बठ करं; तुनं मन कितलं दुर्बल शे!
31 नाका नाकासवर तुनी आपलाकरता कमानदार घरं बांधातं; अनी रस्ता-रस्तासवर तुनी उच्च स्थान बनाडात; पन तुनी व्यभिचारना वेतननी पर्वा करी नही; आठे तुनी वेशानी रीत सोडी.
32 तु तर नवराले सोडीसनं दुसरा माणुसनीसंगे सहवास करनारानीमायक शे.
33 लोके वेशाले पैसा देतसं पन तु उलट आपला बठा प्रेमीसले पैसा देसं! त्यासनी चारीमेरतीन यिसनं तुनासंगे व्यभिचार कराले पाहीजे म्हनीसनं तु त्यासले लालूस दखाडसं.
34 तुनी व्यभिचारनी रीत दुसर्या बायासनी उलट शे, एखादा व्यभिचारी माणसु तुनामांगे येस नही, तुले कोणी पैसा देस नही, तर तु उलट त्यासले पैसा देस; हाई तुनं वागनं येगळं शे.”
यरुशलेमवर देवना न्याय
35 त्याकरता आये वेश्या, परमेश्वरनं वचन आयकं,
36 प्रभु परमेश्वर सांगस, तु आपला पैसा उडाई टाकं, आपला प्रेमीसनीसंगे व्यभिचार करीसनं आपली लाज दखाडी; तु आपली मुर्तीनासंगे अमंगळ कृत्य करात अनी आपला पोर्यासना रंगत त्यासले अर्पण करं.
37 त्याकरता हाई दख, ज्यासले तु खुश करं, प्रेमपात्र अनी व्देषपात्र आशे ज्या तुना बठा प्रेमी, त्यासले मी चारीमेरतीन तुना ईरोधमां जमा करसूं; त्यासनामोरे तुनी लाज उघडी करसू मनजे त्या तुनी बठी लाज दखतीन.
38 व्यभीचारणी अनी रक्तपात करनार्या बाया यासनं न्याय करतसं तशे मी तुनं न्याय करसू अनी ईर्ष्यातीन अनी क्रोधतीन मी तुनं रक्तपात करसूं.
39 मी तुले त्यासना हातमां दिसु, मनजे त्या तुना कमानदार घरं नष्ट करतीन, तुना उच्च स्थान पाडी टाकतीन, तुना कपडा हिसकाईसनं अनी तुना दाग दागिना काढीसनं तुले उघडी बिनकपडासना करतीन.
40 त्या तुना ईरोधमां मंडयीले जमा करीसनं तुले दगडमार करतीन अनी आपल्या तलवारीसघाई तुले भोसकतीन.
41 त्या तुना घरं आगघाई जायी टाकतीन अनी बर्याच बायासनीदेखत तुले शिक्षा करतीन; हाई परकारतीन तुनी शिंदळकी बंद करतीन, अनी यानामोरे तु कोणले पैसा देवावू नही.
42 तवय तुनावरना मना संताप शांत करसू, तुनाईषयी मनी ईर्ष्या कमी व्हयी, मी शांत व्हसू, परत संताप करावू नही.
43 तु आपला तरूणपणना दिनना आठवण ठेवसी, हाई बठ करीसनं तुनी माले चिडावं, म्हनीसनं दख, प्रभु परमेश्वर सांगस, तुनं अनाचारनं प्रतिफळ मी तुनं माथी लावसू; मनजे तुन्या दुसर्या बठया अमंगळ कृत्यासमां आजुन पापना भर तु टाकावू नही,
जशी माय तशी पोर
44 दख, म्हण सांगणारा बठा तुनाबारामां सांगतीन जशी माय तशी पोर,
45 आपला नवरानी अनी पोर्यासना धिक्कार करनारी तुनी माय तिनी तु पोर; आपला नवरानी अनी पोर्यासना धिक्कार करनार्या तुन्या बहीणी त्यासनी तु बहीण; तुनी माय व्हती हित्तीण अनी बाप व्हता अमोरी.
46 “तुनी डावी बाजुले तुन्या पोरीसनीसंगे राहानारी शोमरोन ती तुनी मोठी बहीण अनी तुनी उजवी बाजुले आपल्या पोरीसनीसंगे राहानारी सदोम हाई तुनी धाकली बहीण.
47 तु त्यासना मार्गतीन अनी त्यासना अमंगळ कृत्यासपरमानं थोडी चालनी आशे नही, तर तु आपला बठा आचरण त्यानापेक्षा भ्रष्ट करं.
48 “प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, तु अनी तुन्या पोरीसनी जशे वर्तन करं तशे तुनी बहीण सदोम हिनी अनी तीन्या पोरीसनी करं नही.
49 दख, तुनी पोर सदोम हिनं पाप यापरमानं व्हतं; गर्व, अन्ननी विपुलता अनी आयीष आराम हाई तिले अनी तिन्या पोरीसले व्हती; दरीद्री अनी गरजवंतसले यासले तिनी हात दिद् नही.
50 त्यासनी अहंकारी व्हयीसनं मनासमोर अमंगळ कृत्य करात, ती दखीसनं त्यासले हाकली दिद्.
51 “शोमरोनीने तर तुनापेक्षा आरधा पापबी करात नही; तु आपला अमंगळ कृत्य त्यानापेक्षा जास्त करात, तु करेल अमंगळ कृत्यासना मानतीन तुन्या बहीणी निर्दोष ठरन्यात.
52 तु आपल्या बहीणीसले आपलापेक्षा निर्दोष ठरावं यानी तुले लाज वाटो; तु त्यानापेक्षा घोर पाप करामुये तुना मानतीन त्यासले निर्दोष समजाले पाहिजे; तुन्या बहीणी जास्त नीतीमान शेतस हाई तुनी दखाडं, म्हनीसनं तु लज्जीत अनी फजीत होवो.”
सदोम अनी शमरोननी परत स्थापना
53 मी सदोम अनी तिन्या पोरीसना, अनी शोमरोन अनी तिन्या पोरीसना, अनी त्यासनामां तुना धरी लयी जायेल लोकेसलेबी लयी यिसू.
54 मनजे तुले लाजना काळींबा लागी, ज्या तुना बठया कृत्यासघाई त्यासना मनले समाधान प्राप्त व्हयनं त्यासनाबारामां तु लज्जित व्हशी.
55 तुन्या बहीणी, सदोम अनी तिन्या पोरी परत आपली पहीली दशामां येतीन. शोमरोन अनी तिन्या पोरी परत आपली दशामां येतीन; तु अनी तुन्या पोरी परत आपली पहीली दशामां येतीन.
56 तु तुना तोरामां व्हती तवय; तुनी बहीण सदोम हिनं नावसुध्दा तुनं तोंडमां नही व्हतं.
57 अरामी बाया अनी तिना आसपासना बठा अनी तुले तुच्छ माननर्या पलिष्टी बाया यासनी तुनी अप्रतिष्ठा करी, त्या येळले तुनी दुष्टता प्रकट व्हयनी, तशी आजपावोत प्रकट व्हयनी नही.
58 तु तुना दुष्कर्मना अनी अमंगळ कृत्यासना फळ भोगी राहीनी शे, आशे परमेश्वर सांगस.
एक करार कायम राही
59 प्रभु परमेश्वर सांगस, “तु सोता वाहेल शपथले तुच्छ मानीसनं आपला करार मोडं; तु जशे करं तशे मी तुनं करसू.
60 तरी मी तुना तरुणपणमां तुनासंगे करेल करारनी आठवन करीसनं तुनासंगे सर्वकायनं करार करसू.
61 तु तुन्या मोठल्या बहीणी अनी धाकल्या बहीणी यासले आपलं करशी तवय तु तुन्या आचरणनं आठवन करीसनं लज्जित व्हशी. अनी त्या तुनी करेल करारमासल्या नही व्हतीन तरीबी त्या पोरी म्हनीसनं दिसू.
62 मी तुनासंगे मना करार स्थापन करसू तवय तुले समजी की मी परमेश्वर शे.
63 तु जे बठ करं त्यानी मी क्षमा करसू, मनजे तुला त्यानी आठवण व्हयीसनं तु लज्जित व्हशी अनी अप्रतिष्ठामुये तु परत आपलं तोंड उघडावू नही,” आशे प्रभु परमेश्वर सांगस.