17
गरुड अनी द्राक्षवेलनं दृष्टांत
1 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
2 “मानवपुत्रा,” इस्त्राएल घराणाले कोडे घाल; हाई दृष्टांत कथन कर;
3 त्यासले आशे सांग, प्रभु परमेश्वर सांगस, मोठला पखसना, लांब पिसारासना अनी चित्रविचित्र पिसासना आशे एक मोठ गरुड लबानोन पर्वतवर ऊना; त्यानी गंधसरुनी शेंडाकडली एक फांदी तोडी लिदी.
4 त्यानी त्यामासली अगदी वरनी फांदी तोडीसनं व्यापार्यासना देशमां लयी गया अनी सौदा करनारासना एक शहरमां लायी दिदी.
5 त्यानी देशमासला बाकीना बीवारा लिसनं ती पिकावू जमीनमां पैयरी, वाळुज लावतसं तशे ते बराच पानीनाजोडे लावं.
6 ते वाढीसनं त्यानी आखूड पन पसरेल अशी द्राक्षलता व्हयनी; तिन्या फांदया गरुडकडे झुकेल राहीसनं तिना मुळा त्यानाखाल जायेल व्हतात; ती वाढीसनं मोठा द्राक्ष व्हयनात; तिले फाटा फुटनात अनी पाला ऊना.
7 दुसरा एक मोठा गरुड व्हता, त्याले बराच पिसे व्हतात अनी मोठला पखं व्हतात; दख, त्यानी लायेल वाफासमां आपलाले पानी मिळाले पाहिजे म्हनीसनं त्या द्राक्षीनी आपला मुळा त्यानाकडे वाकाडात अनी आपला फाटा त्यानाकडे झुकाडात.
8 त्या रोपसले फाटा फुटीसनं त्याला फळ यावाले पाहिजे अनी भव्य द्राक्षी यावले पाहिजे म्हनीसनं तो एक सुपीक मळामां बराच पानीजोडे लायेल व्हतं.
9 “प्रभु परमेश्वर सांगस, सांग बरं, ती जीव धरी का? ती सुकी जावाले पाहिजे म्हनीसनं तिले मुळनासंगे उपाडीसनं तिना फय तोडी टाकावूत नही का? तिना बठा पाला सुकाई जातीन; तिना मुळा उपडाले जास्त ताकदनी नाहिते बराच लोके लागावूत नही.
10 दख, तिनी लावणी व्हयनी तरी जीव धरी का? पुर्वकडला वारा तिले लागना मनजे ती सुकावू नही का? ती ज्या वाफामां वाढनी तठेच ती मरी जाई.”
दृष्टांतना अर्थ
11 परत परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की
12 “या बंडखोर घराणाले सांग, या गोष्टी काय शेतस हाई तुमले समजत नही का? त्यासले सांग की दखा, बाबेलना राजानी यरुशेलममां यिसनं तिना राजा अनी तिना सरदार यासले धरं अनी आपलाकडे बाबेल आठे आणं;
13 तवय त्यानी राजवंशमासला एक माणसुले निवाडीसनं त्यानासंगे करार करं अनी त्यानाकडतीन प्रतिज्ञा करी लिदी; त्या राष्ट्र नीच व्हावाले पाहिजे; त्यानी आपल डोकं वर करानं नही; जर त्यानां करार त्यानी पाय तर ते कायम राहावाले पाहिजे, म्हनीसनं त्यानी बठा कर्ता माणससले बी लयी गया.
14 हयानाकरता की त्या राष्ट्र नीच राहावाले पाहीजे, त्यानी आपलं डोकं वर कराले नही पाहीजे, पन त्याना करार पाळावर ते कायम राहावाले पाहीजे.
15 पण त्यानी त्यासनाईरोधमां फितुरी करीसनं मिसर देशनी आपलाले घोडे अनी बराच लोके दयावाले पाहिजे म्हनीसनं त्यानाकडे आपला जासुद धाडात. त्याले यश भेटी का? ज्यानी आशा गोष्टि कर्यात तो निभावेल का? त्यानी करार मोडेल शे तरी बी तो निभावले का?
16 “प्रभू परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, ज्यानी त्याले राजा करं, ज्यानासंगे करेल आणभाक त्यानी तुच्छ मानी, ज्यानं करार त्यानी मोडं, त्या राजानं निवासस्थानमां, बाबेलमां तो मरी.
17 जवय बराच जणसना फडशा उडावाकरता शत्रु मोरचे लावतीन अनी बुरुज बांधतीन तवय युध्दना येऴले फारोना मोठा सैनिक अनी बराच लोके संगे लिसन त्यानी कुमक करता येवावू नही.
18 त्यानी शपथ तुच्छ मानीसनं करार मोडं; दख, त्यानी हातवर हात मारं तरी त्यानी हाई बठ करं; तो निभावनार नही.”
19 त्याकरता परमेश्वर सांगस, “मनी जीवनी शपथ, त्यानी मनी प्रतिज्ञा तुच्छ मानी; त्यानी मना करार मोडं यानं प्रतिफळ मी त्याना डोकावर टाकसू.
20 मी मना जाळं त्यानावर टाकसू; तो मना फासामां सापडी; मी त्याले बाबेलमां लयी जासू; त्यानी मनासंगे करेल ईस्वासघातबारामां तठे मी त्यानी झडती लिसू.
21 त्याना बठा सैन्यमासला पयनारा त्या बठा तलवारघाई पडतीन; ज्या उरतीन त्यासनी चारीमेर दाणादाण व्हयी; तवय तुमले समजी की मी परमेश्वर हाई बोलनू शे.”
परमेश्वरनी प्रतिज्ञा
22 प्रभु परमेश्वर सांगस,
मी उची गंधसरुना शेंडावरनी एक फांदी तोडीसनं ती लावसू,
त्यानी वरनी कोवळी फांदीमासली एक लिसनं
ती एक मोठा उचा पर्वतवर लावसू.
23 मी इस्त्राएलना उचा पर्वतवर ती लावसू;
तिले फाटा फुटतीन, फळे येतीन,
तिना उत्तम गंधसरु व्हयी;
मनजे मंग त्यानाखाल बठया चिडासनी जाती राहातीन,
त्याना फाटासना सावलीमां त्या राहातीन.
24 जंगलमासला बठा झाडसले कयी की
मी परमेश्वर
उचा झाडसले नीच करेल शे
अनी नीचासले उचा करेल शे,
हिरवा झाडसले सुकाडेल शे
अनी सुकेल झाडसले फलद्रूप करेल शे;
मी परमेश्वर हाई बोलनू शे अनी मी हाई करेल बी शे.