18
वैयक्तीक जबाबदारी
परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की
बापनी आंबट द्राक्ष खादात
अनी पोर्‍यासना दात आंबनात, हाई म्हण तुमी इस्त्राएल देशमां वापरतसं ती का?
“प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ,” हाई म्हण इस्त्राएलमां यानामोरे तुमी वापरानं नही. दख, बठा जीव मना शेतस, बापना जीव तशे पोर्‍यानं जीव मना शे, जो जीव आत्मा पाप करसं तो मरी.
धार्मिक माणसे कोणले म्हणशात जो न्यायतीन अनी धर्मतीन वागस, डोंगरवर जेवण करतसं नही, इस्त्राएल घराणासना मुर्तीसकडे डोया लावतसं नही, आपली शेजारनी बाईले भ्रष्ट करसं नही,‍ पाळी येयल बाईऩाजोडे जात नही. कोणवर जुलूम करस नही, कर्जदारनं गहाण त्याले परत करसं, कोणले लूटसं नही, ज्या भुक्या शेतस त्यासले जेवण देस अनी ज्या उघडा शेतस त्यासले कपडा देतसं, वाढीदिढी करसं नही, व्याज लेस नही, वाईटपाईन आपला हात आवरसं, माणुस माणुसमां सत्य निर्णय करसं. मना नियमपरमानं चालसं, अनी मना निर्णय पाळीसनं सत्यतीन वागसं; तोच धार्मिक शे; तो नक्की वाची, आशे प्रभू परमेश्वर सांगस.
10 “तरी बी त्याले बलत्कारी अनी खुनशी पोर्‍या व्हयना. अनी बापनी हयापैकी कोणतच काम कर नही जर पोर्‍यानी त्यामासलं एकबी काम करं. 11 त्यानी डोंगरवर जेवण करं, आपली शेजारनी बाईले भ्रष्ट करं, 12 लाचार अनी दुबळा यासवर जुलूम करं, एखादाले लुटं, कर्जदारनं गहाण त्याले परत करं नही, मुर्तीकडे दख, अमंगळ कृत्य करं, 13 वाढीदिढी करी, व्याज लिद्, मंग आशे माणूस वाची का? तो वाचावू नही; त्यानी हाई बठा अमंगळ कृत्ये करेल शेतस; तो नक्की मरी, त्यानी करेल रक्तपात त्यानावरच उलटी. 14 परत दख, त्याले आशे पोर्‍या व्हयना की बाप जे पाप करसं ती तो दखसं, तरी ते दखीसनं तो सोता तशे करसं नही, 15 तो डोंगरवर जेवण करसं नही, इस्त्राएल घराणानी मुर्तीकडे दखसं नही, आपली शेजारनी बाईले भ्रष्ट करसं नही, 16 कोणवर जुलूम करसं नही, कर्जदारनं गहाण आडावसं नही, कोणले लुटसं नही, ज्या भुक्या शेतस त्यासले अन्न देस अनी ज्या उघडा शेतस त्यासले घालाले कपडा देस, 17 गरीबसले हानी करापाईन आपला हात आवरी धरसं, वाडीदिढी करसं नही, व्याज लेस नही, मना निर्णय पायस, मना नियमपरमानं चालसं, तो आपला बापना पापमुये मरावू नही, तो नक्की वाची. 18 त्याना बापनी बारामां सांगशात ते त्यानी जुलूम करं, आपला भाऊले लुटं अनी आपला लोकेसवर अत्याचार करं, त्यामुये दख, तो आपला अधर्मतीन मरी.
19 “तरी तुमी म्हणतसं, बापना पापना भार पोर्‍यानी का बर वाहावानं नही? हाई दख, पोर्‍या न्यायतीन अनी धर्मतीन वागना, त्यानी मना बठा नियम पाळीसनं त्यापरमानं वर्तन करं तर तो नक्की वाची. 20 जो जीवआत्मा पाप करी तोच मरी, पोर्‍या बापना पापना भार वाहावू नही, अनी आपला बाप आपला पोर्‍याना पापना भार वाहावू नही, धार्मिकले त्याना धार्मिकतीन फळ भेटी; दुष्टले त्याना दुष्टतीन फळ भेटी,
21 “तरीबी दुष्ट त्यानी करेल बठा पापसपाईन फिरीसनं मना बठा नियम पाळी अनी तो नीतीतीन अनी धर्मतीन वागना तर तो नक्की वाची, मरावू नही. 22 त्यानी करेल कोणतच पाप त्याना हिशोबमां धरता येवावू नही, त्यानी करेल धार्मिकतीन तो वाची, 23 प्रभु परमेश्वर सांगस, दुष्ट मरावर माले आनंद व्हसं का? त्यानी आपला मार्ग सोडीसनं वाचाले पाहीजे यावरतीन माले आनंद व्हसं ना?
24 “तरी बी धार्मिक आपली धार्मिकता सोडीसनं दुष्कर्म कराले लागना अनी अधार्मिकना बठा अमंगळ आचरणपरमानं वागाले लागना, तर तो वाची का? त्यानी करेल बठी धार्मिकता हिशोबमां धरता येवावू नही, त्यानी करेल भ्रष्टाचार अनी त्यानी करेल पाप यामुये तो मरी.
25 “तरी तुमी सांगतसं, प्रभुना मार्ग न्यायी नही, हे इस्त्राएल घराणा, आयकी लेय, मना मार्ग न्यायी नही का? तुमनाच मार्ग न्यायी नही शेतस, आशे नही का? 26 एखादा धार्मिक आपली धार्मिकता सोडीसनं दुष्कर्म करसं अनी त्यानामुये मरसं तर तो आपला करेल दुष्कर्मतीन मरसं. 27 दुर्जन त्यानी करेल आपला दुष्टाईपाईन दूर व्हयीसनं नीतीतीन अनी धार्मिकतीन वागी तर तो आपला जीव वाचाडी. 28 तो आपला करेल बठा पाप ध्यानमां आणीसनं वळी तर तो नक्की वाची, मरावू नही. 29 तरीबी इस्त्राएल घराणं‍ म्हणसं, देवना मार्ग न्यायी नही, हे इस्राएल घराणा, मना मार्ग न्यायी नहीत का? तुमनाच मार्ग न्यायी नहीत, हाई नही का?
30 “प्रभु परमेश्वर सांगस, हे इस्त्राएल घराणा, मी तुमना परतेकना ज्याना त्याना मार्गपरमानं न्याय करसू, तुमी फिरा, आपला बठा पापपाईन मांगे फिरा, मनजे तुमना अधर्म तुमले अडथळा व्हावाऊ नही. 31 तुमी आचरण करेल बठा दुराचार टाकी दया; तुमनामां नवीन ह्दय अनी नवीन आत्मा स्थापन करा; हे इस्त्राएल घराणा तुमीन का बरं मरतस? 32 कारण प्रभु परमेश्वर सांगस, मरनारासना मृत्युमुये माले आनंद व्हस नही; तर मांगे फिरा अनी जीवत राहा.”
18:2 यिर्मया 31:29 18:9 लेवीय 18:15 18:20 अनुवाद 24:16