19
विलापगीत
आते तु इस्त्राएलसना सरदारसकरता विलाप कर,
तु आशे सांग, तुनी माय कोण? ती सिंहीण व्हती,
ती सिंहसमां राहात व्हती, ती तरुण सिंहसमां आपला बच्चासना देखभाल करं;
तिनी आपला बच्चासपैकी एकले वाढावं, ते वाढीसनं तरुण सिंह व्हयना अनी शिकार कराले शिकना,
तो माणुसले खावाले लागना.
राष्ट्रसनी त्यानाबारामां आयकं;
त्यासनी करेल खड्डामां तो आडकी गया;
त्यासनी त्याले वेसण घालीसनं लयी गयात.
आपली आशा भग्न व्हयीसनं नष्ट व्हयनी हाई तिनी दख
तवय तिनी आपला दुसरा एक बच्चा लिसनं त्याले वाढावं
अनी त्याले तरुण्यावस्थामां आणं.
तो सिंहसमां हिराफिराले लागना. तरुण सिंह व्हयना
अनी शिकार कराले सिकना,
तो माणसेसले भक्ष कराले लागना.
त्यानी त्यासना वाडा उद्ध्वस्त करात अनी त्यासना नगर उजाड करात;
त्यानी गर्जनाना शब्दघाई देश
अनी त्यामासला सर्वा काही ओसाड व्हयी गये.
आजुबाजूना येगयेगळा प्रांतमासला राष्ट्र त्यानावर उठनात;
त्यासनी त्यानावर आपला जाळा टाकात;
त्यासनी करेल खड्डामां तो आडकी गया.
त्यासनी त्याले वेसण घालीसनं पिंजरामां कोंड
अनी बाबेलना राजाकडे लयी गयात.
इस्त्राएलना डोंगरवर
त्याना शब्द परत आयकाले येवाले नको
म्हनीसनं त्याले दरीमां टाकी दिदी.
10 तुनी माय तुनी आबादानीमां पानीनाजोडे लायेल द्राक्षीनामायक व्हती;
पानीना विपुलतामुये ती सफळ व्हयीसनं तिले बराच फाटा फुटनात.
11 अधिपतीसना राजवेत्रे तयार व्हतीन
आशे मजबूत फाटा वनात;
त्या उचा वाढीसनं ढगना वर गयात
अनी बराच फाटासहीत ती उंचीमां मोठया दखाई राहींनत्यात.
12 तवय तिनावर संताप व्हयीसनं
तिले उपाडीसनं जमीनवर पाडामां ऊनं;
पुर्वकडला वारा वाहीसनं तिना फळ करपनात,
तिना मजबुत फाटा मोडीसनं सुकाई गयात;
आगघाई त्या खाक व्हयी गयात.
13 आते तिले जंगलमां रुक्ष
अनी निर्जल जागवर लायेल शे.
14 तिना शाखासना फाटासमाईन आग निघीसनं
त्यानी तिना फये खाई टाकेल शेतस;
आते अधिकार चालाडनारासना राजदंड व्हयी
आशे एकबी मजबूत फाटा राहीनात नही;
हाई विलापगीत शे अनी विलापकरता राही.