20
परमेश्वरनी इच्छा अनी माणुसनी अवज्ञा
1 सातवा वरीसना पाचवा महीनाना दशमीले आशे व्हयनं की इस्त्राएलना काही वडील प्रश्न ईचाराकरता यिसनं मनासमोर बसनात,
2 तवय परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
3 "मानवपुत्रा," "इस्त्राएलना वडीलसनीसंगे बोल, त्यासले सांग, प्रभु परमेश्वर आशे सांगस, तुमी माले प्रश्न ईचाराले येयल शेतस का? प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, मी तुमले माले प्रश्न ईचारु देवावू नही.
4 "तु त्यासनं न्याय करानं नही का? मानवपुत्रा, तु त्यासना न्याय करानं नही का? त्यासले त्यासना वडीलसना अमंगळ कृत्य विधित करं.
5 त्यासले सांग प्रभु परमेश्वर सांगस, ज्या दिन मी इस्राएलले निवाडी लिद्, याकोब वंशकडे हात करीसनं मी शपथ लिदी, मिसर देशमां मी त्यासले प्रकट व्हयनू; हात उचलीसनं मी त्यासले शपथपुर्वक सांग की मी परमेश्वर तुमना देव शे.
6 त्या दिन मी हात उचलीसनं, त्यासनासंगे शपथ लिदी की, मी तुमले मिसर देशमाईन काढिसनं दुधमधना प्रवाह वाहातसं आशे तुमनाकरता दखेल देशमां लयी यिसु; तो देश बठा देशसमां मुकूटमणी शे.
7 तवय मी त्यासले सांग, तुमी सर्वासनी तुमनी नजरमां प्रिय आशा अमंगळ वस्तु फेकी देवानं अनी मिसर देशन्या मुर्तीसघाई सोताले विटाळ व्हवू देवानं नही; मी परमेश्वर तुमना देव शे.
8 तरीबी त्यासनी मनासंगे फितुरी करी अनी मना आयकनात नही; त्यासनी नजरमां त्यासले प्रिय आशा तठेन्या अमंगळ वस्तु फेकात नही; मिसर देशमासल्या मुर्त्याबी त्यासनी सोडयात नही; तवय मिसर देशमां त्यासनावर मनी संतापनी वृष्टी व्हावाले पाहिजे; मना कोप त्यासनावर परा व्हावाले पाहिजे, आशे मी सांग.
9 तरी मना नावकरता, ज्या राष्ट्रासमां त्या राही राहींनतात त्यासनासमोर आपलं नावनं आपमान व्हावाले नको, म्हनीसनं मी हाई काम करं; मी त्यासले मिसर देशमाईन काढीसनं त्या राष्ट्रासनासमोर त्यासले प्रकट व्हयनु.
10 "मी त्यासले मिसर देशमाईन काढीसनं जंगलमां आणं.
11 मी त्यासले नियम लायी दिद्, मना निर्णय त्यासले दखाडी दिदात, हाई जो कोणी पाळी तो त्यापरमानं वाची.
12 आजुन त्यासनामां अनी मनामां चिन्ह व्हावाकरता मी त्यासले आपलं शाब्बाथ दिद; ते हयानाकरता की मी परमेश्वर त्यासले पवित्र करं आशे त्यासले समजाले पाहिजे.
13 तरीबी रानमां इस्त्राएल घराणानं मनासंगे फितुरी करी, ज्यानं पाळामुये माणुस वाचसं; त्या मना नियमपरमानं चालनात नही, मना निर्णय त्यासनी टाकी दिदात अनी मना शाब्बाथ भलत भ्रष्ट करं; तवय रानमां त्यासनावर आपली क्रोधनी वृष्टी करीसनं त्यासनं नाश करानं आशे मी सांग.
14 तरीबी ज्या राष्ट्रासनादेखत मी त्यासले बाहेर आणं त्यासनादेखत आपलं नावनं आपमान व्हावाले नही पाहिजे म्हनीसनं आपलं नावकरता आशी कृती करी.
15 आजुन मी हात उचलीसनं रानमां अशी शपथ लिदी की दुधमधनं प्रवाह जठे वाही राहीना शेतस अनी जो बठा देशना मुकूटमणी शे आशे देश मी त्यासले देयल व्हतुं, तठे मी त्यासले आणाऊ नही.
16 कारण त्यासनं मन त्यासना मुर्तीसनीसंगे जुडामुये त्यासनी मना निर्णय टाकी दिदात; त्या मना नियमपरमानं चालनात नही, अनी त्यासनी मनी शपथ भ्रष्ट करी.
17 "तरीबी मी त्यासनावर कृपादृष्टी करीसनं त्यासनी दया करी, रानमां त्यासना नाश करं नही, त्यासना पुरा शेवट करं नही.
18 तशेच रानमां त्यासना वंशसले बोलनू, तुमी आपला वडीलसना नियमपरमानं चालू नका, त्यासना निर्णयले अनुसरानं नही, अनी त्यासन्या मुरत्यासघाई सोताले ईटाळू नका;
19 मी परमेश्वर तुमना देव शे, मना नियमले धरीसनं चाला; आपला निर्णय पायीसनं त्यापरमानं वागा.
20 मना शाब्बाथ पवित्र माना, मनजे ते तुमनामां अनी मनामां चिन्ह व्हतीन अनी तुमले समजी की मी परमेश्वर तुमना देव शे.
21 "तरीबी त्या वंशनीबी मनासंगे फितुरी करी; जे पायामुये माणुस वाचसं, त्या मना नियमपरमानं चालनात नही; त्यासनी मना निर्णय टाकी दिदात, मना शाब्बाथ त्यासनी भ्रष्ट करं; तवय रानमां त्यासनावर मनी क्रोधनी वृष्टी करीसनं त्यासनावर मना कोप पुरा व्हावाले पाहिजे आशे मी बोलनू.
22 तरीबी ज्या राष्ट्रासनादेखत मी त्यासले बाहेर आणं त्यासनादेखत आपलं नावनं आपमान व्हावाले नही पाहिजे म्हनीसनं मी आपला हात आवरा; आपलं नावकरता आशी कृती करी.
23 आजून त्यासनी राष्ट्रासामां पांगापांग करसूं अनी त्यासले देशोधडीले लावसू आशी प्रतिज्ञाबी मी रानमां हात उचलीसनं करी.
24 कारण त्यासनी मना निर्णय पायात नही; मना नियम टाकी दिदात, मना शब्बाथ भ्रष्ट करी टाक; अनी त्यासनी नजर त्यासन्या वडीलसनी मुरतीसकडे लागनं.
25 "तवय जे चांगल नही आशे नियम मी त्यासले दिदात, ज्यानाघाई त्या वाचावूत नही आशे निर्णय त्यासले दिदात.
26 मी त्यासनी नासधुस करामुये त्यासले आशे कळी की मी परमेश्वर शे; मी त्यासले त्यासना यज्ञ अर्पणनाबारामां आशे भ्रष्ट करी टाक की त्यासनी गर्भमाईन निघेल पहिलं आगमां होमं करी टाक.
27 "म्हनीसनं हे मानवपुत्रा, इस्त्राएलना घराणानीसंगे बोल, अनी हाई सांग; प्रभु परमेश्वर आशे सांगसं, परत फिरीसनं तुना पुर्वजसनी मनासंगे ईस्वासघात करीसनं मना अपमान करं; ते आशे.
28 मी मना हात उचलीसनं शपथ लिसनं देयल देशमां त्यासले आणं तवय त्यासनी उचा टेकडया अनी परतेक दाट सावलीना झाड दखीसनं तठे आपला यज्ञबलीना अर्पण करात; तठे राग यि आशे अर्पण त्यासनी करात; तठे त्यासनी सुवासिक धुप जाळात अनी तठेच त्यासनी आपला पेयार्पण वाही टाकात.
29 तवय मी त्यासले बोलनू; तुमी ज्या उचा ठिकानले जातसं ते कसानं शे? आजपावोत त्याले बामा (उंचवट) आशे बोलत ऊना शेतस.
30 म्हनीसनं इस्त्राएल घराणाले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, तुमी आपला बापना मार्गले लागीसनं सोताले विटाळंतसं, अनी अनाचार करीसनं त्यासन्या अमंगळ वस्तुसनामांगे लागतसं.
31 अनी आपला अर्पण वाहीसनं अनी आपला पोर्यासना आगमां होम करीसनं आपल्या बठया मूर्तीसकडतीन आजपावोत सोताले विटाळत ऊना शेतस; आशे राहीसनं बी मी तुमले प्रश्न ईचारु दिसू का? प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ मी तुमले प्रश्न ईचारू देवावू नही.
32 तुमी म्हनतसं, राष्ट्रासमां, देश देशमासला लोकेसपरमानं आम्ही दगडनी मुर्तीनी पुजा करसतू; हाई जे तुमी मनमा तरंग उडावतसं ते सिध्दीस जावावू नही.
परमेश्वर दंड देस अनी माफबी करसं
33 "प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, मी शक्तीशाली बाहूघाई, उगारेल हातघाई अनी कोपवृष्टी करीसनं तुम्हनावर राज्य करसू.
34 मी प्रबळ बाहूघाई, उगारेल हातघाई अनी कोपवृष्टी करीसनं तुमले राष्ट्रसमाईन लयी यिसु; ज्या देशमां तुमनी पांगापांग व्हयेल शे तठेतून मी तुमले एकजागे करसू.
35 अनी मी तुमले राष्ट्रसना रानमाईन आणीसनं तठे तुमनासंगे समक्ष वाद करसू.
36 मी मिसर देशना रानमां तुमना वाडवडीलसनीसंगे वाद करं तशे तुमनासंगे वाद करसू, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
37 "तुमले काठीखालतीन चालाडीसनं करारबध्द करसू;
38 बंडखोर अनी मनासंगे फितुरी करनारा यासले मी तुमनापाईन येगळं करसू; त्या थोडाच येळ वस्ती करीसनं शेतस त्या देशमाईन त्यासले बाहेर लयी जासु; पन इस्राएल देशमां त्यासनं येणं व्हवावू नही; मनजे तुमले समजी की मी परमेश्वर शे."
39 म्हनीसनं प्रभु परमेश्वर आशे म्हणसं, हे इस्राएलना घराणा, जा, तुले पाहिजे त्या मुरत्यासनी पुजा कर; पन पुढे तुमी नक्कीच म्हना आयकशात, अनी आपला अर्पणघाई अनी मुरतीसघाई म्हनं पवित्र नावले बट्टा लावावूत नही.
40 तर तुमी मना पवित्र पर्वतवर, इस्राएलना उचा पर्वतवर, इस्राएलन सर्वा घराणा, त्यामासला बठा जण, आपला देशमां मनी सेवा करतीन, आशे प्रभु परमेश्वर सांगस, तठे मी त्यासना अंगीकार करसू; तठे तुमनाजोडे अर्पण, तुमना श्रेष्ठ अर्पण, समर्पित करेल बठया वस्तु मी मांगसू.
41 मी तुमले राष्ट्रसमाईन बाहेर आणसू अनी ज्या देशमां तुमनी पांगापांग व्हयेल शे तठेतीन तुमले जमा करसू; तवय मी सुंगधपरमानं तुमनं स्विकार करसू, अनी तुमनामां मनी पवित्रता विदेशी राष्ट्रसमां प्रकट व्हयी.
42 जो इस्राएल देश मी हात वर करीसनं तुमना वडीलले दिद् तठे मी तुमले आणसू तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
43 ज्य तुमना मार्गतीन अनी ज्या तुमना बठा कर्मतीन तुमी सोताले विटाळेल शे, त्यासनी तुमले आठवन यि अनी ज्या तुमी सर्व दुष्कर्म करात त्यामुये तुमी सोताले वीट मानशात.
44 हे इस्राएल घराणा, प्रभु परमेश्वर सांगस, तुमना कुकर्मपरमानं, तुमना भ्रष्ट कृत्यासपरमानं नही ते मना नावकरता मी तुमनामां करनी करसू, तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
दक्षिणना ईरोधमां भविष्यवाणी
45 परमेश्वरनं वचन माले परत प्राप्त व्हयनं;
46 मानवपुत्रा, दक्षिणकडे आपलं तोंड कर, दक्षिणकडे आपली वाणीनं ओघ वाहू देय अनी दक्षिणनां मैदानमां वननीबारामां संदेश देय.
47 दक्षिणना वनले सांग, परमेश्वरनं वचन आयक, प्रभु परमेश्वर सांगस, दख, मी तुनामां आग पेटाडसू, तो तुनामासला परतेक हिरवा झाड अनी परतेक शुष्क झाड भस्म करी; धगधगनारा जाळं ईझावू नही अनी तिनामुये दक्षिणना अनी उत्तरना बठा तोंड पोळतीन.
48 मी परमेश्वरनी तो अग्नी पेटाडेल शे आशे बठा माणसे समजतीन; तो ईझावू नही.
49 मी सांग, अहा! प्रभु परमेश्वर; लोके मनाबारामां सांगतस, हाऊ दृष्टांत सांगनारा नही का?