2
तो माले बोलना, मानवपुत्रा, तु तुना पायवर उभा राहाय, मनजे मी तुनासंगे बोलसू, तो मनासंगे बोली राहींनता तवय आत्मानी मनामां परवेश करीसनं माले मना पायवर उभं करं तवय त्यानं बोलनं माले आयकू व्हनं; तो माले बोलना, हे मानवपुत्रा, मी तुले इस्त्राएल वंशकडे, मनासंगे झगडा करणारा राष्ट्रसकडे धाडसं त्यासनी अनी त्यासना वाडवडीलसनी आजपावोत मना ईरोधमां वागेल शेतस. हया त्यासना वंशज उध्द्ट अनी कठीण ह्दयना शेतस; मी तुले त्यासनाकडे धाडी राहीनू; प्रभू परमेश्वर आशे सांगस हाई त्यासले सांग. त्या तुना आयकोत किंवा नही आयकोत, निदान त्यासनाकडे कोणीतरी संदेष्टा जायेल व्हता हाई त्यासले समजी; त्या तर बोली चालीसनं फितुरी व्हयी जायेल शेतस.
हे मानवपुत्रा, तुना आजुबाजूले काटाझुडपा अनी काटा राहीनात तरी, तु इचुसमा राहाशी तरी त्यासले भिऊ नको, त्यासना शब्दसले भ्यावनं नही, ती फितुरी जायी राहीनी शे, तरी त्यासना शब्दले भिवानं नही; त्यासना चर्येले भिवानं नही; त्या आयकोत किंवा नही आयकोत; तु मना वचन त्यासले सांग; त्या तर भलता भांडखोर शेतस;
हे मानवपुत्रा, मी सांगस ते आयक, त्या फितुरी जातपरमानं तु फितुरनामायक होऊ नको; तुनं उघाड अनी मी देस ते खाय; मी दख तवय मनाकडे एक हात पुढे वना, अनी दख, त्या हातमां ग्रंथना पट व्हता; 10 तो त्यानी मनासमोर पसारं; त्यानावर पाठपोट लिखेल व्हतं अनी त्यामा विलाप, शोक अनी दुख हयानाबारामां लिखेल व्हतं.