22
यरुशलेम नगरना अपराध
1 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयन की,
2 "मानवपुत्रा," "तु न्याय करशी ना? त्या खुनी नगरीना न्याय करशी ना? त्या येळले तिले तिना बठा अमंगळ कृत्य दखाड.
3 तिले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, आये नगरी, तुना काय येवाले पाहिजे म्हनीसनं तु आपलामां रक्तपात करस, अनी सोताले विटाळ कराकरता मुर्ती करस.
4 सोता पाडले रंगतघाई तु आपलाला दोषी करं, तु करेल मुर्तीघाई सोताले विटाळ; तु आपला काय जोडे आणं, तुना वरीस भरी जायेल शेतस, म्हनीसनं मी तुले राष्ट्रसना निंदाले, बठा देशना थटाले पात्र करसू.
5 तु अभद्र नावनी अनी बेबंदपणतीन भरेल नगरी शे हाई समजीसनं जोडेना अनी दुरना तुना उपहास करतीन,
6 दख, इस्त्राएलना बठा सरदार आप आपला बाहुबलपरमानं रक्तपात कराकरता तुनामां राहेल शेतस.
7 तुमनामां लोके मायबापले तुच्छ मानतसं, तुनामां त्या परदेशीवर जुलूम करतसं, तुमनामां त्या अनाथ अनी विधवासवर अत्याचार करतसं,
8 तु मन्या पवित्र वस्तुसले तुच्छ मानस, तु मना शाब्बाथ अपवित्र मानी राहीना शेतस.
9 तुनामां रक्तपात कराकरता लुचा लोके राही राहीना शेतस, त्या तुना डोंगरवर मेजवानी करतसं, तुनांमा बदलफैलीमां चालतसं.
10 तुनामां त्या बापनी लाज उघडी करतसं, पाळी येयल बाई दुर बशेल व्हती तवय तिनावर बलात्कार करतसं.
11 तुनामां कोणीबी आपली शेजारनी बाईनीसंगे अघोर कर्म करसं, कोनी आपली सुननीसंगे शरीरसंबध करीसनं तिले भ्रष्ट करसं, कोनी आपली बहीनले, कोनी आपला बापनी पोरले भ्रष्ट करसं.
12 तुनामां रक्तपात कराले पाहिजे म्हनीसनं त्या लाच लेतस, तु व्याजबटा करस, जुलूम करीसनं आपला शेजारीले त्रास देस अनी माले ईसरेल शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस,
13 म्हनीसनं हयामुये, तु अन्यायतीन करेल कमायीमुये, अनी तुनामासला रक्तपातमुये मी मना हात उपटी राहीनू शे.
14 मी तुना समाचार लिसू त्या दीन तुन मन टिकावू धरावू नही का? तु हात दृढ राहातीन का? मी परमेश्वर हाई जे बोलेल शे ते मी करसुच.
15 मी राष्ट्रसमां तुनी पांगापांग करसू, देश देशमां तुनी दाणादाण करसू अनी तुनी अशुध्दता नष्ट करसू.
16 तु राष्ट्रासदेखत आपला कर्मतीन अपवित्र ठरशी; तवय तुले समजी की मी परमेश्वर शे.
परमेश्वरना राग
17 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
18 मानवपुत्रा, इस्त्राएलना घराणां मनी नजरमां फक्त गाळ व्हयी जायेल शे, भट्टीमासला पितय, कथील, लोखंड अनी शिसा यानासारखा त्या सर्वा शेतस; त्या रुप्यामासला गाळ व्हयी जायेल शेतस.
19 हयामुये प्रभु परमेश्वर सांगस, तुम्ही सर्वा गाळ व्हयेल शेतस; म्हनीसनं दख, मी तुमले यरुशेलममां एकजागे करसू.
20 रुपे, पितय, लोखंड, शिसा अनी कथील लोके भट्टीमां टाकतसं अनी ती ईतवळाकरता आगमां फुकी तापाडतस, तशे मी मना क्रोधघाई अनी संतापतीन तुमले जमा करसू अनी भट्टीमां ईताळसू.
21 मी तुमले जमा करीसनं मनी क्रोध आगना फुंकर तुमनावर घालसू, ज्यामुये तुमी भट्टीमां ईतळी जाशात.
22 रुपे भट्ठीमां ईतळतसं तशे तुमी यरुशलेमां ईतळी जाशात, तवय तुमले समजी की मी परमेश्वरनी आपला संताप तुमनावर वतेल शे.
इस्राएल सरदारसना पाप
23 मंग परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
24 मानवपुत्रा, हाई भुमीले सांग, क्रोधनां दिनमां ज्या शुध्दी न पावेल अनी पर्जन्यवृष्टी नही व्हयेल तु भुमी शे.
25 तठे संदेष्टयानी एकोपा करेल शे; भक्ष्या फाडीसनं खानारा गरजना करनारा सिंहपरमानं त्या लोकेसना प्राण ग्रासी टाकतीन; त्या धन अनी पैसा लयी जातसं; त्या तिना विधवासनी संख्या वाढवतसं.
26 तिना याजक मना धर्मशास्रना नियम मोडीसनं मन्या पवित्र वस्तु भ्रष्ट करतसं; पवित्र अनी अपवित्र यासमां त्या काही भेद ठेवतसं नही; शुध्द अनी अशुध्द यासना फरक त्या शिकाडतसं नही; त्या मना शब्बाथनीबारामां डोयाझाकपना करतसं; त्यासनामां मना अपमान व्हसं.
27 तिनामासला सरदार भक्ष्य फाडीसनं खानारा लांडगानामायक शेतस; त्या अन्यायतीन कमाई कराकरता रक्तपात करतसं; मानव जातनं विनाश करतस.
28 तिना संदेष्टा कच्चा चुना त्यासनाकरता वापरतसं; मिथ्या दृष्टांत दखीसनं त्या त्यासले खोटा शकून सांगतसं अनी परमेश्वर सांगस नही तरीबी परमेश्वरनी सांगेल शे आशे त्या सांगतसं.
29 देशमासला लोके बलत्कार अनी चोरी करतसं; त्या दुर्बल अनी दारीद्रयासले दाबी टाकतसं अनी परदेशीसवर अन्याय अनी जुलूम करतसं.
30 मी भुमीना नाश नही कराले पाहिजे म्हनीसनं तिनामां कोनी तट बांधी, कोनी मनासमोर देशकरता खिंडमां उभा राही की काय यानी मी वाट दखी, पन कोनीच माले तशे दखायनं नही.
31 यामुये मी त्यासनावर आपला क्रोधना वर्षाव करसू; मी आपला कोप आगघाई त्यासले भस्म करसू; त्यासना आचरणना प्रतिफय त्यासना माथी आणसू आशे परमेश्वर सांगस.