23
दोन व्यभिचारी बहीणी
1 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं ते आशे,
2 “मानवपुत्रा,” दोन बाया व्हत्यात, त्या एकच मायन्या व्हत्यात;
3 त्यासनी मिसर देशमां व्यभिचार करं; त्यासनी आपला तरुणपनमां व्यभिचार करं; तठे त्यासना स्तन दाबामां ऊनात; त्यासना कौमार्या अवस्थामां माणसेसनी त्यासना स्तन दाबात.
4 त्यासमासली मोठीनं नाव अहला व्हतं अनी तिनी दाखली बहीननं नाव अहलीबा व्हतं; त्या मन्या व्हयन्यात अनी त्यासले पोर्या अनी पोरी व्हयन्यात; त्यासना नाव दखात तवय (तिना डेरा) मनजे शोमरोन अनी अहलीबा (मना डेरा तिनाजोडे शे) मनजे यरुशेलम.
5 अहला मनी व्हती तवय तिनी महापाप करी वेशापन करं, ती आपली जार, आपली शेजारीन अश्शुरी हिनावर आसक्त व्हयनी.
6 त्या निया कपडा घालनारा व्हतात अनी त्या अधिपती अनी नायब अधिपती व्हतात, त्या बठा सुंदर अनी तरून राहीसनं रुबाबदार व्हतात.
7 त्या बठा निवडक अश्शुरी माणसे राहीसनं त्यासनासंगे ती वेशापन कराले लागनी, अनी ज्या बठासवर ती मोहीत व्हयनी त्यासन्या बठया मुर्तीसघाई भ्रष्ट व्हयनी.
8 मिसर देशमासली आपला वेशापन तिनी सोडी नही; तठेना माणसेसनी तिना तरुणपनमां तिनासंगे गमन करं; त्यासनी तिना कौमार्या आवस्थामां स्तन दाबात अनी तिनासंगे मनसोक्त व्यभिचार करी टाकं.
9 यामुये मी तिले तिना प्रेमीसना हातमां दिद्; ज्या अश्शुरी माणसेसवर ती आसक्त व्हयेल व्हती त्यासना हातमां तिले दिद्.
10 त्यासनी तिले नग्न करं, तिना पोर्या अनी पोरीसले लयी पळनात; तिले तलवारघाई मारी टाकं; तिनं नाव बायासनी तोंडमां व्हयनं; कारण त्यासनी तिले शिक्षा करी.
11 तिनी बहीन अहलीबा हिनी दख, तरीबी ती तिनापेक्षा जास्त भ्रष्ट व्हती; तिनी आपली बहीनपेक्षा जास्त व्यभिचार करं.
12 शेजारना अश्शुरी माणूस अधिपती अनी नायब अधिपती, अनी उचा कपडा घालेल रुबाबदार व्हतात, त्या बठा सुंदर तरुणसवर ती मोहीत व्हयनी.
13 मी दख तवय तिबी भ्रष्ट व्हयनी; त्या दोनीसनं वर्तन सारखाच व्हतं.
14 "तिनी आपला व्यभिचारनं क्षेत्र वाढाई टाक; तिनी भितवर माणसेसना चित्र काढेल दखात, ती सेंदुरघाई काढेल खास्दयासना चित्र व्हतात.
15 त्यासना कंबरले पट्टा राहीसनं डोकामां उचा अनी रंगीत पागोटी व्हती; त्या बठा माणसे वीरपरमानं राहीसनं त्यासना ढब खास्दी देशमासला बाबेलना माणसेसपरमानं व्हतं; या माणसेसनी जन्मभुमी खास्दी देश व्हता.
16 तिनी नजर त्यासनावर गयी तवय ती त्यासनावर मोहीत व्हयनी अनी तिनी त्याले बलावाले खास्दी देशमां जासुद धाडात.
17 तवय बाबेलना माणसे तिना सजाडेल पलंगवर तिनाजोडे गयात, त्यासनी तिनासंगे व्यभिचार करीसनं तिले भ्रष्ट करी टाक, त्यासनी समागमातीन ती भ्रष्ट व्हयनी, तवय तिनी आपला मन त्यासनावरतीन काढी लिद्.
18 आशे तिनी आपलं व्यभिचार मांड अनी आपली काया उघडी करी; तवय जशे तिनी बहीनवरतीन मन उडेल व्हतं तशे तिनावरतीन उडंन.
19 तरीबी तिनी आपला तरुणपनमां मिसर देशमां वेशावृत्ती चालाडी व्हती; तिनं तिले आठवन व्हयीसनं तीनी आजुन आपला व्यभिचार वाढाई टाक.
20 ती आपला प्रेमीसवर आसक्त व्हयनी, त्यासना अवयव तर गधडासना अवयवनामायक व्हतं अनी त्यासना माज घोडासना माजनासारखा व्हता.
21 हाई परकारं तरुनपनमां मिसरी माणसे तुना कौमार्यादशामां दाबेत त्या येळनी शिंदळकीनी तुले आठवन व्हनी.
दाखली बहीणले परमेश्वना दंड
22 "म्हनीसनं, आये अहलीबे, प्रभु परमेश्वर म्हनसं दख, ज्या तुना प्रेमीसवरतीन तुनं मन उडेल शे त्याले मी तुनाईरोधमां उठाडसू, त्याले तुनावर चारीमेरतीन आणसू;
23 बाबेलना माणसे, बठा खास्दी, पकोड, शोआ अनी कोआ आठेना माणसे अनी अश्शुरी माणसे, ज्या बठा सुंदर तरुण, अधिपती अनी नायब अधिपती, वीर अनी मंत्री शिलेदार शेतस; त्यासले तुनावर आणसू.
24 त्या शस्रे, रथ, चाकसना वाहान, येगयेगळा लोकेसना दळभार लिसनं तुनावर येतीन; त्या कवचे, ढाली अनी शिरस्राण धारन करीसनं तुले चारीमेरतीन घेरतीन; मी न्याय करानं काम त्यासनावर सोपाडी दिसू; मनजे त्या आपला कायदाले धरीसनं न्याय करतीन.
25 मी तुनावर मनी ईर्ष्या रोखसू मनजे त्या चिडीसनं तुना समाचार लेतीन, त्या तुना नाक अनी कान कापी टाकतीन, तुना अवशिष्ट माणसे तलवारघाई पडतीन, त्या तुन्या पोरी अनी पोर्यासले लयी पळतीन, तुना उरेल माणसे आगमां भस्म व्हतीन.
26 त्या तुना कपडा लयी पळतीन तुना उत्कृष्ट जवाहीर हिसकाई लेतीन.
27 आशी तुनी शिंदळकीनी खोड, मिसर देशमां तुले लागेल व्यभिचारनी चट, मी मोडसू, मनजे तु त्यासनाकडे ढुकीसनंबी दखावू नही अनी मिसर देशनी आठवन यानापुढे येवावू नही.
28 प्रभु परमेश्वर सांगस, दख, ज्यासना तु व्देष करसं त्यासना हातमां मी तुले दिसू. ज्यासनाईरोधमां तुनं मन उडेल शे त्यासना हातमां तुले दिसू.
29 त्या व्देषतीन तुना समाचार लेतीन त्या तुनी बठी मालमत्ता हिसकाईसनं तुनी नग्नता उघडी करतीन. यानावरतीन तुनी शिंदळकीचाळासनी, तुनी कामसक्तीनी अनी तुनी व्यभिचारनी लाज उघडी पडी.
30 तु व्यभिचार कराकरता दुसरा राष्ट्रसनीमांगे लागनी, अनी त्यासन्या मुर्तीसघाई सोताले विटाळ म्हनीसनं हाई बठ तुले प्राप्त व्हयनं.
31 तु आपली बहीनना मार्गतीन गयीस म्हनीसनं तिनामायक तुना हातमाबी वाटका दिसू.
32 प्रभु परमेश्वर सांगस,
तु आपली बहीनना मायक खोल
अनी मोठा पेला पिसी;
त्याना माप मोठा राव्हामुये तु हास्य
अनी थटाले पात्र व्हशी.
33 तु धाक अनी शोक यानाघाई भरी जाशी;
तुनी बहीन शोमरोन हिना पेला भय
अनी उजाड याना शे.
34 तु तो निथळीसनं पिसी;
त्यान्या खापर्या तु कुरतडीसनं खासी
अनी त्यानाघाई तु आपली छाती ओरबडसी;
कारण हाई मी बोलेल शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
35 यामुये प्रभु परमेश्वर सांगस, तु माले ईसरेल शे, अनी तु मनाकडे पाठ फिरायेल शे, म्हनीसनं तु आपली कामसक्तीना अनी व्यभिचारना फय भोग.
दोन्ही बहीनीसले दंड
36 आजुन परमेश्वरनी माले सांग, मानवपुत्रा, तु अहला अनी अहलीब यासना न्याय करस ना? तर त्यासले त्यासना अमंगळ कृत्य दखाड.
37 कारण त्यासनी व्यभिचार करेल शे, त्यासना हातले रंगत लागेल शे, त्यासनी आपल्या मुर्तीसनीसंगे व्यभिचार करले शे अनी मनापाईन त्यासले व्हयेल पोर्या मर्तीसले भक्ष्य व्हावाले पाहिजे म्हनीसनं त्यासनी आगमां त्यासना होम करेल शेतस.
38 त्यासनी मनासंगे हाईबी वर्तन करेल शे की त्यासनी त्याच दिन मना पवित्रस्थान अपवित्र करेल शे अनी मना शाब्बाथ भ्रष्ट करेल शे.
39 कारन त्यासनी आपला पोर्यासना वध करीसनं त्या आपल्या मुर्तीसले अर्पण करेल शे, तवय त्याच दिन त्या मना पवित्रस्थान अपवित्र कराकरता तठे ऊनात; दख, त्यासनी मना मंदिरमां आशे वर्तन करेल शे.
40 "तशेच तुमी दुरदुरना माणसेसले बलावाकरता निरोप धाडात, त्यासनाकडे जासुद धाडात अनी दख, त्या वनात, त्यासनाकरता तु आंग धव, डोयामां काजय लायी अनी दागिनासघाई सोताले सजाडं.
41 उत्कृष्ट मंचवर बसनी, त्यासनामोरे मेज मांडीसनं त्यासनावर मना धुप अनी तेल ठेवं.
42 तठे चैनी लोकेसनी धामधुम चालू व्हयनी, सामान्य माणसासनीसंगे रानमाईन आजुन दारुबाज लोकेसले आणं; त्यासनी त्यासना हातमां बांगडया घाल्यात अनी डोकामां उत्तम शिरोभुषण घालात.
43 तवय शिंदळकी करीसनं नि:सत्व व्हयेल व्हती तिनाबारामां मी बोलनू की आते त्या तिनासंगे अनी ती त्यासनासंगे व्यभिचार करी का?
44 लोके वेशाकडे जातसं तशे त्या तिनाकडे गयात; त्या अहला अनी अहलीबा या बायासकडे गयात.
45 तथापी धार्मिक लोके प्रेमिसना अनी खुनी बायासना न्याय करतसं तशे त्यासना करतीन; कारण त्या प्रेमी शेतस अनी त्यासना हातले रंगत लागेल शे.
46 प्रभु परमेश्वर सांगस, मी त्यासनावर लोकेसना जमवा आणीसनं त्यासना दहशत पडी अनी त्यासले लुटतीन आशे करसू.
47 लोकेसना जमाव त्यासले दगडमार करी अनी आपली तलवारघाई त्यासना नाश करी; त्या त्यासना पोर्या सोर्यासना कत्तल करतीन अनी त्यासना घरदार आगघाई जायी टाकतीन.
48 हाई परकारं मी देशमाईन महापाप नष्ट करी टाकसू, मनजे बठया बाया सावध व्हयीसनं तुमनामायक शिंदळकी करावूत नही.
49 त्या तुमना महापाप प्रतिफय तुमले देतीन; तमी आपल्या मर्तीपुजाना पापना फय भोगशात; तवय तुमले समजी की मी प्रभु परमेश्वर शे.