24
बघुनाना दृष्टांत
मंग नववा वरीसले, दहावा महीनानी दशमीले परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, "मानवपुत्रा," "तु हाई तारीख, आजनी तारीख लिखी ठेव; आजनी तारीखले बाबेलना राजा यरुशेलमवर जायीसनं पडना शे. हाई भांडखोर घराणाले दाखला दिसनं आशे सांग, प्रभु परमेश्वर सांगस, प्रभु परमेश्वर सांगस
एक कढाई चुलावर चढाव,
ती चढावावर तिमां पानी वतं.
मांडया अनी खांदा आशे
मांसना चांगला तुकडा जमा करीसनं तिमा टाक,
तिमा निवडक हाडे भर.
कळपमाईन एक चांगला मेंढरु निवाडी लेय;
हाडं शिजाडाकरता खाल लाकडसना निखारा कर;
ते चांगले शिजू देय;
त्यासमासला हाडंबी चांगलं शिजू देय.
म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, हाई खुनी नगरीले धिक्कार असो! ती गंज चढेल कढाईनामायक शे, तिना गंज निघसं नही, तिमासला एक एक तुकडा बाहेर काढ, तठे चिठया टाकानं नही. कारण तिनी रक्तपात करेल शे, त्या रंगतघाई ती भरेल शे, ते तिनी उघडा खडकवर पडू दिद् शे, धुळघाई ते झाकता येवाले नही पाहिजे म्हनीसनं तिनी ते जमीनवर पडू दिद् नही. संताप यिसनं सूड लेवाकरता तिनी रंगत पाडेल शे, ते झाकता येवाले नही पाहिजे म्हनीसनं ते उघडा खडकवर पडाले पाहिजे म्हनीसनं आशे मी करेल शे.
त्यामुये प्रभु परमेश्वर सांगस, हाई खुनी नगरीले धिक्कार असो! मी सरपनना ढिगबी मोठ करसू. 10 लाकडे भरपूर टाक, आग चांगली पेटाड, मांस चांगल शिजाड, रसाले चांगलं घट व्हयी जाऊ देय, हाडंबी भुजी टाक. 11 मंग कढाई ईस्तवर रिकामी ठेव मनजे तिनं पितय तपी अनी धगधगती व्हयीसनं तिनं मय मजारमां जयी, तिना गंज निघी जायी. 12 ति काम करीसनं थकी गयी तरी तिनावर बसेल दाट गंज निघनं नही, गंजनासंगेच तिले आगमां टाक. 13 तुनी अशुध्दता दखी तवय ती भलती भयंकर शे; मी तुले साफ करी दख तरी तू स्वच्छ व्हयनी नही, तुनावर मना संतापघाई मन भरसं तोपावोत तु शुध्द व्हवावू नही. 14 मी परमेश्वर हाई बोली राहीनू शे; हाई घडीच; हाई मी करसुच; मी मांगे सरकावू नही; दया करावू नही; तुना आचरन परमानं, तुनं कर्मपरमानं त्या तुना न्याय करतीन; आशे प्रभु परमेश्वर सांगस.
यहज्केलनी बायकोनं मरण
15 परत माले परमेश्वरनं वचन प्राप्त व्हयनं की, 16 मानवपुत्रा, दख, मी तुना डोयासले जे प्रिय शे त सपटयासरशी काढी लेस; तरी तु शोक करावू नही, रडावू नही, आसू गायावू नही. 17 उसासा गचचुप टाक; मरेलसनीकरता शोक करु नको; डोकामां फेटा घाल, पायमां जोडा घाल, आपला वठ जाकू नको, सुनकना माणसे जेवण धाडतसं ते खाऊ नको.
18 सकासले लोकेसमां मी हाई बोलनू, अनी संध्याकायले मनी बायको मरनी; तवय माले आज्ञा व्हयेल व्हती तशे मी दुसरा दिन सकासले करी टाक. 19 यावरतीन माणसे माले बोलनात, तु हाई काय करसं त्याना आमनासंगे काय संबंध शे ते आमले सांगशी का?
20 मी त्यासले बोलनू, परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयेल शे की, 21 इस्राएलना घराणाले आशे सांग, प्रभु परमेश्वर सांगस, दख, तुमनी ताकदतीन, तुमना डोयासले‍ प्रिय, तुमना जीवना जिव्हाळा, आशे जे मनं पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करसू अनी तुमी मांगे ठेयेल तुमना पोर्‍यासोरे तलवारघाई पडतीन. 22 मंग मी करेल शे तशे तुमीन करशात, तुमी वठ झाकावून नही अनी सुतकना लोके जेवण धाडतसं ते तुमी खावावूत नही. 23 तुमी आपला डोकामां फेटा घालशात, पायमां जोडा घालशात, तुमी शोक करावुत नही, रडावूत नही, तर आपला अधर्मघाई झुरशात अनी येरायेरले दखीसनं उसासे टाकशात. 24 हाई परकारतीन यहेज्केल तुमले चिन्हवत व्हयी, त्यानी करं तशे तुमी करशात; हाई घडी यि तवय तुमले समजी की परमेश्वर शे.
25 हे मानवपुत्रा, त्यासनी ताकद, त्यासना वैभवमुलक हर्ष, त्यासन्या डोयासले प्रिय वाटनार्‍या वस्तु, त्यासना जीवना ईष्टविषय अनी त्यासन्या पोरीसन्या पोर्‍यासले मी त्यासनापाईक हिसकाई लिसू. 26 त्या दिन वाचेल एखादा माणुस तुना कानवर हाई वर्तमान सांगाले तुनाकडे यि. 27 त्या दिन तो वाचेल माणुसनासंगे बोलाकरता तोंड उघाडशी; तु बोलशी, यानामोरे तु शांत राहावावू नही; आशे तु त्यासले चिन्हवत व्हशी, मनजे त्यासले समजी की परमेश्वर शे.
24:2 २ राजे 25:1; यिर्मया 52:4