26
सोर शहरना बारामां भविष्यवाणी
1 नंतर अकरावा वरीसले महीनाना सुरुवातले, परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं ते हाई शे;
2 "मानवपुत्रा," "सोर शहर यरुशेलमईषयी आशे सांगी राहीना शे, अहा! ज्या फक्त राष्ट्रसना प्रवेशव्दार आशे व्हतात त्या मुडी जायेल शेतस अनी आते लोकेसना लोंढा मनीकडे वयेल शे; ती उजाड व्हयी जायेल शे, म्हनीसनं मी आते भरभराट व्हनार शे;
3 "यामुये प्रभु परमेश्वर सांगस, दख, आये सोर, मी तुनाईरोधमां शे, समुद्र आपल्या लाटा ढकलसं त्यापरमानं मी तुनावर बराच राष्ट्र ढकलसू,
4 त्या सोरना भितडासना नाश करतीन अनी तिना बुरुज पाडी टाकतीन; मी तिनावरनी माटी खयडीसनं तिले उघडा खडक करसू.
5 ती समुद्रमां जायी पसारानी जागा व्हयी; मी हाई सांग शे आशे प्रभु परमेश्वर सांगस, लुट म्हनीसनं ती राष्ट्रसना हातमां लागी.
6 तिन्या भुप्रदेशमां ज्या पोरी शेतस त्या तलवारघाई मरतीन; तवय त्यासले समजी की परमेश्वर शे."
7 कारण प्रभु परमेश्वर सांगस, दख, मी बाबेलना राजा, राजाधिराज नबुखद्नेस्सर, याले उत्तरकडतीन घोडा, रथ अनी मोठा दल यासले सोरवर आणसू.
8 भुप्रदेशमासल्या तुन्या पोरीसले तो तलवारघाई मारी; तो तुनाईरोधमां बुरुज बांधी, मोर्चा रची अनी तुनाईरोधमां ढालना कोट बनाडी.
9 तो तुना तटले आपला आघातयंत्र लायी, आपला हत्यारसघाई तुना बुरुज पाडी टाकी.
10 त्याना घोडा येवढा येतीन की त्यासनी उडायेल धुयघाई तु झाकाई जाशी; तटबंदीना नगर फोडीसनं मजार घुसतसं तशे तो तुना वेशीमाईन मजार यि, तवय स्वार, चाके अनी रथ यासना आवाजघाई तुना तट हालतीन.
11 तो आपला घोडासना टापासघाई तुना बठा रस्ता चेंदी, तो तुना लोकेसले तलवारघाई मारी, तुना मजबुत खांब जमीनदोस्त करी.
12 त्या तुनी संपत्ती लूटी टाकतीन, तुना माल लुटतीन, तुना तट उद्ध्वस्त करतीन, तुना सुंदर घर पाडी टाकतीन, तुना दगड, लाकूड, माटी वगैरे बठ काही पानीमां बुडाई टाकतीन.
13 मी तुना गाणसना आवाज बंद करसू, तुना वीणासना सुर परत आयकामां येवावू नही.
14 मी तुले उघडा खडक करीसनं तुले जायी पसारानी जागा करसू; तुले परत बांधता येवावू नही, मी परमेश्वर हाई सांगेल शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
15 प्रभु परमेश्वर सोरले सांगस, तुना पतनना आवाजघाई, जखमी व्हयेल कण्हनाघाई; तुनामां चालेल कत्तलघाई बेटसना थरकाप व्हवावू नही का?.
16 तवय बठा दयावर्दी सरदार आप आपला आसनवरतीन उतरीसनं खाल येतीन, आपला झगा काढी ठेवतीन; आपला जरतारी कपडा काढी टाकतीन; त्या भितनामायक कपडा घालीसनं जमीनवर बसतीन; थोडा येळमां त्यासना थरकाप व्हयी अनी त्यासनाबारामां त्या विस्मय पावतीन.
17 त्या तुनाईषयी शोक करीसनं बोलतीन,
आये किर्तीमान नगरी,
तु जशी समुद्रामाईन निघीसनं बसेल व्हती;
तु समुद्रमां पराक्रमी व्हती;
तु अनी तुना रहीवासी यासना तठेना लोकेसवर वचक राहे, ती तु कशी नष्ट व्हयनीस!
18 तुना शेवटना दिनमां
बेटना थरकाप व्हये;
तुना निर्णयतीन समुद्रमासला व्दिप भयचकीत व्हयेल शेतस.
19 प्रभु परमेश्वर सांगस, मी तुले निर्जन व्हयेल नगरपरमानं ओसाड नगरी करसू अनी तुनावर खोल सागरनी लोट आणसू भला मोठा जलप्रवाहघाई तुले झाकी टाकतीन.
20 तवय खडामां जायेल प्राचीन कायना लोकेसकडे तुले खाल टाकीसनं खडामां जायेलपरमानं प्राचीन कालपायीन ओसाड व्हयेल जागमां पृथ्वीनी मजारनी भागमां तुले राहावाले लावसू मनजे तु परत बसावू नही; पन मी जीवतसनी भुमीले वैभव दिसू.
21 लोकेसले दहशत पडी आशे मी तुनं नाश करसू, तु नष्ट व्हशी; तुना शोध करतीन तरीबी तु कधीच सापडावू नही; आशे प्रभु परमेश्वर सांगस.