28
सोरना राजानीबारामां भविष्यवाणी
1 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
2 "मानवपुत्रा," "सोरेना अधिपतीसले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, तुनं ह्दय उन्मत व्हयीसनं तु सांगस, मी देव शे, भर समुद्रमां मी देवना आसनवर बठेल शे, पन तु देव नही शे, माणुस शे, आपलं मन देवनामायक शे आशे आव तु आणी राहीना शे.
3 दख, तु दानीएलपेक्षा तु बुध्दीमान शे; कोनतीच गुप्त गोष्ट लोकेसले तुनापाईन दपाडता येस नही;
4 तु आपली आकलतीन अनी चतुरतीन धन जमा करं अनी आपला भांडारमां सोनं चांदीना साठा करात;
5 तु आपली आकलनी जोरवर व्यापार करीसनं आपलं धन वाढावं; हाई तुना धनघाई तुनं ह्दय उन्मत व्हयी जायेल शे,
6 हयाकरता प्रभु परमेश्वर सांगस, आपलं चित्त देवना चित्तनामायक शे आशे तु आव आणी राहीना शे.
7 म्हनीसनं दख, मी तुनावर परका लोके आणसु; तुनावर दुसरा राष्ट्रसन उग्र लोकेसले आणसू; तुनं आकलनं सुंदरताना त्या तलवारघाई उपसतीन अनी तुनं तेज भ्रष्ट करतीन.
8 त्या तुले खडामां उतारतीन, भर समुद्रमां वध पावनारा मृत्युनामायक तुना मृत्यु व्हयी.
9 तु सोताले वधनारासनीसमोर, मी देव शे आशे बोलशी का? घायाळ करनारासनी हातमां सापडना तर तु देव नही शे, माणसु शे.
10 बेसुंती मरतसं तशे तु परदेशीना हातघाई मरशी; हाई म्हनं म्हणन शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
सोर राजानं पतन
11 परत परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
12 "मानवपुत्रा," "सोरेना राजानीबारामां विलाप करीसनं त्याले सांग; प्रभु परमेश्वर सांगस, तु पुर्णतानी मुद्राच शे; तु ज्ञानपुर्ण अनी सर्वांगसुंदर शे.
13 देवना बाग एदेन आठे तु व्हता; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाच, माणिक अनी सोनं आशे बराच परकारना जवाहीर तुना आंगभर व्हतात; खंजिर्या अनी बासर्या यासना कसब तुना आठे चालेत; तुले निर्माण करं त्याच दिन त्यासनी योजना व्हयनी.
14 तु पाखर घालनारा अभिषीक्त करुब व्हता; मी तुनी तशी योजना करी व्हती; तु देवना पवित्र पर्वतवर व्हता; तु आगनामायक झगझगनारा पाषाणनमाईन फिरत राहे.
15 तुले निर्माण करं त्या दिनपाईन अधर्म तुनामां दखास तोपावोत तुनी चालचलणुक यथायोग्य व्हती.
16 तुना व्यापार मोठा राहावामुये तुना मनमां अपकारबुध्दी घुशीसनं तु पाप करं; म्हनीसनं मी तुले भ्रष्ट समजीसनं परमेश्वरना पर्वतवरतीन ढकली दिद्. हे पाखर घालनारा करुबा! त्या आगनामायक झगझगनारा पाषाणमाईन काढीसनं मी तुनं नाश करी टाकं.
17 तुना सौंदर्याना अभिमानतीन तुनं ह्दय उन्मत व्हयनं; तुना वैभवतीन तुनी बुध्दी भ्रष्ट व्हयनी; मी तुले जमीनवर आपटं; राजानी तुना तमाशा दखाले पाहिजे म्हनीसनं त्यानामोरे तुले टाकं;
18 खोटा व्यापार करीसनं तु बराच पाप करात, त्यासनाघाई तु आपला पवित्रस्थान विटाळं म्हनीसनं तुनामाईन आग निघीसनं तुले खाई टाकी, आशे मी करेल शे, अनी तुले दखनारासनी नजरनासमोर मी पृथ्वीवर तुनी राखरांगोळी करेल शे.
19 राष्ट्रसमां तुना वयखना बठा तुले दखीसनं विस्मय व्हयी जायेल शेतस; तुनी दशा दखीसनं लोकेसमां दहशत पडेल शे, तु कायमना नष्ट व्हयेल शे.
सिदोनना ईरोधमां भविष्यवाणी
20 मंग परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की
21 मानवपुत्रा, सीदोनकडे आपल तोंड फिराईसनं तिनाईरोधमां संदेश देय;
22 तिले सांग, प्रभु परमेश्वर सांगस दख, हे सीदोन, मी तुनाईरोधमां शे, अनी तुनामां मी आपला प्रताप गाजाडसू; मी तिले न्यायदंड करसू अनी तिनामां मी पवित्र ठरसू, तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
23 मी तिनामां मरी धाडसू, तिना रस्तावर रंगतना सडा घालसू; तिनावर चारीमेरकडतीन तलवार चाली अनी लोके घायाळ व्हयीसनं तिनामां पडतीन, तवय त्यासले समजी की परमेश्वर शे.
इस्राएलले आशिर्वाद
24 मंग इस्राएल घराणाना आसपासना व्देष्टासपाईन कोनी त्यासले बोचनारा काटा अनी टोचनारी नांगी आशी उरावू नही, तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
25 प्रभु परमेश्वर सांगस, इस्राएल घराणं ज्या ज्या देशमां पांगेल शे तठेन मी त्यासले एकजागे करसू अनी विधर्मी राष्ट्रासनीसमोर त्यासनामां पवित्र ठरी; मंग जो देश मी आपला सेवक याकोब याले दिद् तठे त्या वस्ती करतीन.
26 त्या तठे निर्भय राहातीन, त्या घरं बांधतीन, द्राक्षना मया लावतीन; अनी त्यासना आजुबाजूना त्यासना व्देष्टयासले मी न्यायदंड करसू तवय त्या निर्भयतीन राहातीन; मंग त्यासले समजी की मी परमेश्वर त्यासना देव शे.