38
गोगनीबारामां भविष्य
परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, "मानवपुत्रा," "मागोग देशमासला गोग, जे रोश, मेशेख अनी तुबाल यासना अधिपती, त्यानाकडे आपलं तोडं करीसनं त्यानाईरोधमां संदेश देये; त्यासले सांग‍ प्रभु परमेश्वर सांगस, दखा, आरे, गोगा, रोश, मेशेख अनी तुबाल यासना अधिपती, मी तुमनाईरोधमां शे. मी तुले पयाले लावसू; तुना जबडामां गय टोचीसनं तुले बाहेर काढसू; तुना बठा सैन्य, घोडा अनी स्वार यासले बाहेर काढसू, सर्वाजन सुंदर कपडा घालेल, कवच अनी ढाल धारन करेल, तलवार परजनारा यासना मोठा समुह शे. त्यासनासंगे ढाल अनी शिरस्राण धारन करेल पारस, कूश अनी पुट, गोमर अनी त्याना सेनासमुह, उत्तरकडला तोगार्मानं घराणं अनी त्यासना बठा सेनासमुह, तशेच बराच जातना लोके यासले तुनासंगे बाहेर काढसू. तु अनी तुना पक्षकडे जमा व्हयेल बठा समुह आशे तुमी तयार व्हा, तयार व्हय, त्यासना नायक व्हयं. बराच दिन सरावर तुना समाचार लेवामां यि, शेवटना वरीसले जो देश तलवारपाईन वाची अनी ज्या देशमां बराच राष्ट्रसमाईन जमा करेल लोके परत परत उद्ध्वस्त व्हनारा इस्राएलना पर्वतवर वस्ती करतीन, त्या देशवर तु चढाई करशी; तरीबी त्या लोकेसले राष्ट्रमाईन बाहेर आणीसनं त्या बठा निर्भय राहातीन. तु तुफाननामायक चाली जाशी; भुमीले ढग झाकतसं तशा तु व्हशी; तु तुना बठा सेनासमुह अनी तुनासंगे बराच राष्ट्रसना लोके, आशे तुमी यिशात.
10 प्रभु परमेश्वर सांगस, त्या दिन आशे व्हयी की तुना मनमां कल्पना येतीन अनी तु दुष्ट योजनानी युक्ती करशी. 11 तु सांगशी, ज्या प्रदेशमासला गावसले तटबंदी नही त्यासवर मी चढाई करसू, ज्या आरामशीर निर्भय राही राहीना शेतस, अनी ज्यासले कोनताच कोट नही, अडसर, वेशी वगैरे काही नही त्यासवर मी चाली जासू. 12 लोकेसनी मालमत्ता हिसकावाकरता अनी लुटालुट कराकरता; ज्या ओसाड ठिकानले परत वस्ती व्हयेल शे त्यासनावर मना हात चालाले पाहिजे, अनी येगयेगळा राष्ट्रसमाईन जमा व्हयेल ज्या लोकेसना गुरेढोरे अनी मालमत्ता लेयेल शे अनी ज्या पृथ्वीना मधला भागमां राहातसं त्यासनावर हात चालाले पाहीजे म्हनीसनं मी चाली जासू. 13 शबा, ददान अनी तार्शीश आठेना व्यापारी अनी त्यासना बठा तरुन सिंह तुले म्हनतीन, तु लुटालुट कराले येयल शे का? तु मालमत्ता हिसकावाकरता आपला सेनासमुह जमाडेल शे का? सोने रुपे लयी जावाले पाहिजे, गुरेढोरे अनी माल लयी जावाले पाहिजे अनी मोठी लुट कराले पाहीजे म्हनीसनं तु येयल शे का?
14 म्हनीसनं हे मानवपुत्रा, संदेश दिसनं गोगाले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, जवय मना लोके इस्राएल निर्भय वस्ती करतीन तवय तुले हाई कयायु नही का? 15 तु आपला ठिकानवरतीन यिशी; उत्तरकडला दुर दुरना देशमाईन अस्वारुढ व्हयेल मोठा लोकेसा समुदाय, मोठा दयभार, तु संगे लिसन यिशी. 16 ढगघाई देश झाकास तशे तु मना लोके इस्राएल यासनावर चाल करी यिशी; हे गोगा, शेवटना दिनमां आशे घडी की मी राष्ट्रसनादेखत तुनाकडतीन मनी पवित्रता प्रकट करसू; तवय राष्ट्रसनी माले वयखाले पाहिजे म्हनीसनं मी तुले मना देशवर आणसू. 17 प्रभु परमेश्‍वर सांगस, मना सेवक ज्या इस्त्राएलना संदेष्टा त्यासनाकडतीन पुर्वकायले ज्या ईषयी मी बोलेल व्हतू अनी त्या कायमां बराच वरीस त्यासनी ज्या ईषयी आशे संदेश दिदा व्हता की मी तुले त्यासनावर चाल कराले आणसू, तो तुच शे ना?
गोगले परमेश्वरना दंड
18 प्रभु परमेश्वर सांगस, गोग इस्राएल देशवर चाल करी त्या दिन आशे व्हयी की मन्या नाकपुडया संतापमां फुरफरतीन. 19 कारन मी ईर्ष्यातीन क्रोधाग्नीघाई तप्त व्हयीसनं बोलेल शे की खरच त्या दिन इस्त्राएल देशमां मोठा भुमीकंप व्हयी; 20 समुद्रमासाल मासा, आकासमासाल चिडा, जंगलमासला जनावर, जमीनवर रांगनारा बठा पशू अनी जमीनवर राहानारा बठा माणसे मनासमोर थरथर कापतीन; पर्वत नष्ट व्हतीन, कडा खचतीन, परतेक कोट कोसळीसनं जमीनदोस्त व्हयी. 21 प्रभु परमेश्वर सांगस, मना बठा पर्वतसकडे त्यानाईरोधमां तलावर बलावसू; परतेकनी तलवार आपला भाऊवर चाली. 22 मरी अनी रक्तपात यासघाई मी त्यासनासंगे वाद मांडसू; त्यासनावर, त्याना सैनिकवर पाऊस, मोठया गारा, आग अनी गंधक यानी वृष्टी मी त्यासनासंगे जो लोकसमुदाय शे त्यासवर धोधो करसू. 23 हाई परकारं मी आपली महीमा अनी पवित्रता प्रकट करसू, अनी बराच राष्ट्रसले प्रत्यक्ष वयख व्हयी; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
38:2 प्रकटीकरण 20:8