39
गोगनी हार
1 "हे मानवपुत्रा," गोगानाईरोधमां संदेश दिसनं सांग, प्रभु परमेश्वर सांगस, हे गोगा, रोश, मेशेख अनी तुबाल यासना अधिपती, दखा, मी तुमनाईरोधमां शे;
2 मी तुले फिरावसू, तुले लि जासू, उत्तरकडला बराच दुरना परदेशमां तुले येवाले लावसू; तुले इस्त्राएलना पर्वतकडे आणसू,
3 मी तुना डावा हातमासला धनुष्य उडाई दिसु; तुना उजवा हातमासला बाण खाल पाडी दिसू.
4 तु इस्त्राएलना पर्वतवर पडशी; तु, तुना बठा सेनासमुह अनी तुनासंगेना लोकेसना समुह, हया तुमी बठा पडशात; मी तुमले नाना परकारना हिंस्र चिडासले अनी वनपशुसले भक्ष दिसू.
5 उघडा मैदानमां तु पडशी; कारन मी हाई बोलेल शे; आशे प्रभु परमेश्वर सांगस,
6 मी मागोगमां अनी व्दिपमां निर्भय राहानारा लोकेसमां आग धाडसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
7 मी आपला इस्राएल लोकेसमां मना पवित्र नाव प्रकट करसू; यानामोरे आपला पवित्र नावनी अप्रतिष्ठा व्हवू देवावू नही; तवय मी परमेश्वर शे, इस्राएलना पवित्र प्रभु शे आशे राष्ट्रसले समजी यि.
8 दखा, हाई प्राप्त व्हयी राहीना शे; घडी यि राहीना शे; मी सांग व्हतं तो हाई दिन शे; आशे प्रभु परमेश्वर सांगस.
9 तवय इस्त्राएलनी नगरमासला रहिवासी बाहेर निघीसनं ढाली अनी कवच, धनुष्य अनी बाण, गदा अनी भाला, या बठा शस्रासले आग लायीसनं जायी टाकतीन; त्यासना त्यासले सात वरीस सरपन व्हयी.
10 त्या जंगलमाईन लाकडे आणावूत नही, जंगलमासला लाकडे तोडावूत नही, तर हया हत्यार त्या जायतीन; त्यासले ज्यासनी लुट त्यासले त्या लुटतीन अनी त्यासले ज्यासनी त्यासनं हिसकावं त्यासले त्या हिसकावतीन आशे प्रभु परमेश्वर सांगस.
गोगले मुठमाटी
11 त्या दिन आशे व्हयी की समुद्रना पुर्वले ज्या प्रवाशासना खोरा त्या गोगाले इस्त्राएल देशमां कब्रस्थान म्हनीसनं दिसु; त्या येनारा जानारासनी वाट आडवतीन; तठे गोग अनी त्याना बठा लोकसमुह यासले बुंजतीन; अनी त्याले हमोन-गोग (गोगना लोकसमुदाय) यानं खोरं आशे म्हनतीन.
12 देश शुध्द कराकरता इस्त्राएल घराणं त्यासले सात महिना पुरत बसतीन.
13 देशमासला बठा लोके त्यासले पुरतीन; मी आपली महीमा प्रकट करसू; त्या दिन हाई त्यासनी किर्तिले कारन व्हयी, आशे प्रभु परमेश्वर सांगस,
14 हाई काम कायमना करनारा माणसे त्या येगया करीसनं नेमी देतीन; अनी देश शुध्द व्हवाले पाहिजे म्हनीसनं त्या माणसे देशभर फिरीसनं जमीनवर पडेल उरेल सुरेल लोकेसले पुरतीन; सात महीना सरावर त्या त्या शोध कराले लागतीन.
15 शोध करनारा जवय देशभर फिरतीन तवय एखादा हाडं सापडनात तर बुजनारासनी त्या हमोन-गोगना खोरामां आणीसनं बुजानं म्हनीसनं तठे निशानी करी ठेयेल शे.
16 एक नगरनं नावबी हमोना (समुदाय) आशे ठेवतीन; हाई परकारतीन त्या देशनी शुध्दी करतीन.
17 प्रभु परमेश्वर सांगस, हे मानवपुत्रा, परतेक परकारना चिडाले अनी वनपशुसले सांग की एकजागे व्हा; या; मी तुमनाकरता यज्ञबली कापी राहीनू शे, इस्राएलना पर्वतवर महायज्ञ करी राहीनु शे; तठे चारीमेरतीन एकजागे व्हयीसनं मास खा; रंगत प्या.
18 तुमी वीरसना मास खाशात, पृथ्वीना अधिपती अनी मेंढा कोकरे, बोकड अनी बैल यासना रंगत पिशात; हया बठा बाशान डोंगरवर पोसेल शेतस.
19 तुमनाकरता कापेल मनी यज्ञपशुनी चरबी तुमी तृप्त व्हतसं तोपावोत खाशात अनी त्यासना रंगत पिसनं मस्त व्हशात.
20 मना मेजवर बशीसनं घोडा अनी स्वार, वीर अनी बठा परकारना योध्दा यासले खायीसनं तुमनी तृप्ती व्हयी; आशे प्रभु परमेश्वर सांगस.
इस्राएलनी परत स्थापना
21 तवय मी राष्ट्रसमां मनी महीमा स्थापन करसू; त्यासले शिक्षा करसू अनी आपला हात त्यासनावर टाकसू; हाई बठ राष्ट्रं दखतीन.
22 त्या दिनपाईन मोरे मी परमेश्वर त्यासना देव आशे इस्राएल घराणाले समजी.
23 राष्ट्रसले समजी की इस्त्राएल घराणामासला लोके आपली दुष्टाईमुये बंदीवासमां गयात; त्यासनी मनासंगे ईस्वासघात करं म्हनीसनं मी त्यासनापाईन आपलं तोंड दपाडं अनी त्यासले त्यासना वैर्यासनी हातमां दिद्, तवय त्या बठा तलवारघाई पडनात.
24 त्यासना अशुध्दततापरमान; त्यासना अपराधपरमानं मी त्यासनासंगे वागनू अनी त्यासनापाईन आपलं तोंड दपाडं.
25 म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, आते मी याकोबना बंदीवानसले उलटावसू; अनी इस्राएलना बठा घराणावर दया करसू; मनी पवित्र नावनी ईर्ष्या धरसू.
26 त्या देशमां निर्भय राहातीन अनी कोनीच त्यासले धाक दखाडावूत नही; मंग त्या लज्जित व्हतीन, मनासंगे करले ईस्वासघातना त्यासले पस्तावा यि.
27 मी त्यासले राष्ट्रसमाईन परत आणसू, त्यासना शत्रुना देशामाईन त्यासले जमा करसू अनी सर्वा राष्ट्रसनीसमोर त्यासनामां मनी पवित्रता प्रकट करसू. तवय हाई घडी.
28 मी त्यासले राष्ट्रसमाईन हाकलीसनं परत मीच त्यासले त्यासना देशमां परत लयी व्हनू; त्यासनामाईन कोनलेच यानामोरे मी परदेशमां राहावू देवावू नही; हाई दखीसनं मी परमेश्वर शे आशे त्या समजतीन;
29 मी आपलं तोंड यानामोरे त्यासनापाईन दपाडावू नही; कारन मी आपला आत्मानी इस्त्राएल घराणावर वृष्टी करेल शे, आशे प्रभु परमेशवर सांगस.