40
संदेष्टाले मंदीरना दृष्टांत
आमना बंदीवासना पंचवीसावा वरीसले, मनजे नगरना नाश व्हवाना चौदावा वरीसले, वरीसना सुरुवातना दहावा महीनाले परमेश्वरनं वरदहस्त मनावर व्हनं अनी त्यानी माले तठे लयी गया. त्यानी दिव्य दृष्टीतीन माले इस्त्राएल देशमां एक बराच मोठा पर्वतवर लयीसनं ठेवं; त्यानावर दक्षिणले नगरना आकारनामाईक काहीतरी व्हतं. त्यानी माले त्या जागवर लयी गया तवय तठे एक माणूस दखायना; त्यानं रुप पितयनामायक व्हतं; त्यानी हातमां तागनी एक दोरी व्हती अनी मोजानी काठी व्हती; तो वेशीनाजोडे उभा व्हता.
तो माणुस माले बोलना, "मानवपुत्रा," "आपला डोयासघाई दख, आपला कानघाई आयक, अनी मी तुले जे काही दखाडसू त्या सर्वाकडे चित्त लाव; हाई तुले दखाडाले पाहिजे म्हनीसनं मी तुले इकडे आणेल शे, तु जे काही दखशी ते इस्त्राएल घराणाले सांग."
पुर्वना फाटूक
मी दख तवय त्या मंदीरना आजुबाजूले एक तट व्हता; त्या माणुसनी हातमां मोजानी *एक काठी व्हती; ती सवू हात लांब व्हती; हाई माप एक हात अनी चार आंगठया व्हत्यात; त्यानी त्या इमारतनी भितनी जाडी एक काठी अनी उची एक काठी मोजी. तो पुर्वकडला ज्या पायर्‍या व्हत्यात त्या वर चढी गया; त्यानी दारना उंबरठा एक काठी रुंद मोजी; हाऊ पहिला उंबरठा एक काठी भरला. परतेक चौकी एक काठी लांब अनी एक काठी रुंद राहीसनं त्या चौक्यासमासलं अंतर पाच हात व्हतात; मंदीरनामोरेना देवडीनाजोडेना दारना उंबरठा एक हात व्हता. मंदिरकडली दारनी देवडी त्यानी एक काठी मोजी. त्यानी त्या दारनी देवडीनं माप लिद तवय ते आठ हात भरं; तिना खांब दोन हात भरनात; हाई दारनी देवडी मंदीरनासमोर व्हती. 10 पुर्वकडली दारनी हाई बाजूले अनी त्या बाजुले तीन चौक्या व्हत्यात; त्या तिनीसना माप सारखाच राहीसनं दोनी बाजुले खांबभी एकच मापनं व्हतं.
11 त्यानी दारना प्रवेशमार्गनी रुंदी दहा हात अनी लांबी तेरा हात मोजात. 12 त्या चौक्यासनी समोरनी जागा एक बाजुले एक हात अनी दुसरी बाजुले एक हात व्हती; त्या चौक्या दोनी बाजुले सवू हात व्हतात. 13 त्यानी एक चौकीना छावनीपाईन दुसरी छावनीपावोत दार दारले धरीसनं पंचवीस हात रुंदी मोजी. 14 त्यानी देवडीना माप लिदात त्या ईस हात भरनात; त्या देवडीले लागीसनं दारना आजूबाजुले आंगन व्हतं. 15 प्रवेश दारपाईन मजारना दारना देवडीना पुढेना भागपावोत पन्नास हात भरनात. 16 त्या चौक्याले अनी दारना मजारनी बाजुले त्यासन्या खांबाले झरोके व्हतात; आशे मजारना चारी बाजुले झरोका व्हतात. अनी खांबवर खजुरना झाडे कोरेल व्हतात.
बाहेरना आंगण
17 तवय त्यानी माले बाहेरना आंंगनमां लयी गया तवय तठे चारीमेर खोल्या राहीसनं त्या आंगनमां चिरेबंदी करेल व्हती आशे नजरमां व्हनं; हया चिरेबंदीवर तीस खोल्या व्हत्यात. 18 हया चिरेबंदी मनजे मनजेच खालनी चिरेबंदी दारले लागीसनं त्यासनी लांबी एवढी व्हती.
19 जवय त्यानी खालना दारनासमोरतीन मजरना आंगनपावोत रुंदी मोजी ती पुर्व अनी उत्तर बाजुले शंभर हात भरनात.
उत्तरना फाटुक
20 मंग त्यानी बाहेरनां अंगनले लागीसनं उत्तरकडला दारनी लांबीरुंदी मोजी. 21 त्यान्या चौक्या हाई बाजुले तीन अनी ती बाजुले तीन व्हत्यात; त्यानं खांब अनी महीरापी हाई पहिला दारना मापनामायक व्हतं; त्यानी लांबी पन्नास हात अनी रुंदी पंचवीस हात व्हती. 22 त्यान्या खिडक्या, वसरी अनी खजुरना कोरेल झाडे हया पुर्वना तोंडले राहीसनं दारना माप परमानं व्हती; त्यानावर चढी जावाकरता सात पायर्‍या व्हत्यात; अई त्यासन्यासमोर त्यान्या वसरी व्हत्यात. 23 मजारना आंगनमां पुर्वकडला दारनामायक उत्तरकडला दारनासमोर एक दार व्हतं; एक दारपाईन दुसरा दारपावोत त्यानी शंभर हात मोजात.
दक्षिण फाटूक
24 मंग‍ दक्षिण भागमां माले लयी गया, तवय तठे दक्षिणना तोंडले एक दार नजरमां पडनं; त्यानं खांब अनी वसरी त्यानी मोज्यात त्या पहिलासारखाच भरनात. 25 वर सांगेल खिडक्यासपरमानं यालेबी आजुबाजूले खिडक्या अनी वसर्‍या व्हत्यात; त्यासनी लांबी पन्नास हात अनी रुंदी पंचवीस हात व्हतात. 26 त्यानावर चढी जावाकरता सात पायर्‍या व्हत्यात अनी त्यानासमोर त्यानी वसरी व्हती; अनी त्याना खांबवर इकडना बाजुले अनी तिकडना बाजुले एक एक खजुरना झाड कोरले व्हतात. 27 दक्षिणकडला मजारनं आंगनले दार व्हतं; दक्षिणकडला हाई दारपाईन ते त्या दारपावोत शंभर हात भरनात.
मजारना आंगन - दक्षिनना फाटुक
28 तवय त्यानी माले दक्षिणकडला दारकडतीन मजारनां आंगनमां लिसनं दक्षिणकडला दार मोजं; ते तेवढचं भरनं. 29 त्यापरमानं त्यानी त्यान्या चौक्या, खांब, अनी त्यावरना वसर्‍या ह्या मोज्यात, त्या तेवढयाच भरन्यात, त्याले अनी त्याना आजुबाजूना वसरीसले खिडक्या व्हत्यात, त्यासनी लांबी पन्नास हात अनी रुंदी पंचवीस हात भरनात. 30 त्यान्या आजुबाजूले वसर्‍या व्हत्यात; त्या जवयपास पंचवीस हात लांब अनी पाच हात रुंद व्हत्यात. 31 त्या वसर्‍या बाहेरन्या आंगनना बाजुला व्हत्यात; त्यान्या खांबवर खजुरना झाड कोरेल व्हतात; त्यानावर चढी जावाले आठ पायर्‍या व्हत्‍यात;
मजारना आंगणना- पुर्वना फाटूक
32 मंग त्यानी माले पुर्वकडला मजारना आंगनमां लिसनं ते दार मोजं; ते तेवढच भरनं. 33 त्यान्या चौक्या, खांब अनी वसर्‍या त्यानी मोज्यात, त्याबी तेवढयाच भरन्यात; त्यान्या आजुबाजूले खिडक्या अनी वसर्‍या व्हत्यात; त्यानी लांबी पन्नास हात अनी रुंदी पंचवीस हात व्हतात. 34 त्यान्या वसर्‍या बाहेरना आंगनना बाजुले व्हत्यात; त्याना खांब इकडना बाजुले अनी तिकडना बाजुले खजुरना झाडे कोरेल व्हतात, त्यानावर चढी जावाकरता आठ पायर्‍या व्हत्यात.
मजारना आंगन- उत्तरकडला फाटुक
35 मंंग तो माले उत्तरले लयी गया; तेबी त्यानी मोज अनी ते तेवढच भरनं. 36 त्यान्या चौक्या, खांब अनी वसर्‍या त्यानी मोज्यात, त्यान्या आजुबाजूले खिडक्या व्हत्यात; त्यानी लांबी पन्नास हात अनी रुंदी पंचवीस हात व्हतात. 37 त्याना खांब बाहेरना आंगनना बाजुले व्हतात; इकडना बाजुले अनी तिकडना बाजुले खजुरना झाडे कोरेल व्हतात, त्यानावर चढी जावाकरता आठ पायर्‍या व्हत्यात.
उत्तरकडनी चौकी
38 दारना खांबले लागीसनं एक एक खोली राहीसनं तिले दार व्हतात; तठे होमबली धयेत. 39 दारना देवडीमां होम अर्पण, पाप अर्पण अनी दोषार्पण यासना जनावर कापाकरता हाई बाजुले दोन अनी ती बाजुले दोन आशे मेज व्हतात. 40 अनी बाहेरनी बाजुले, उत्तरना भागले प्रवेश मार्गमां चढी जावानी वाटवर दोन मेज‍ व्हतात; तशेच दुसरी बाजुले दारनी देवडीनाजोडे दोन मेज व्हतात. 41 दारनी बाहेरनी आंगले दोनी बाजुसले चार मेज व्हतात; आशी यज्ञपशू कापाकरता आठ मेज व्हतात. 42 होम अर्पन कराकरता ताशीव दगडना चार मेज व्हतात; ती दीड हात लांब, दीड हात रुंद अनी एक हात उचा आशे व्हतात; ज्या हत्यारसघाई होमबली अनी दुसरा यज्ञपशू कापेत ती त्यानावर ठेवेत. 43 चार अंगठया लांबन्या आकडया मंदीरन्या आजुबाजूले लायेल व्हत्यात; यज्ञपशुनं मास त्या मेजवर ठेयेत.
याजकनी कोठरी
44 मजारना दारनाबाहेर, मजारना आंगनमां दोन खोल्या व्हत्यात; एक उत्तरना दारनी बाजुले दक्षिणमां अनी दुसरी दक्षिण दारनी बाजुले उत्तरले व्हती. 45 तो माले बोलना, हाई दक्षिणले जी खोली‍ व्हती ती मंदीरना रक्षण करनारा याजककरता शे. 46 अनी उत्तरले जी खोली व्हती ती वेदीना रक्षण करनारा याजककरता शे; त्या सादोकना वंश व्हतात; त्या लेवीना वंशमासला राहीसनं परमेश्वरनाजोडे सेवा कराले जातसं.
मजारना आंगण अनी मंदीर
47 त्यानी आंगन मोज ते शंभर हात लांब अनी शंभर हात रुंद आशे चौरस भरनात; अनी मंदीरनासमोर वेदी व्हती. 48 मं तो माले मंदीरना देवडीमां लयी गया अनी त्या देवडीना परतेक खांब मोजात तो एक बाजुतीन पाच हात अनी दुसरी बाजूतीन पाच हात भरनात; त्या दारनी रुंदी एक बाजूतीन तीन हात अनी दुसरी बाजूतीन तीन हात भरनात. 49 देवडीवर चढी जावाकरता पायर्‍या व्हत्यात, त्या बाजूतीन तिनी लांबी ईस हात अनी रुंदी आकरा हात भरनात; त्या खांबना एक बाजुले एक अनी दुसरी बाजुले एक आशे दाखला खांब व्हतात.
40:2 प्रकटीकरण 21:10 40:3 प्रकटीकरण 11:1; 21:15 40:5 २ राजे 6:1; २ इतिहास 3:1 * 40:5 सामान्य हातापेक्षा चार अंगठया जास्त म्हणजे अर्धा मीटर