4
यरुशलेमले घेरानी भविष्यवाणी
हे मानवपुत्रा, एक ईट लिसनं तुनासमोर मांड; तिनावर यरुशेलम नगरना चित्र काढ. त्याले वेढा पडेल शे; त्यानासमोर बुरुज रचीसनं मोरचा बांधेल शेतस; त्यानासमोर तळ पडेल शे; टक्कर दिसनं भित पाडानं यंत्र त्याना आजुबाजूले शेतस, असं चित्र काढ. मंग तु एक लोखंडी कढई लेय, ती तुनामां अनी त्या नगरमां जशी काय लोखंडी भित म्हनीसनं ठेव; तु आपला तोंड तिनाकडे कर; तिले वेढाना स्थीतीमां लय; तु तिले वेढा घालनारा व्हय, हाई इस्त्राएल घराणाले चिन्ह व्हयी.
आजुन तु आपली डावी कुशीवर झोप अनी इस्त्राएल घराणानं अधर्म त्या कुशीवर ठेव; जेवढा दिन तु त्या कुशीवर झोपी राहाशी तेवढा दिन त्यासना अधर्म भार वाही राहाय. कारण त्यासना अधर्मना वरीस एवढा दिन मी तुना हिशोबमां मोजेल शेतस; तिनशे नव्वद दिन तुले इस्त्राएलना घराणानं भार वाहावानं शे. मंग त्या दिन सरावर तु उजवी कुशीवर झोप अनी चाळीस दिन यहुदा घराणानं अधर्मना भार वाहाय; परतेक वरीसनाबद्दल तुना हिशोबमां मी एक दिन धरेल शे.
तु आपला तोंड अनी उघडा हात यरुशेलमना वेढाना चित्रकडे रोखीसनं धरं अनी त्यानाईरोधमां संदेश देय. दख, मी तुले बंधनघाई बांधसं, मनजे तु आपला वेढाना दिन सरस तोपावोत हाई कुशीकडतीन ती कुशीकडे वळानं नही.
तु गहू, जव, पावटे, मसुर, बाजरी अनी काठया गहु लिसनं एक भांडामां टाक; अनी आपलाकरता त्यानी भाकर बनाडं; तु आपला कुशीवर झोपशी त्या दिनना संख्याना मानतीन तीनशे नव्वद दिन तुले ती खावानी शे. 10 तु जे अन्न खाशी ते वजनतीन रोजनं ईस शेकेल राहीसनं ते तु मजार मजारमां खाय; 11 अनी दोन ग्लास पाणी पेय; ते तु दिनमां एकदाव पेय. 12 जवना भाकर परमानं ती भाकर करीसनं खाय; ती लोकेसनासमोर मानवी विष्ठघाई भुज.
13 परमेश्वर बोलना, यापरमानं मी इस्त्राएल वंशसना ज्या राष्ट्रमां हाकली दिसू तठे त्या आपली अमंगळ भाकर खातीन.
14 तवय मी बोलनू, अहा! प्रभू परमेश्वरा! दख, मी कवयच ईटाळनू नही; मी दाखलपनपाईन आजपावोत कधीच त्याना मरेल नाहिते जनावरले फाडीसनं मारेल जनावरनं मांस खाद नही; अमंगळ मांस मना तोंडले लागनं नही.
15 मंग तो माले बोलना, दख, मानवी विष्ठेना जागवर गायनं शेण वापरानी मी तुले परवानगी देस; त्याना गोवर्‍यासघाई आपली भाकर भुज.
16 आजुन तो माले बोलना, मानवपुत्रा, दख, मी यरुशेलममां भाकरीसना आधार तोडसू मनजे लोके कष्टी व्हयीसनं भाकरी तोलीसनं खातीन; अनी भ्याईसनं पानी मापमास पितीन. 17 कारण भाकर अनी पानी यासनी तुट पडी, लोके येरायेरकडे दखीसनं भयचकीत व्हतीन अनी अधर्ममां क्षय पावतीन.