42
मंदीरन्या दोन खोल्या
1 तवय त्यानी माले उत्तरकडला रस्ताघाई बाहेरना आंगनमां लयी गया; अनी ती सोडेल जागा अनी उत्तरकडली इमारत यान्यासमोरन्या खोल्यासनी इमारतमां लयी गया.
2 तिना दार उत्तरदिशाले राहीसनं तिनी लांबी शंभर हात अनी रुंदी पन्नास हात व्हती.
3 मजारमां ईस हातनी आंगननामोरे अनी बाहेरना आंगनना फरसबंदीनामोरे तिसरा मजलाले समोरा समोर सज्जे व्हतात.
4 खोल्यासनीमोरे दहा हात रुंद अनी शंभर हात लांब आशी एक वाट व्हती; त्यासना दार उत्तर दिशाले व्हतं.
5 वरनी मजलानी जागा सज्जामां गुतेल व्हती म्हनीसनं तठेना खोल्या खालन्या अनी मजारन्या मजलाना मानतीन दाखल्या व्हत्यात.
6 कारन त्या खोल्यासना मजला तीन व्हतात; आंगनपरमानं त्यासले खांब नही व्हतात; म्हनीसनं खालनी अनी मजारनी मजलानी जागापेक्षा वरनी संकुचित व्हती;
7 अनी त्या खोल्यासनीसंगे एकसारखा आशी खोल्यासनी मोरेनी बाहेरनी आंगनकडे जायेल एक भित व्हती; तिनी लांबी पन्नास हात व्हती.
8 कारन बाहेरनी आंगननी खोलीनी जवयपास लांबी पन्नास हात व्हती; अनी दखा, गाभारानीमोरे ती शंभर हात व्हती.
9 हया खोल्यासनी खाल पुर्वेले प्रवेशना दार व्हता; तठेतीन बाहेरना आंगणमाईन येनारा त्या खोल्यासमां जायेत.
10 दक्षिणकडला आंगणनं लांबीकडली भितले लागीसनं ती सोडेल जागानीमोरे अनी इमारतनीमोरे खोल्या व्हत्यात.
11 उत्तरकडल्या खोल्यासनीमोरे जशा रस्ता व्हता तशा त्याना समोरनाबी रस्ता व्हता; त्यासनी लांबी रुंदी, त्यासन्या बाहेर जावान्या बठया वाटा अनी त्यासनी जवयपास व्यवस्था त्यासना परमानं व्हती.
12 त्यासना दारपरमानं दक्षिण दिशानं खोल्यासना दार व्हतात; रहदारीना रस्ताना तोंडनाजोडे मनजे उजवी भितनीजोडे वाटवर एक दार व्हतं; तठेतीन पर्वकडला येनारा लोके प्रवेश करेत.
13 तो माले बोलना, सोडेल जागानी मोरेनी उत्तरकडल्या खोल्या अनी दक्षिणकडल्या खोल्या पवित्र राहीसनं तठे परमेश्वरनासमोर जानारा याजक यासनी परमपवित्र पदार्थ सेवन करानं; तठे त्यासनी अन्नबली, पापबली, दोषबली आशे परमपवित्र पदार्थ ठेवानात; कारन ती जागा पवित्र शे.
14 याजक मजार जावावर पवित्रस्थानमाईन बाहेरना आंगणमां त्यासनी तशेच जावानं नही; तर सेवानी येयले आपला कपडा त्यासनी त्या खोल्यासमां ठेवानं, कारण ती पवित्र शेतस; मंग त्यासनी दुसरा कपडा घालीसनं सार्वजनिक ठिकानले जावानं.
मंदीरना माप
15 त्यानी मंदीरना मजारनं माप लेवानं सरावं तवय त्यानी माले पुर्व दिशानं दारघाई बाहेर लयी गया अनी ते बाहेरतीन चारीमेरनी बाजु मोजी.
16 त्यानी मोजमाप करानी काठीघाई पुर्वभाग जवयपास पाचशे हात मोजं.
17 त्यानी मोजमाप करानी काठीघाई उत्तर भाग जवयपास पाचशे हात मोजं.
18 तशेच मोजमाप करानी काठीघाई दक्षिण भाग जवयपास पाचशे हात मोजं.
19 त्यानी पश्चिमकडे वयीसनं मोजमाप करानी काठीघाई जवयपास तो भाग पाचशे हात मोजं.
20 त्यानी ते चारी बाजुतीन मोजी काढं; पवित्र ठिकान अनी सामान्य ठिकान येरा येरमाईन येगळं करी ठेवाकरता त्यानी आजुबाजूले एक भिग व्हती; तिनी लांबी पाचशे हात अनी रुंदी पाचशे हात व्हती.