43
मंदीरमां परमेश्वरना तेज
1 मंग पुर्व दिशाना दारकडे तो माले लयी गया;
2 तवय दख, इस्त्राएलना देवना वैभव पुर्वकडतीन प्रकट व्हयनं; त्याना शब्द महापुरना आवाजनामायक व्हता; अनी त्याना वैभवतीन बठी पृथ्वी प्रकाशमय व्हयनी
3 मी नगरना नाश कराले येयल व्हतू तवयना दृष्टांतनामायक दृष्टांत मी दख; खबार नदीना काठले जो दृष्टांत मी दखा तशे दृष्टांत मना नजरां पडनं; तवय मी उबडा पडनू.
4 पुर्व दिशाना दारकडतीन परमेश्वरनं तेज मंदीरमां व्हनं.
5 तवय आत्मानी माले उचलीसनं मजार आंगणमां लयी गया, तवय दख, परमेश्वरना तेजघाई मंदीर भरी जायेल व्हतं;
6 अनी मंदीरमाईन कोनीतरी मनीसंगे बोली राहीना शे आशे मी आयकं, अनी मनाजोडे एक माणुस उभा व्हता.
7 तो माले बोलना, मानवपुत्रा, हाई मना सिंहासनंन स्थळ, पादासननं स्थळ शे. तठे मी इस्राएल वंशमां सर्वकाय राहासू; इस्त्राएल घराणाना लोके अनी त्यासना राजे आपला व्यभिचारतीन अनी त्यासना राजासनी स्थापन करेल प्रेतवत मुरतीसघाई आपला उच्चस्थानवर यानामोरे आपला पवित्र नावले बट्टा लावावूत नही;
8 त्यासनी आपला उंबरठा मना उंबरठाना शेजारले, आपला दारनं खांब मना दारना खांबना शेजार उभं करेल शे, अनी मनामां अनी त्यासनामां एक भित आडवी व्हती; अमंगळ कृत्य करीसनं त्यासनी मना पवित्र नावले बट्टा लावं म्हनीसनं मी संतापमां त्यासना नाश करा.
9 आते त्यासनी आपला व्यभिचार अनी त्यासना राजासनी स्थापन करेल प्रेतवत मुरत्या दुर करी टाका; मंग मी त्यासनां सर्वकाय राहासू.
10 हे मानवपुत्रा, इस्त्राएल घराणासले हाई मंदीर दखाड, मनजे त्या आपला पापनाबद्दल लज्जित व्हतीन अनी त्यासनी हाई नमुनादार इमारतनी माप लेवानं.
11 त्यासनी करेल सर्वा कृत्यासनीबदल त्या लज्जित व्हयनात मनजे त्यासले हाई मंदीरना आकार, त्यानी रचना, त्यामां येवा जावाना रस्ता, त्यामासल्या आकृत्या, त्यान्या बठया विधी, अनी त्याना सर्वा नियम त्यासले दखाड अनी त्यासनासमोर लिखी ठेव, मनजे त्यासना सर्वा नियमना अनी विधीनं अवलंबन करीसनं त्या वागतीन.
12 मंदीरना हाऊ नियम शे; पर्वतना माथावर चारीमेरना बठा परदेश भलता पवित्र शे, दखा, मंदीरना हाऊ नियम शे.
वेदीनी बनावट
13 हातघाई वेदीना हया माप शेतस; (हाऊ हात मनजे एक हात अनी चार आंगठया;) तिना तयभार हातभर उचा, हातभर रुंद अनी तिना कडाना पाटथरा ईटभर; हाऊ वेदीना पाया.
14 तिना तयभागपाईन खालना बैठकपावोत उची दोन हात अनी रुंदी एक हात अनी खालनी बैठकपाईन वरनी बैठकपावोत उची चार हात अनी रुंदी एक हात व्हती.
15 वेदीनी वरनी भागनी उची चार हात; वेदीना अग्नीकुंडले लागीसनं वर जायेल चार शिंग व्हतात.
16 वेदीना अग्नीकुंड बारा हात लांब अनी बारा हात रुंद व्हतात; त्या समचौरस व्हतात.
17 तिनी बैठक चौदा हात लांब अनी चौदा रुंद आशी व्हती; तिना आजुबाजूले पाटथरा अर्धा हात; अनी तिना तयभाग आजुबाजूले एक हात उचा व्हता; तिन्या पायत्या पुर्व दिशाले व्हतात.
वेदीनं अर्पण
18 तवय तो माले बोलना, मानवपुत्रा, प्रभु परमेश्वर सांगस, हाई वेदीवर होमार्पण कराले पाहिजे म्हनीसनं अनी रंगत शितडाले पाहिजे म्हनीसनं ती बांधी टाकतीन मंग त्यानंतर दिवसना तिनासंबंधमां विधी हाई:
19 मनी सेवा कराले मनाजोडे येनारा लेवी वंशमासला सादोकना कुयमासला याजक याले पापार्पण कराकरता तु एक वासरू दे; आशे प्रभु परमेश्वर सांगस.
20 तु त्यानं रंगत लिसन वेदीना चारी शिंगसवर, बैठकना चारी कोपरासवर अनी आजुबाजूना पाटथर्यावर शितड; हाई परकारतीन प्रायश्चित करीसनं ती शुध्द कर.
21 मंग तु पापार्पना वासरू लेय अनी त्यानाघाई पवित्रस्थानना बाहेर मंदीरना नेमेल जागवर त्याना होम करानं.
22 दुसरा दिन पापार्पण कराकरता एक निर्दोष बोकडया ले; वासरूना होमघाई जशी वेदी शुध्द करी तशी यानाघाईबी कराले पाहिजे.
23 शुध्दीरकन सरनं मनजे एक निर्दोष वासरू अनी कयपमासला एक निर्दोष एडका अर्पण कर.
24 तु ते परमेश्वरनासमोर आण; मंग याजक त्यानावर मीठ टाकतीन अनी त्यानं हवन करीसनं ते परमेश्वरले अर्पण करतीन.
25 तु सात दिन रोज एक एक निर्दोष बोकडयानं पापार्पण करं; एक वासरू अनी कयपमासला एक निर्दोष एडका हाऊबी त्यानी अर्पण करानं.
26 यापरमानं सात दिन वेदीनाईषयी प्रायश्चित करीसनं तिनी शुध्दी करानी, आशे तिना संस्कार व्हवाले पाहिजे.
27 त्या दिननी कार्य सरावर आठवा दिनले अनी यानामोरे याजक तुमनं होमबली अनी तुमनं शांतीबली वेदीवर अर्पन करतीन अनी मी तुमनावर प्रसन्न व्हसू आशे प्रभु परमेश्वर सांगस.