44
पुर्वेकडना फाटक
1 मंग त्यानी माले त्या मंदीरना पुर्व दिशाना बाहेरना दारकडतीन जानारा वाटघाई परत लयी वना; तवय ते दार बंद व्हतं.
2 तवय परमेश्वर माले बोलना, हाई दार बंद ठेवानं; उघडानं नही, आठेतीन कोनी परवेश करानं नही; कारन परमेश्वर, इस्राएलना देव, यानी हाई दारतीन परवेश करं म्हनीसनं हाई बंद ठेवानं.
3 राजानीबारामां बोलशात तर तो राजा शे म्हनीसनं परमेश्वरनासमोर त्या दारमां बशीसनं तो जेवण करी; दारना देवडीना वाटघाई तो यि जायी.
मंदिरमां जावाना नियम
4 मंग त्यानी माले उत्तरना दारले जानारा वाटघाई मंदीरनासमोर लयी गया; मी दख तवय परमेश्वरना तेजघाई परमेश्वरनं मंदीर भरेल व्हतं; तवय मी उबडा पडनू.
5 मंग परमेश्वर माले बोलना, मानवपुत्रा, परमेश्वरना मंदीरनाईषयी सर्वा ईधी अनी सर्व नियम यानाईषयी जे मी बठ तुले सांगी राहीनू त्यानाकडे चित्त लाव; डोया उघाडीसनं दख अनी कान दिसनं आयक; अनी मंदीरना परतेक दारघाई पवित्रस्थानमां जावानीबारामां जे सांगस त्याकडे चित देय.
6 "त्या फितुरी इस्राएल घराणाले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, इस्राएल वंशसवन; तुमी हाई बठ अमंगळ कृत्य करात ते आते बसं व्हयनं;
7 तुमी माले अन्न, चरबी अनी रंगत अर्पन करतसं तवय मनतीन अनी शरीरतीन बेसुंती आशे परका लोकेसले मना पवित्रस्थानमां आणीसनं मनं मंदीर भ्रष्ट करेल शे; हाई परकारतीन तुमी मना करार मोडीसनं आपला बठा अमंगळ कृत्यासमां भर घालेल शे.
8 तुमी मन्या पवित्र वस्तुसनी राखन करात नही; तर तुमी पवित्रस्थानमां तुमी सोता ऐवजी त्यासले मन्या पवित्र वस्तुना राखनदार नेमं.
9 प्रभु परमेश्वर म्हनसं, इस्राएल वंशमा राहानारा, मनतीन अनी शरीरतीन बेसुंती ज्या परदेशीसमाईन कोनी मना पवित्रस्थानमां येवानं काम नही.
लेवी याजकपन येगळा करामां येस
10 इस्त्राएल जवय बहकी गयात तवय ज्या लेवी मनापाईन दुर गयात अनी आपल्या मुरतीसनामांगे लागीसनं माले सोडीसनं बहकी गयात त्यासले आपला अधर्मना फय भोगनं पडी.
11 त्या मना पवित्रस्थानमासला चाकर व्हतीन; मंदीरना दारनामोरे त्या पहारेकरी व्हतीन अनी मना मंदीरमां त्या सेवा चाकरी करतीन; त्या लोकेसकरता होमपशू अनी यज्ञबली यासना वध करतीन; अनी लोकेसनी सेवाचाकरी कराले त्यानामोरे उभा राहातीन.
12 त्यासनी त्यान्या मुरतीसनामोरे इस्राएल घराणानी सेवाचाकरी करी अनी त्या त्यासले पापमां पाडनारा अडथळा व्हयना; म्हनीसनं मी त्यासनावर हात उगारेल शे, अनी त्या अधर्मना प्रतिफय भोगतीन आशे प्रभु परमेश्वर सांगस.
13 त्यासनी याजक हाई नातातीन मनी सेवा कराकरता मनासमोर येवानं नही; मन्या बठया पवित्र वस्तु, परमपवित्र वस्तू यासनाजोडे त्या येता कामा नही; तर त्यासनी आपली अप्रतिष्ठा सोसानी अनी आपला अमंगळ कृत्यासबद्दल शिक्षा भोगानी.
14 मना मंदिरमां जी काही सेवा व्हत राहास तिले अनुसरीसनं अनी त्यामां जे काही करानं राहास त्यानीबारामां मना मंदीरना राखन करनारा आशे मी त्यासले करसू.
याजक
15 इस्राएल वंश माले सोडीसनं बहकी गयात तवय लेवी वंशमासला याजकसमाईन सादोक वंश यासनी मनी पवित्रस्थाननी सेवाचाकरी करी, म्हनीसनं मनाजोडे यिसनं मनी सेवा करतीन; मनासमोर उभा राहातीन अनी माले चरबी अनी रंगत अर्पन करतीन, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
16 त्या मना पवित्रस्थानमां येतीन, त्या मनी सेवा कराकरता मना मेजनाजोडे येतीन अनी मन्या पवित्र वस्तुसन्या रक्षण करतीन.
17 त्या मजारन्या आंगणना दारकडे जातीन तवय त्यासनी तागना कपडा घालानं; त्यासनी मजारनां आंगणना दारपान अनी मंदीरनी सेवा करतीन तवय त्यासनी लोकरना कपडा घालानं नही;
18 त्यासनी आपला डोकामां तागना फेटा घालानं; त्यासनी कंबरले तागनं चोयन घालानं; त्यासनी घाम यि आशे कंबरले वेष्टन घालानं नही.
19 त्या बाहेरना आंगणमां जातीन, लोकेसमां बाहेरना आंगणमां जातीन, तवय त्यासना कपडासना स्पर्शघाई लोके पवित्र व्हवाले नही पाहिजे म्हनीसनं त्यासनी सेवानी येयना कपडा काढीसनं पवित्र खोलीमां ठेवानं अनी दुसरा कपडा घालानात.
20 त्यासनी आपला डोका काढानं नही; नहीते केस लांब वाढावानं नही तर त्यासनी आपला डोकानं केस कापानं.
21 मजारना आंगणमां जावानी येयले कोनताच याजकनी द्राक्षरस पेवानं नही.
22 त्यासनी ईधवासनीसंगे नहिते सोडेल बाईनीसंगे लगीन करानं नही, तर इस्त्राएली वंशमासली कुमारीनीसंगे एखादा याजकनी ईधवानीसंगे लगीन करानं.
23 त्यासनी मना लोकेसले शिक्षण देवानं, पवित्र काय अनी सामान्य काय शुध्द काय अनी अशुध्द काय यासमासला भेद त्यासले दखाडी देवानं.
24 झगडाखोरसना निवाडा कराले त्यासनी कायम तत्पर राहावानं; मना निर्णयपरमानं हाऊ निवाडा त्यासनी करानं; बठा सणासमां मना धर्मशास्र अनी नियम पायानं अनी मना शब्बाथनं पवित्रतीन पालन करानं.
25 त्यासनी प्रेतले हात लायीसनं अशुध्द व्हवानं नही; पन माय, बाप, पोर्या, पोर, भाऊ अनी कुवारी बहीन यासना बारामां त्या अशुध्द व्हयनाते चाली.
26 तो शुध्द व्हवावर आजुन सात दिन मोजानं.
27 मंग तो पवित्रस्थानमां, मनजे मजारना आंगणमां, पवित्रस्थानमासली सेवा कराले जायी त्या दिन त्यानी आपल पापार्पण करानं: आशे प्रभु परमेश्वर सांगस.
28 त्यासले वतन काय म्हनशात तर मी त्यासनं वतन शे; त्यासले इस्त्राएलमां वाटा देवानं नही; त्यासना वाटा मी शे.
29 अन्नार्पण, पापार्पण अनी दोषार्पण हाई त्यासनी खावानं; इस्त्राएलनी वाहेल परतेक गोष्ट त्यासनी व्हवाले पाहिजे.
30 बठा पहिला फळना भाग, समर्पित अंश म्हनीसनं अर्पन करानी परतेक वस्तु याजकनी व्हवाले पाहिजे; तुमी तिंबेल कणिकना एक पहिला गोया याजकले देवानं मनजे तुमना घरले बरकत राही.
31 कोनतबी त्याना मरेल नहीते टाकेल जनावर याजकनी खावानं नही; मंग तो चिडा राहो की पशू राहो.