10
मर्दखयनी महती
अहश्वेरोश राजानी देशवर अनं समुद्रजोडेना बेटसवर खंडणी बसाडी. त्याना सामर्थ्याना अनं पराक्रमना कृत्यसनी अनी मर्दखयले राजानी महतीस चढायं यानी साध्यंत हकीकत मेदय अनं पारसी यासना इतिहासना ग्रंथमा लिखेल नही शेतस का? मर्दखय यहूदी याना दर्जा अहश्वेरोश राजाना खालोखाल व्हता; यहूदी लोकसमा तो भलता थोर व्हता; त्याना बांधव समुदायमा त्यानी मोठी मान्यता व्हती; तो आपला लोकसनं कल्याण कराकरता प्रयत्न करत राहे, अनं आपला सर्व लोकसनं चांगलं कसं व्हई यानाकडे त्यानं ध्यान राहे.